फडणवीस-शाह भेटीमुळं मंत्रिमंडळात भूकंप? ‘या’ मंत्र्यांवर टांगती तलवार, मंत्र्यांच्या वर्तनावर शाहांचा संताप
दिल्लीमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली. वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव वाढल्याची सूत्रांची माहिती आहे. मंत्र्यांच्या वर्तनावरून मुख्यमंत्री फडणवीसांची तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती देखील मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दौरा वादग्रस्त मंत्र्यांसाठी संक्रांत ठरण्याची चिन्हे आहेत. फडणवीस अमित शहांना भेटले असून यात वादग्रस्त मंत्र्यांना घरी पाठवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. वादग्रस्त मंत्र्यांच्या वर्तनावर अमित शहा यांनी संताप व्यक्त केल्याची माहिती आहे. शहा-फडणवीस भेटीनंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात भूकंप होण्याची शक्यता आहे. या भेटीनंतर कोकाटेंची मंत्रीपदावरून हकालपट्टी होण्याची चिन्हे आहेत. तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचेही मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. योगेश कदम यांना आईच्या नावावर लेडीज बार प्रकरण भोवणार असं दिसत आहे.
अजित पवार आणि शिंदे यांच्या वादग्रस्त मंत्र्यांमुळे भाजपची बदनामी होत असल्याने मंत्र्यांवर अंकुश ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. यात सभागृहात रमी खेळणाऱ्या तसेच शासनाला भिकारी म्हणणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचं नाव आघाडीवर आहे. कोकाटेंचा राजीनामा घेण्याबाबत भाजप आग्रही असल्याच्या बातम्या असून राष्ट्रवादीकडून मात्र खाते बदलाचा पर्याय सुचवण्यात आलाय. कोणत्या वादग्रस्त मंत्र्यांवर टांगती तलवार आहे बघा…
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

