चांगला भाव येईल या आशेने घरात कापूस साठवून ठेवला होता, तिथंही आगीने सगळं…

| Updated on: May 28, 2023 | 9:54 AM

Farmer News : बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. घरात साठवून ठेवलेल्या कापसाला आग लागल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.

चांगला भाव येईल या आशेने घरात कापूस साठवून ठेवला होता, तिथंही आगीने सगळं...
buldhana farmer news
Image Credit source: tv9marathi
Follow us on

बुलढाणा : शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्याच्या (Farmer) घरातील 10 क्विंटल कापूस जळून राख (Cotton is burnt to ashes) झाली आहे. हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना बुलढाणा (buldhana farmer news) जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू गावात घडली आहे. डिपीतील वायर निघाली त्यामुळे संपूर्ण घरात शॉर्टसर्कीट होऊन आग लागली अशी प्राथमिक माहिती आहे. आगीत इतर गोष्टी सुध्दा जळून खाक झाल्या आहेत. साधारण 10 क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. तर 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे अशी माहिती मिळाली आहे.

नेमकं काय झालं

बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे शॉर्टसर्किटमुळे सुमारे 10 क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना घडली असून आगीत शेतकऱ्याचे सुमारे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. किनगाव जट्टू येथील शेतकरी श्रीराम आश्रुजी गायकवाड यांचे दुसरबीड रस्त्यावर शेत आहे. शेतातच त्यांचे घर आहे. दरम्यान डीपीची अचानक वायर तुटल्याने घरात शॉर्टसर्किट झालं आणि घरात ठेवलेल्या कापसाला अचानक आग लागली.

हे सुद्धा वाचा

सर्व कापूस जळून राख झाला

काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले, क्षणातच सर्व कापूस जळून राख झाला. घटनेच्या वेळी गोठ्यात जनावरे, चारा व इतर साहित्य जवळच पडले होते. घटनेनंतर तात्काळ कनेक्शन तोडण्यात आल्याने अनुचित प्रकार टळला. या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच तलाठी वासुदेव जायभाय यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.  परिसरातील इतर शेतकऱ्यांनी या बाबत हळहळ व्यक्त केली आहे.