पावसामुळे 12 लाख हेक्टरावरील खरिप पाण्यात, सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात

| Updated on: Sep 10, 2021 | 10:14 AM

मध्यंतरी झालेल्या पावसामुळे राज्यातील तब्बल 12 लाख हेक्टरावरील पिक पाण्यात गेले आहे. पावसाचा सर्वाधिक तडाखा हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे. असे असताना पुढील आठवड्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आता प्रतिक्षा आहे ती मदतीची

पावसामुळे 12 लाख हेक्टरावरील खरिप पाण्यात, सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात
शेतामध्ये पाणी साचून खरिपीतील पिकाचे अशाप्रकारे नुकसान झाले आहे.
Follow us on

औरंगाबाद : दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली मध्यंतरी झालेल्या पावसामुळे राज्यातील तब्बल 12 लाख हेक्टरावरील पिक पाण्यात गेले आहे. पावसाचा सर्वाधिक तडाखा हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे. असे असताना पुढील आठवड्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आता प्रतिक्षा आहे ती मदतीची.

उत्पादनाच्या दृष्टीने खरिप हंगामच महत्वाचा आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. गतवर्षीही पावसाचाच परिणाम खरिप हंगामातील दरावर झाला होता. दिवसेंदिवस उत्पादनावरील खर्च वाढत आहे आणि दुसरीकडे उत्पन्न मात्र घटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. चार दिवस झालेल्या पावसात केवळ पिकाचेच नाही तर इतर बांबीचेही प्रचंड नुकसान झालेले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शेकडो जनावरे ही बेपत्ता झाली आहेत. तर मराठवाड्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेले तसेच अन्य दुर्घटनांमध्ये 30 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतीला बसलेला आहे. गतवर्षी खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी यंदा अधिकच्या दराने बियाणांची खरेदी केली. हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिली. त्यामुळे दुबार पेरणीचेही संकट शेतकऱ्यांवर ओढावले होते. परंतु, उत्पादनाच्या दृष्टीने खरिपात सोयाबीन, उडीद, मूग ची लागवड केली. पिक जोमात असतानाच राज्यात पावसाने हाहाकार केला खरिपाच्या पिकासह फळबागांचेही नुकसान झाले आहे.

30 नागरिकांचा बळी

चार दिवस झालेल्या पावसामध्ये पिकाचे तर नुकसान झाले आहेच शिवाय मनुष्यहानीही झाली आहे. मराठवाड्यासह इतर भागात 30 जणांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान तर झालेच आहे परंतु भविष्यात न भरुन निघणारे नुकसान नागरिकांचे झाले आहे.

आता मदतीची प्रतीक्षा

सध्या कागदपत्रांची जुळवाजुळव, नुकसानीची माहिती देणे यामध्ये शेतकरी गांगारुन गेला आहे. परंतु, ही सर्व खटाटोप केवळ पिकाच्या नुकसानीसाठी आहे. पिकाबरोबरच इतरही अनेक बाबींचेही नुकसान झाले आहे. परंतु, शेतकरी आगोदर प्रशासनाची मदत पदरात पाडून घेण्यासाठी धडपड करीत आहे.

शेतकऱ्यांवरील टांगती तलवार कायम

खरिपाचे पिक वावरात असतानाच झालेल्या पावसामुळे उत्पादनात तर घट होणारच आहे. पण सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी पुढील आठवड्यात मराठवाड्यात आणि खानदेशात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तिवण्यात आला आहे.

संबंधित इतर बातम्या :

अगदी कमी भांडवलात सुरु करा व्यवसाय, सरकारकडून अनुदान; महिन्याला पाच लाखांची कमाई

दुष्काळात तेरावा : पावसाचा परिणाम सोयाबीनच्या दरावरही होणार, शेतकऱ्यांच्या अडचणी कायम

पिकाचं नुकसान झालयं, मग अशी करा पिक पंचनाम्याची प्रक्रिया ; प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी