अगदी कमी भांडवलात सुरु करा व्यवसाय, सरकारकडून अनुदान; महिन्याला पाच लाखांची कमाई

Beekeeping | हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला फार भांडवल लागत नाही. यासाठी सरकारकडून आर्थिक अनुदानही दिले जाते. याशिवाय, मधुमक्षिका पालनाच्या व्यवसायातून तुम्ही महिन्याला अगदी पाच लाखांपर्यंतही उत्पन्न कमावू शकता.

अगदी कमी भांडवलात सुरु करा व्यवसाय, सरकारकडून अनुदान; महिन्याला पाच लाखांची कमाई
मधुमक्षिका पालन
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 7:33 AM

मुंबई: तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायात नशीब आजमवायला हरकत नाही. कारण, अलीकडच्या काळात पारंपारिक शेतमालाशिवाय आरोग्याच्यादृष्टीने अचानक महत्व प्राप्त झालेल्या पिकांची आणि उत्पादनांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे शेतीसोबतच्या जोडधंद्यातून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमावू शकता.

शेतीला पूरक असणाऱ्या अशाच उद्योगांपैकी एक म्हणजे मधुमक्षिका पालन (Beekeeping Business). हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला फार भांडवल लागत नाही. यासाठी सरकारकडून आर्थिक अनुदानही दिले जाते. याशिवाय, मधुमक्षिका पालनाच्या व्यवसायातून तुम्ही महिन्याला अगदी पाच लाखांपर्यंतही उत्पन्न कमावू शकता.

मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय नेमका काय?

ग्रामीण भागात मधुमक्षिका पालन हा अत्यंत फायद्याचा उद्योग ठरतो. शेतामधील जागेतच तुम्ही मधुमक्षिका पालनासाठीच्या पेट्या ठेवू शकता. मधमाशांमुळे पिकांचे परागीकरण चांगले होऊन शेतीचे उत्पादनही वाढण्याची शक्यता असते. मधुमक्षिका पालनासाठी तुम्हाला सरकारकडून अगदी 85 टक्क्यापर्यंत अनुदानही मिळू शकते.

मधुमक्षिका पालनातून किती उत्पन्न मिळेल?

तुम्ही किमान 10 पेट्या घेऊन मधुमक्षिका पालनाला सुरुवात करू शकता. जर प्रत्येक बॉक्समधून 40 किलो मध मिळाले तर 10 बॉक्समधून एकूण 400 किलो मध मिळते. प्रतिकिलो 350 रुपये दराने 400 किलो मध विक्री केल्यास 1 लाख 40 हजार रुपये कमाई होते. प्रत्येक बॉक्सचा खर्च 3500 हजार रुपये येतो. याप्रमाणे 10 बॉक्सचा एकूण खर्च 35 हजार रुपये होतो. म्हणजे यातून तुम्हाला 1,05,000 रुपये फायदा होतो. मधमाशांच्या संख्येत वाढ होईल तसा हा व्यवसाय तीन पटीने वाढतो. वातावरण आणि इतर घटक पोषक असतील तर तुम्ही वर्षभरात 25 ते 30 पेट्यांच्या माध्यमातून मधाचे उत्पादन घेऊ शकता.

मधमाशी पालनाचे अर्थशास्त्र त्याच्या दर्जावर अवलंबून असते. प्रत्येक डब्यातून प्राप्त होणारे 50 किलो कच्चा मध 100 रुपये प्रति किलोच्या दराने विकला जातो. म्हणजेच प्रत्येक डब्यामागे तुम्हाला 5 हजार रुपये मिळकत होते. मोठ्या प्रमाणात उद्योग केल्यास प्रति महिना 1 लाख 15 हजार रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. जैविक मध चांगल्या किंमतीत बाजारात विकले जाते. एक किलो सेंद्रिय मधाचा दर 400 ते 700 रुपये आहे.

सरकारकडून आर्थिक मदत उपलब्ध

हा व्यवसाय सुरु करायचा असल्यास सरकारकडून हनी प्रोसेसिंग प्लान्टसाठी आर्थिक मदत मिळते. उद्योगासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या 65 टक्के हिस्सा सरकारकडून कर्जाच्या स्वरुपात मिळतो. यासोबतच सरकारकडून 25 टक्के सबसिडीही मिळते. अशा प्रकारे व्यावसायिकाला केवळ 10 टक्के रक्कम गुंतवावी लागते. समजा, एकूण खर्च 24 लाख 50 हजार रुपये येत असेल तर 16 लाख रुपयाचे कर्ज मिळते. त्यानंतर सबसिडी 6 लाख रुपये मिळते. म्हणजे केवळ 2 लाख रुपये व्यावसायिकाला गुंतवणूक करायची आहे.

संबंधित बातम्या:

Drumstick Farming: एकदाच 50 हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षांपर्यंत खोऱ्याने पैसे कमवा

नोकरी शोधण्यापेक्षा 70 हजारात ‘हा’ व्यवसाय सुरु करा आणि कमवा लाखो रुपये

मोदी सरकारच्या मदतीने सुरु करा नवा व्यवसाय, 80 टक्क्यांपर्यंत कर्ज, 6 लाखांचा निव्वळ नफा

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.