नोकरी शोधण्यापेक्षा 70 हजारात ‘हा’ व्यवसाय सुरु करा आणि कमवा लाखो रुपये

Solar Panel | सोलर पॅनल लावण्यासाठी न्यू एन्ड रिन्यूएबल एनर्जी मंत्रालयाकडून 30 टक्क्यांचे अनुदान दिले जाते. घराच्या छतावर सोलर पॅनल्स इन्स्टॉल करण्याचा खर्च साधारण एक लाख रुपये इतका आहे. त्यापैकी 30 हजार तुम्हाला केंद्र सरकारकडून मिळतील.

नोकरी शोधण्यापेक्षा 70 हजारात 'हा' व्यवसाय सुरु करा आणि कमवा लाखो रुपये
सौरउर्जा

नवी दिल्ली: कोरोनामुळे नोकरी गेल्यानंतर तुम्ही एखादा व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी चालून आली आहे. तुम्ही घराच्या छतावरील मोकळ्या जागेचा वापर करुन लाखो रुपये कमवू शकता. तुम्हाला छतावर फक्त सोलर पॅनल्स लावावे लागतील. सोलर पॅनल्स अगदी कुठेही इन्स्टॉल करता येतात. या माध्यमातून तुम्ही घरातील विजेची गरजही भागवू शकता.

सोलर पॅनल लावण्यासाठी न्यू एन्ड रिन्यूएबल एनर्जी मंत्रालयाकडून 30 टक्क्यांचे अनुदान दिले जाते. घराच्या छतावर सोलर पॅनल्स इन्स्टॉल करण्याचा खर्च साधारण एक लाख रुपये इतका आहे. त्यापैकी 30 हजार तुम्हाला केंद्र सरकारकडून मिळतील.

सोलर पॅनल लावण्यासाठी राज्यांकडूनही अनुदान मिळते. मात्र, त्याची रक्कम वेगवेगळी असते. सोलर पॅनल्सची कालमर्यादा साधारण 25 वर्षांची असते. 10 तासांच्या सूर्यप्रकाशामुळे 10 युनिट वीज तयार होते. याचा अर्थ दोन किलोवॅटचा सोलर पॅनल लावल्यास महिन्याला 300 युनिट वीज तयार होईल. ही वीज तुम्ही विकू शकता.

घरासाठी किती किलोवॅटचा सोलर प्लांट?

तुमच्या घरासाठी किती किलोवॅटचा सोलर प्लांट लागेल हे तुम्हाला किती वीज लागते यावर अवलंबून आहे. तुम्हाला महिन्याला वीजेचे बिल 1000 रुपये येत असेल तर 1 किलोवॅटचा प्लांट तुमच्यासाठी योग्य आहे. 10 हजार रुपये वीजेचे बील असेल तर त्या घरासाठी 10 किलोवॅटचा सोलर प्लांट लागेल.

किती वीजेची निर्मिती होते?

10 किलोवॅट प्लांटच्या माध्यमातून महिन्याला 1200 युनिट वीजेची निर्मिती होते. त्यानुसार तुम्ही तुमच्या घरासाठी सोलर प्लांटची निवड करावी. 10 किलोवॅटच्या सोलर प्लांटसाठी तुम्हाला साधारण 4 लाख रुपये इतका खर्च येतो. तर 5 किलोवॅटच्या सौरउर्जा प्लांटसाठी 2.5 लाख रुपये इतका खर्च येतो.

‘या’ राज्यात उभारले जाणार देशातील सर्वात मोठं सोलर पार्क

एनटीपीसी रिन्यूबल एनर्जी लिमिटेडकडून गुजरातमधील कच्छच्या वाळवंटात 4,750 मेगावॅट क्षमतेचे सोलर पार्क उभारले जाणार आहे. केंद्रीय उर्जा मंत्रालयाकडून नुकतीच या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. हे देशातील सर्वात मोठे सोलर पार्क ठरणार आहे.
भारत-पाकिस्तान सीमारेषेजवळ असणाऱ्या कच्छच्या वाळवंटात उभारल्या जाणाऱ्या या सोलर पार्कमध्ये अनेक कंपन्यांना यापूर्वीच सौर आणि पवन उर्जेच्या प्रकल्पांसाठी जमिनी ताब्यात देण्यात आल्या आहेत. एनटीपीसीचा प्रकल्प खवडा आणि विघकोट या गावांच्या परिसरात असेल.

सध्या गुजरातला 18000 मेगावॅट वीज लागते. राज्यात सध्याच्या घडीला 30,500 मेगावॅट वीजेची निर्मिती करणारे प्रकल्प आहेत. यापैकी 11,264 मेगावॅट क्षमतेचे वीजप्रकल्प हे रिन्यूबल एनर्जी प्रकारात मोडणारे आहेत. गेल्या 12 वर्षात ही क्षमता दहापटीने वाढली आहे.
कच्छच्या वाळवंटातील नव्या सोलार पार्कमुळे स्थानिक लोकांना मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. या सोलर पार्कसाठी अनेक तंत्रज्ञांची गरज लागणार आहे. त्यामुळे स्थानिक तरुणांना नोकऱ्या मिळू शकतात.

संबंधित बातम्या:

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारी संस्था, विद्यापीठांचं सहकार्य घ्या, नितीन राऊत यांची महावितरणला सूचना

Solar Energy: घरावर सोलर पॅनल्स लावायचेत, जाणून घ्या किती खर्च येणार?

आता सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करा, ‘महावितरण’कडून वेबसाईट लॉन्च

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI