ई-पीक पाहणीच्या माध्यमातून 30 लाख शेतकऱ्यांनी केली पीक पेऱ्याची नोंदणी

| Updated on: Sep 15, 2021 | 11:27 AM

आतापर्यंत 30 लाख शेतकऱ्यांनी पिकाची नोंदणी केल्याचे महसूल विभागाने  स्पष्ट केले आहे. वाढत्या प्रतिसादामुळेच मुदतही वाढविण्यात आली आहे. असे असले तरी प्रशासनाने स्व:ता ही नोंदणी करण्याची मागणी काही शेतकऱ्यांकडून होत आहे.'ई-पीक पाहणी' द्वारे शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदणीमुळे कारभारात पारदर्शकता येणार आहे.

ई-पीक पाहणीच्या माध्यमातून 30 लाख शेतकऱ्यांनी केली पीक पेऱ्याची नोंदणी
पिक पेरणीचे संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातुर : स्व:ताच्या शेतामधील पिकांची नोंदणी आता शेतकऱ्यांनाच करावी लागणार आहे. याकरिता ‘ई-पीक पाहणी’ हे अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, ही प्रक्रिया किचकट असून हे शेतकऱ्यांना जमणार नाही असा सूर उमटू लागला होता. परंतु, आतापर्यंत 30 लाख शेतकऱ्यांनी पिकाची नोंदणी केल्याचे महसूल विभागाने  स्पष्ट केले आहे. वाढत्या प्रतिसादामुळेच मुदतही वाढविण्यात आली आहे. असे असले तरी प्रशासनाने स्व:ता ही नोंदणी करण्याची मागणी काही शेतकऱ्यांकडून होत आहे.’ई-पीक पाहणी’ द्वारे शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदणीमुळे कारभारात पारदर्शकता येणार आहे. शिवाय यंत्रणेत कोणी मध्यस्थी नसल्याने थेट लाभ हा शेतकऱ्यांनात होणार आहे. अत्याधुनिक प्रणालीद्वारे ही नोंदणी होणार असल्याने शेतकऱ्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचेच लक्ष होते. मात्र, शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे.

‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून पिकांची नोंदणी या उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष आहे. प्रशासनाचे काम आता शेतकऱ्यांच्या माथी, हा उपक्रम म्हणजे विमा कंपनीच्या लुटीला सहकार्यच अशा प्रकारे टिप्पणीही होत आहे. हे सर्व असतानाही राज्यातील 30 लाख शेतकऱ्यांनी या माध्यमातून पीकाच्या नोंदी केलेल्या आहेत. शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा म्हणून 15 दिवसांची मुदतही वाढविण्यात आली आहे. राज्यात सर्वात जास्त नोंदी ह्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. असे असतानाच बीड जिल्ह्यातूनच या प्रणालीबाबत शंका वाढत आहेत. पिक पेऱ्याच्या नोंदी शेतकऱ्यांनी करायच्या आणि फायदा हा विमा कंपनीली होणार.

त्यामुळे तलाठ्यांचे काम तलाठ्यांनीच करण्याची मागणी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. तर हा ऐतिहासक निर्णय असून शेतकऱ्यांची गैरसाय ही टळणार आहे. यामध्ये अनियमितता होणार नाही. प्रशासनाशी थेट जोडणी असल्याने पीक पेऱ्याची आकडेवारी, भविष्यातील उत्पादन आणि बाजारभाव याबद्दल शेतकऱ्यांना माहिती होणार आहे.

‘ई-पीक पाहणी’चे असे आहेत फायदे

1) ‘ई-पीक पाहणी’ या अॅपमुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद होणार आहे. यामुळे ना शेतकऱ्याचे नुकसान होणार आहे ना सरकारची फसवणूक.
2) या अॅपरील नोंदीमुळे राज्यात, देशात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे याची अचूक आकडेवारी एका क्लिकर उपलब्ध होणार आहे.
3) पिकाच्या अचूक आकडेवारीमुळे उत्पादनाबद्दल अंदाज बांधता येतो. यावरुन भविष्यात बी-बियाणे लागणारे खत हे पण उपलब्ध करुन देता येणार आहे. शेतावरील गटावर झालेल्या पीक नोंदीचा फायदा हा देशात कीती क्षेत्रावर कीती ऊत्पन्न झाले हे सांगण्यासाठी देखील होणार आहे.
4) पिकाच्या छायाचित्रामुळे किती अक्षांश: आणि किती रेखाअंशावर कोणत्या पिकाचा पेरा झाला आहे हे समजले जाणार आहे.
5) एका मोबाईलहून 20 शेतकऱ्यांच्या नोंदी करता येणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल नसतो त्यामुळेच अशा प्रकारची सोय करण्यात आली आहे.

‘ई-पीक पाहणी’ अॅपमधील त्रुटी

1) ‘ई-पीक पाहणी’बाबत शेतकऱ्यांना आतापर्यंत योग्य जनजागृती आणि मार्गदर्शन झालेले नाही.
2) अत्याधुनिक प्रकारचे मोबाईल वापराची माहिती शेतकऱ्यांना नाही. अॅपमध्ये नेमकी माहिती भरायची कशी हेच शेतकऱ्यांना माहिती नसल्याने शेतकरी या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करी आहेत.
3) यंदा अशाप्रकारे माहिती भरुन घेतली जात आहे. मात्र, दरवर्षी अशाच प्रकारे शेतकऱ्यांना माहिती द्यावी लागणार हे स्पष्ट नाही. 30 farmers register crop through e-crop inspection

इतर बातम्या :

सौर पंप मिळवायचाय, कुसुम योजनेसाठी अर्ज करण्याचं आवाहन, अर्ज कुठं करायचा वाचा सविस्तर

मातीमोलः नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला किलोमागे फक्त 1 रुपयाचा भाव

यंदाच्या नुकसान भरपाईचं सोडाच, दोन वर्षापासून आठशे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत