मातीमोलः नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला किलोमागे फक्त 1 रुपयाचा भाव

नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या चांदवड (Chanwad) तालुक्यातील उर्धुळच्या शेतकऱ्याला बाजारात नेलेल्या हिरव्या मिरचीला (green chillies) किलोमागे फक्त 1 रुपयाचा भाव (low price) मिळाला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने आपल्या रानातील मिरचीचे उभे पीक उपटून फेकून दिल्याची घटना घडली आहे.

मातीमोलः नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला किलोमागे फक्त 1 रुपयाचा भाव
नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या मिरचीला फक्त एक रुपयाचा भाव मिळाला. त्यामुळे त्यांनी शेताती पीक उपटून फेकून दिले.

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या चांदवड (Chanwad) तालुक्यातील उर्धुळच्या शेतकऱ्याला बाजारात नेलेल्या हिरव्या मिरचीला (green chillies) किलोमागे फक्त 1 रुपयाचा भाव (low price) मिळाला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने आपल्या रानातील मिरचीचे उभे पीक उपटून फेकून दिल्याची घटना घडली आहे. (Nashik low price, the price of green chillies is only Rs. 1 per kg)

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कृषी कायद्याला विरोध करत आंदोलन करत आहेत. एकीकडे सरकार शेतकऱ्यांना हमीभाव मिळतो याचा दावा करते. मात्र, ज्या पिकांचा हमीभाव ठरलेला आहे, त्यांना मिळत नाही. जे पीक हमीभावाच्या कक्षेत येत नाहीत, त्याचा विचारच न केलेला बरा. आता हेच बघा चांदवड तालुक्यातल्या उर्धुळच्या दत्तू ठाकरे यांचे. ठाकरे यांनी आपल्या शेतातील एक एकर जमिनीवर हाकुनी आणि ओमिका जातीच्या मिरचीची लागवड केली होती. चांगला उतार मिळतो म्हणून या मिरचीची ओळख आहे. एकरावरील पीक मिरचीने लगडले. ठाकरे यांना बऱ्यापैकी पैसा हातात खेळेल अशी आशा होती. त्यांनी मालेगाव आणि लासलगाव बाजारपेठेत आपली मिरची विकायला नेली. तेव्हा त्यांच्या मिरचीला किलोमागे फक्त 1 रुपयाचा भाव मिळाला. त्यामुळे संतप्त झालेल्या ठाकरे यांनी या बाजारभाव व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत अख्ख्या एकरावरील मिरची उपटून फेकून दिली.

एकरावर केला लाखाचा खर्च
ठाकरे यांनी मिरचीच्या लागवडीसाठी जवळपास एक लाखाचा खर्च केला होता. उच्च प्रतीचे रोप आणणे, त्यासाठी मजुरी, औषधी, ड्रीप, सुतळी, बांधणी यावर पैसा खर्च केला होता. मात्र, हा एक लाखाचा खर्च त्यातून निघणे ही दूरची गोष्ट. त्यांना उभ्या शेतातील पीकच उपटून फेकून द्यावे लागले आहे. शेतकऱ्यांना लागवड केलेला पैसाही मिळत नसेल, तर त्याने जगावे कसे, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

टोमॅटो फेकले होते रस्त्यावर
गेल्या काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे दरही असेच कोसळले होते. त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकून संताप व्यक्त केला होता. नाशिक, औरंगाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात अशा घटना घडल्या होत्या. त्यात नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातील अंदरसुल येथील शेतकऱ्याने टोमॅटोच्या लागवडीचा खर्चही निघत नसल्याने टेम्पोभरून टोमॅटो रस्त्यावर फेकले होते. (Nashik low price, the price of green chillies is only Rs. 1 per kg)

इतर बातम्याः 

नाशिकमध्ये सोन्याचे दर स्थिर, 10 ग्रॅममागे 47500; चांदी किलोमागे 66200 रुपयांवर

लई भारीः नाशिकमध्ये चक्क सोन्याचे मोदक; दर 12000 रुपये किलो

मालेगावचे ‘एमआयएम’चे आमदार म्हणतायत, ‘जीवाला धोका’; पोलिसात तक्रार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI