मालेगावचे ‘एमआयएम’चे आमदार म्हणतायत, ‘जीवाला धोका’; पोलिसात तक्रार

नाशिकः मालेगावचे ‘एमआयएम’चे आमदार (Malegaon MIM MLA) मौलाना मुफ्ती मो. इस्माईल (Maulana Mufti Mohd. ismail) यांनी आपल्या जीवाला धोका (life threatening) असल्याची तक्रार अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी (Malegaon Police) यांना शिष्टमंडळासह भेटून दिली आहे. माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. (Malegaon MLA […]

मालेगावचे 'एमआयएम'चे आमदार म्हणतायत, 'जीवाला धोका'; पोलिसात तक्रार
मौलाना मुफ्ती मो. इस्माईल, आमदार.
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 12:42 PM

नाशिकः मालेगावचे ‘एमआयएम’चे आमदार (Malegaon MIM MLA) मौलाना मुफ्ती मो. इस्माईल (Maulana Mufti Mohd. ismail) यांनी आपल्या जीवाला धोका (life threatening) असल्याची तक्रार अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी (Malegaon Police) यांना शिष्टमंडळासह भेटून दिली आहे. माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. (Malegaon MLA meets Additional Superintendent of Police Chandrakant Khandvi, Reported to be life threatening)

माजी आमदार रशीद शेख यांनी गेल्या आठवड्यात एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले होते. आमदार मौलाना मुफ्ती मो. यांच्यासह डॉ. परवेझ, शान-ए-हिंद, मुस्तकिम डिग्नीटी, यांच्यावर टीका केली होती. तसेच हल्लेखोर फायरिंगला जाताना आपल्याला विचारून गेले असते, तर वेगळे घडले असते असे वक्तव्यही केले होते. या पार्श्वभूमीवर आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल, डॉ. खालीद परवेझ, मुस्तिकम डिग्रीटी, रिजवान खान यांच्या शिष्टमंडळाने अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्यी भेट घेतली. माजी नगरसेवक प्रा. खान यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करावी, या प्रकरणातील सूत्रधाराला अटक करावी अशी मागणी केली.

दोन संशयितांवर गुन्हा

माजी नगरसेवक खान यांच्या घरावरील गोळीबाराप्रकरणी दोन संशयितांसह कॉंग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांच्या भावावरही गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाची लवकर चौकशी करावी. शहरात वाढलेल्या गुंडगिरीला आळा घालावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी आमदार मौलाना मुफ्ती मो. यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचेही सांगितले.

आरोप-प्रत्यारोप सुरूच

मालेगावचे आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल हे ‘एमआयएम’ पक्षाचे आहेत. तर माजी आमदार रशीद शेख हे काँग्रेसचे आहेत. या दोघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे. माजी नगरसेवक प्रा. खान यांच्या घरावर २२ फेब्रुवारी 2020 रोजी गोळीबार झाला होता. या गोळीबारानंतर खान यांनी या गोळीबारामागे आपले राजकीय विरोधक असल्याचे म्हटले होते. त्यांचा इशारा हा काँग्रेसच्या नेत्यांकडे होता. त्यानंतर या प्रकरणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडतच आहेत.

निवडणुकीचे पडघम

राज्यात फेब्रुवारी 2022 मध्ये 18 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. या निवडणुकांच्या तोंडावरच मालेगावमध्ये आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काळात यात निश्चित वाढ होणार यात शंका नाही. (Malegaon MLA meets Additional Superintendent of Police Chandrakant Khandvi,Reported to be life threatening)

इतर बातम्याः

नाशिक जिल्ह्यातील 12 धरणांतून विसर्ग; औरंगाबादला मोठा दिलासा, 8.14 टीएमसी पाणी जायकवाडीकडे

Nashikweather: नाशिक जिल्हा, खान्देशात पाऊस आजही जोरदार बॅटींग करण्याची शक्यता

सख्ख्या बहीण-भावाला वाचवण्यासाठी गुरुजींची तापीत उडी; भाऊ वाचला, पण बहीण बुडाली

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.