नाशिक जिल्ह्यातील 12 धरणांतून विसर्ग; औरंगाबादला मोठा दिलासा, 8.14 टीएमसी पाणी जायकवाडीकडे

गेल्या आठवडाभरापासून नाशिक (Nashik) जिल्ह्यावर पावसाने कृपाछत्र धरल्याने 12 धरणांतून पाण्याचा विसर्ग (Water released) सुरू आहे. तब्बल 8.14 टीएमसी पाणी जायकवाडी धरणाच्या (Jayakwadi) दिशेने झेपावले आहे. त्यामुळे औरंगाबादला (Aurangabad) मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील 12 धरणांतून विसर्ग; औरंगाबादला मोठा दिलासा, 8.14 टीएमसी पाणी जायकवाडीकडे
नांदूर-मधमेश्वरमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

मनोज कुलकर्णी, नाशिकः गेल्या आठवडाभरापासून नाशिक (Nashik) जिल्ह्यावर पावसाने कृपाछत्र धरल्याने 12 धरणांतून पाण्याचा विसर्ग (Water released) सुरू आहे. तब्बल 8.14 टीएमसी पाणी जायकवाडी धरणाच्या (Jayakwadi) दिशेने झेपावले आहे. त्यामुळे औरंगाबादला (Aurangabad) मोठा दिलासा मिळाला आहे. (Water released from 12 dams in Nashik district; Relief to Aurangabad, 8.14 TMC water to Jayakwadi)

नाशिक जिल्ह्यावर सुरुवातीला रुसलेल्या पावसाने गेल्या आठ दिवसांपासून झोडपून काढले आहे. त्यामुळे नांदगाव, मनमाडला न भूतो, न भविष्यती असा पाऊस झाला. वालदेवी नदीला पूर आला. नाशिकमध्ये गोदावरीला वर्षातला पहिला पूर आला आहे. अजूनही गेल्या दोन दिवसांपासून पावसाची हजेरी सुरू आहे. सोमवारी दिवसभर शहरात पावसाची रिपरिप सुरू होती. मंगळवारी सकाळीही पावसाने भुरभुर हजेरी लावली. अजूनही ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पाऊस वाढण्याची शक्यता आहे. या दमदार पावसाने जिल्ह्यातील 24 पैकी 12 धरणांतून विसर्ग सुरू झाला आहे. गंगापूर धरण 98.56 भरले असून त्यातून सोमवारी यंदाच्या हंगामातील उच्चांकी 4009 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. दारणा धरणातून 7200 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातूनही 23 हजार 905 क्युसकेने गोदावरी पात्रात पाणी येत आहे. या विसर्गामुळे तसेच नांदूरमधमेश्वरमधून 94 हजार 254 क्यूसेक म्हणजे तब्बल 8.146 टीएमसी पाणी गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने झेपावले आहे. सध्या जायकवाडी 59.79 टक्के भरले आहे.

नाशिक, औरंगाबादची चिंता मिटली

नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरत आल्याने शहरवासीयांवरचे यावर्षीचे पाणी कपातीचे संकट मिटले आहे. अजूनही पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू राहणार असून, हे पाणी जायकवाडीला लाभदायक ठरणार आहे. जायकवाडीच्या धरणावर औरंगाबादचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांचा पाणीप्रश्न या पावसाने सुटणार आहे. विशेषतः जायकवाडीचे पाणी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यापर्यंत पोहचते. त्यामुळे गोदामाय असे प्रवाहित होणे आनंददायी ठरणार आहे.

तूट भरून निघणार

नाशिक जिल्ह्यात गेल्यावर्षी 13 सप्टेंबरपर्यंत जवळपास 95.71 टक्के पाऊस झाला होता. यंदा 84.54 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत जवळपास 15004.69 मिमी पावसाची अपेक्षा असतो. मात्र, यंदा सुरुवातीपासून पावसाने ओढ दिल्याने 13 सप्टेंबरपर्यंत 12684.8 मिमी पाऊस पडला. त्यामुळे अजूनही 11 टक्के पावसाची तूट आहे. मात्र, सप्टेंबर महिना पूर्ण होण्यास अजूनही पंधरा दिवस आहेत. अजूनही जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे ही तूट भरून निघण्याची शक्यता आहे. (Water released from 12 dams in Nashik district; Relief to Aurangabad, 8.14 TMC water to Jayakwadi)

इतर बातम्याः 

नाशिकमध्ये गोदावरीला वर्षातला पहिला पूर, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी

Nashikweather: नाशिक जिल्हा, खान्देशात पाऊस आजही जोरदार बॅटींग करण्याची शक्यता

Nashik is the best: लसीकरणाचा वारू चौखुर, अबब…25 लाख व्यक्तींनी घेतले डोस!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI