AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये गोदावरीला वर्षातला पहिला पूर, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी

मनोज कुलकर्णी, नाशिकः  नाशिकमध्ये (Nashikflood) गोदावरी (Godavari) नदीला वर्षातला पहिला पूर आला आहे. (Nashik heavy rain) सोमवारी (13 सप्टेंबर) दुपारपर्यंत पुराचे पाणी दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पोहचले होते. (The first flood of the year to Godavari in Nashik, water up to the waist of Dutondya Maruti) नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली […]

नाशिकमध्ये गोदावरीला वर्षातला पहिला पूर, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी
नाशिक गोदावरीला पूर.
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 1:04 PM
Share

मनोज कुलकर्णी, नाशिकः  नाशिकमध्ये (Nashikflood) गोदावरी (Godavari) नदीला वर्षातला पहिला पूर आला आहे. (Nashik heavy rain) सोमवारी (13 सप्टेंबर) दुपारपर्यंत पुराचे पाणी दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पोहचले होते. (The first flood of the year to Godavari in Nashik, water up to the waist of Dutondya Maruti)

नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 98 टक्के, दारणा धरण 97 टक्के, नांदूर-मधमेश्वर प्रकल्प 93, कश्यपी 73 टक्के आणि मुकणे, भाम, भावली, आळंदी अशी छोटी धरणे 100 टक्के भरली आहे. गंगापूर धरणातून सोमवारी (13 सप्टेंबर) सकाळी नऊ वाजता 2500 क्यसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. पालखखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पालखेड धरणातून 800 क्यूसेक्स पाणी सोमवारी (13 सप्टेंबर) आठ वाजता सोडण्यात आले. पावसाचा जोर आणि भरलेली धरणे पाहता अपेक्षेप्रमाणे गोदावरी नदीला पूर आला आहे.

रामकुंड, गोदाघाटवरील दुकाने हलविली

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. धरण भरत आले आहे. त्यामुळे गोदावरीला केव्हाही पूर येऊ शकतो. हे लक्षात घेता गोदाघाट परिसरातील, रामकुंड येथील दुकाने हलविण्यात आली आहेत. नागरिकांना नदीकाठी येऊ नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

वालदेवीच्या पुरात एक जण वाहून गेला

पावसाने वालदेवी नदीला पूर आला आहे. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दाढेगाव येथील वसंत लक्ष्मण गांगुर्डे (वय 45) हे वाहून गेले आहेत. ते सायंकाळच्या सुमारास पुलावरून जात होते. त्यावेळी ही घटना घडली. या नदीवरील पूल धोकादायक झाला आहे. येथून दाढेगाव, पाथर्डी, व पिंपळगाव खांब येथील नागरिकांची ये-जा सुरू असते. नदीचे पाणी वाढल्यास दाढेगावकडे जायचा मार्ग बंद होतो. त्यामुळे येथे नवा पूल उभारावा. तो उंच असावा, अशी मागणी तिन्ही गावातल्या गावकऱ्यांकडून होत आहे.

आज पावसाची शक्यता

नाशिक जिल्ह्यात सोमवार (13 सप्टेंबर) आणि मंगळवारी (14 सप्टेंबर) जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा तालुक्यात पावसाचा जोर वाढणार आहे. सोबतच खान्देशमध्येही पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आगामी दोन दिवसांत विदर्भासह नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (The first flood of the year to Godavari in Nashik, water up to the waist of Dutondya Maruti)

इतर बातम्याः 

Nashik weather:नाशिक जिल्ह्यात आज जोरदार, खान्देशमध्येही लावणार हजेरी

नाशिक जिल्ह्यात 820 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू, 3 लाख 97 हजार 268 ठणठणीत

नाशिक-पुणे आता पावणेदोन तासात, सेमी हायस्पीड रेल्वेचे काम सुसाट, 64 गावांतील मोजणी पूर्ण

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....