AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक जिल्ह्यात 820 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू, 3 लाख 97 हजार 268 ठणठणीत

नाशिक (Nashik) जिल्ह्यात सध्या 820 कोरोना (corona) रुग्णांवर उपचार सुरू असून, आजपर्यंत 3 लाख 97 हजार 268 रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 8 हजार 604 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या (District General Hospital) वतीने सोमवारी (13 सप्टेंबर) देण्यात आली.

नाशिक जिल्ह्यात 820 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू, 3 लाख 97 हजार 268 ठणठणीत
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 12:34 PM
Share

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यात सध्या 820 कोरोना (corona) रुग्णांवर उपचार सुरू असून, आजपर्यंत 3 लाख 97 हजार 268 रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 8 हजार 604 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या (District General Hospital) वतीने सोमवारी (13 सप्टेंबर) देण्यात आली. (In Nashik district, treatment is started on 820 corona patients)

सध्या नाशिक जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. महालक्ष्मी सणाच्या खरेदीसाठीही बाजारात मोठी गर्दी होत होती. मात्र, तूर्तास तरी कोरोनाची रुग्ण संख्या मर्यादित आहे. सध्या जिल्ह्यात आठशे वीस कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 29, बागलाण 28, चांदवड 38, देवळा 14, दिंडोरी 10, इगतपुरी 10, कळवण 08, मालेगाव 20, नांदगाव 14, निफाड 66, पेठ 01, सिन्नर 180, सुरगाणा 02, त्र्यंबकेश्वर 05, येवला 48 अशा एकूण 473 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रात309, मालेगाव महापालिका क्षेत्रात 21 तर जिल्ह्याबाहेरील17 रुग्ण आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत 4 लाख 6 हजार 692 रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, नाशिक ग्रामीणमध्ये काल एकूण 59 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यात नाशिक 06, बागलाण 01, चांदवड 01, दिंडोरी 01, मालेगाव ०५, नांदगाव ०१, निफाड १५, सिन्नर 22, सुरगाणा 01, त्र्यंबकेश्वर 02, येवला 04 या रुग्णांचा समावेश आहे.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमधे 96.99 टक्के, नाशिक शहरात 98.94 टक्के, मालेगावमध्ये 97.01 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.76 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.68 इतके आहे. नाशिक ग्रामीणमध्ये आतापर्यंत 4 हजार145, नाशिक महापालिका क्षेत्रातून 3 हजार 976, मालेगाव महापालिका क्षेत्रातून 357 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 604 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना नियमांचे पालन नाही

सध्या गणेशोत्सव आणि महालक्षीचा सण सुरू आहे. बाजारातही गर्दी वाढली आहे. अशोकस्तंभ, पंचवटी, कॉलेजरोड, शालिमार, अशोकामार्ग,  नाशिकरोड, द्वारकासह सर्व शहरात आणि तालुक्याच्या ठिकाणीही नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाही. बहुतांश जणांच्या चेहऱ्यावर मास्क नसतो. अनेक जण सुरक्षित अंतराचे पालन करतानाही दिसत नाहीत. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आलीच तर तिला आवरणे अवघड होणार आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 3 लाख 97 हजार 268 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 820 रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 42 ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 604 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. – डॉ. अनंत पवार, जिल्हा नोडल अधिकारी (In Nashik district, treatment is started on 820 corona patients)

इतर बातम्याः 

नाशिक-पुणे आता पावणेदोन तासात, सेमी हायस्पीड रेल्वेचे काम सुसाट, 64 गावांतील मोजणी पूर्ण

Nashik weather:नाशिक जिल्ह्यात आज जोरदार, खान्देशमध्येही लावणार हजेरी

NashikFlood:वालदेवीला पूर, एक जण गेला वाहून, गोदाकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.