बरसो रे मेघा मेघा…नाशिक, जळगावकरांना सुखवार्ता; धरणे काठोकाठ भरली!

यंदा नाशिकडे (Nashik) पाठ फिरवलेल्या वरुणराजाने सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यावर जोरदार कृपावृष्टी केली. त्यामुळे प्रमुख धरणांचा साठा तब्बल 90 टक्क्यांवर (dams overflow) गेला आहे. त्यामुळे जिल्ह्याची पाणीचिंता तूर्तास मिटली (water problem solved) आहे. तर दुसरीकडे जळगाव (Jalgoan) जिल्ह्यातली धरणेही तुडूंब भरली आहेत.

बरसो रे मेघा मेघा...नाशिक, जळगावकरांना सुखवार्ता; धरणे काठोकाठ भरली!
जोरदार पावसामुळे धरणे तुंडूंब भरली आहेत.

नाशिकः यंदा नाशिकडे (Nashik) पाठ फिरवलेल्या वरुणराजाने सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यावर जोरदार कृपावृष्टी केली. त्यामुळे प्रमुख धरणांचा साठा तब्बल 90 टक्क्यांवर (dams overflow) गेला आहे. त्यामुळे जिल्ह्याची पाणीचिंता तूर्तास मिटली (water problem solved) आहे. तर दुसरीकडे जळगाव (Jalgoan) जिल्ह्यातली धरणेही तुडूंब भरली आहेत. (Nashik, Jalgaon water problem solved, dams overflow in the district)

गंगापूर धरण 92 टक्के

नाशिक शहराची जीवनवाहिणी असणारे गंगापूर धरण 92 टक्के भरले आहे. दारणा धरण 96 आणि पालखेड धरण 91 टक्के भरले आहे. उर्वरित धरणांमध्ये आळंदी 100, वालदेवी धरण 100 टक्के भरले आहे. विशेष म्हणजे नेहमी दुष्काळ पाचवीला पुजलेले चणकापूर धरण हे 95 टक्के भरले आहे. हरणबारी 100 टक्के, पुनद 95 टक्के आणि माणिकपूंजही काठोकाठ भरले आहे.

नाग्यासाक्या 100 टक्के

मालेगाव आणि नांदगावमध्ये सतत दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने नाग्यासाक्या धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या या धरणातून 665 पाण्याचा पांझण नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या भागातील 42 खेडी योजनेतील गावांचा पिण्याचा पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.

कडवा ओसंडले

इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा येथील कडवा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे सिन्नरकरांची पाणी चिंता मिटली आहे. सिन्नरसाठीची पाणीपुरवठा योजना या धरणातून आहे. मंगळवारी दुपारी कडवा नदीत 150 क्यूसेक विसर्ग सुरू होता. 1924 दलघफू क्षमतेच्या कडवा धरणावर 88 किमी लांबीचा कालवा असून त्यामुळे इगतपुरी, नाशिक, सिन्नर, निफाड तालुक्यातील एकूण 19404 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते.

चणकापूर धरण 95 टक्के भरले

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे चणकापूर धरण 95 टक्के भरले आहे. तर पुनद धरण 92 टक्के भरले. सध्या चणकापूरमधून 800 क्यूसेकने, तर पुनदमधून नदीसाठी 1300 क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गिरणा व पुनद नदीला यंदा पहिल्यांदाच पूर आला आहे.

अजूनही वीस टक्के कमी

नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा वाढला आहेत. इतर धरणेही हळूहळू भरत आहेत. मात्र, अजूनही लहान-मोठ्या सर्व प्रकल्पांत मिळून गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्के पाणीसाठा कमीच आहे. सध्या या सर्व प्रकल्पात मिळून एकूण 69 टक्के पाणीसाठा आहे. मात्र, गेल्या वर्षी हाच साठा चक्क 89 टक्के होता.

जळगावमध्येही आनंदवार्ता

जळगाव जिल्ह्यातील धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अभोरा, मंगरुळ, सुकी, तोंडापूर, बोरी ही पाच धरणे तुडूंब भरली आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाचा साठा हा 60.84 वर गेला आहे. त्यामुळे शहरवासीयांची पाणीचिंता मिटली आहे.

हतनूरमधून विसर्ग सुरू

हतनूर धरणातून 27 हजार 210 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा 1027.10 दलघमी म्हणजेच 36.26 टीएमसी इतका आहे. मंगळवार अखेर पर्यंत या प्रकल्पांमध्ये 721.04 दलघमी म्हणजेच 25.46 टीएमसी उपयुक्त साठा आहे. हतनूर धरणात 4.68 टीएमसी, गिरणा 15.54 टीएमसी, तर वाघूर धरणात 5.24 टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. मोर प्रकल्पात 91.14 टक्के, बहुळा 76.60 टक्के, गूळ 72.10 टक्के, हिवरा 33.59, अंजनी 31.90 टक्के उपयुक्त साठा आहे.

 64.60 टक्के उपयुक्त साठा

जळगाव जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये 25.46 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. मध्य प्रकल्पांत 4.46 टीएमसी, तर लघु प्रकल्पांत 2.46 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये हतनूर, गिरणा, वाघूर हे 3 मोठे प्रकल्प आहेत. सोबतच अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गूळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे 13 मध्यम प्रकल्प आणि 96 लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा 1427.51 दलघमी म्हणजेच 50.40 टीएमसी इतका आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 64.60 टक्के इतका उपयुक्त साठा शिल्लक आहे. (Nashik, Jalgaon water problem solved, dams overflow in the district)

इतर बातम्याः 

Nashik Weather: नाशिकमध्ये दोन दिवस मोठा पाऊस नाही, पावसाळा लांबण्याची शक्यता

गुन्हेगारांच्या नाड्या आवळणारे पोलीस अधीक्षक पाटील यांच्यासाठी नाशिककर एकवटले

हिरव्यागच्च झाडाचा बहर गळून पडला, सुलोचना महानोर यांचे निधन

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI