AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिरव्यागच्च झाडाचा बहर गळून पडला, सुलोचना महानोर यांचे निधन

ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर (Na. Dho. Mahanor) यांच्या पत्नी सुलोचना महानोर (Sulochana Mahanor) यांचे शुक्रवारी (10 सप्टेंबर) पळसखेडा येथे निधन (passed away) झाले.

हिरव्यागच्च झाडाचा बहर गळून पडला, सुलोचना महानोर यांचे निधन
सुलोचना महानोर.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Sep 11, 2021 | 12:14 PM
Share

नाशिकः ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर (Na. Dho. Mahanor) यांच्या पत्नी सुलोचना महानोर (Sulochana Mahanor) यांचे शुक्रवारी (10 सप्टेंबर) पळसखेडा येथे निधन (passed away) झाले. त्या 79 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती ना. धों. महानोर, मुले डॉ. बाबासाहेब महानोर, गोपाळ महानोर व तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (Senior poet Na. Dho. Mahanor’s wife Sulochana Mahanor passed away on Friday, September 10)

सुलोचना महानोर यांच्यावर गेल्या पाच महिन्यांपासून जळगाव येथे उपचार सुरू होते. त्यांचे शुक्रवारी दुपारी 12 वाजता पळसखेडा येथील राहत्या घरी निधन झाले. सुलोचनाताईंचे निधन झाल्याची बातमी समजताच पंचक्रोशीतील नागरिकांनी पळसखेड्याकडे धाव घेतली. सुलोचनाताईंना महानोरांच्या घरी येणाऱ्या अनेक नवोदित कवी, लेखकांना मुलासारखा जीव लावला होता. त्यांना ही बातमी ऐकूण धक्का बसला. सुलोचनाताईंचा जन्म नांदगावचा. त्यांचे वडील त्र्यंबक गणपत मदने हे नांदगाव येथे रेल्वेत नोकरीला होते. ताईंचे प्राथमिक शिक्षणही नांदगावमध्ये झाले. ना. धों. महानोरांशी लग्न झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कवितेला बळ दिले. नांदगावचे वाचनालय खूप जुणे आहे. तिथे ना. धों. महानोरांशी सतत येणे जात होत असे. नांदगावशी जोडली गेलेली नाळ सुलोचनाताई आणि महानोरांनीही तुटू दिली नाही.

महानोरांना जपले

ना. धो. महानोरांना कवितेची आवड. ते नेहमी कविता करत असत. मात्र, त्यांच्या वडिलांना कविता आवडायच्या नाहीत. एका दिवशी महानोरांच्या वडिलांनी त्यांच्या कवितेच्या वह्या जाळून टाकल्या. याचा उल्लेखही महानोरांच्या कवितेत एका ठिकाणी येतो. तेव्हापासून सुलोचनाताईंनी महानोरांना जपले. त्यांच्या कवितेवर निरपेक्ष प्रेम केले. महानोरही आपल्या बोलण्यात याचा वारंवार उल्लेख करतात. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, भवरलाल जैन ते मोठ मोठे कवी, लेखक नेत्यांचा घरी राबता असायचा. सुलोचनाताईंनी मोठ्या कुशलेतेने संसाराचे गाडे हाकत महानोरांची कविता आणि शेतीवरचे प्रेम शेवटपर्यंत जपले.

महानोरांनी लिहिलेल्या अर्पणपत्रिकेची आठवण

ना. धों. महानोरांनी आपल्या पानझड या कवितासंग्रहाची अर्पणपत्रिका पत्नी सुलोचना महानोर यांना अर्पण केली आहे. त्यात ते म्हणतात,

प्रिय सौ. सुलोचना, निसर्गात जरी झाडाच्या आधारानं वेल वाढत असली तरी आपल्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात वेलीच्या आधारानंच झाड जगण्या-वाढण्याचं अघटित घडलं ते तुझ्यामुळंच …म्हणून हा संग्रह तुझ्यासाठीच.

– नामदेव

(Senior poet Na. Dho. Mahanor’s wife Sulochana Mahanor passed away on Friday, September 10)

इतर बातम्याः 

Nashik Weather: नाशिकमध्ये दोन दिवस मोठा पाऊस नाही, पावसाळा लांबण्याची शक्यता

नाशिकमध्ये ई बाइकला मागणी, सीएनजी कारला वर्षाची वेटिंग

नंदुरबारमध्ये शेतकऱ्याला चक्क सिंह आणि काही मिनिटांत बिबट्याची जोडी दिसल्याने खळबळ

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...