AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नंदुरबारमध्ये शेतकऱ्याला चक्क सिंह आणि काही मिनिटांत बिबट्याची जोडी दिसल्याने खळबळ

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या तळोद्यात एका शेतकऱ्याने (farmer) सिंह (lion) आणि काही क्षणांत बिबट्याची जोडी (leopards) पाहिल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. वन्यजीव पथकाने तातडीने घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. संबंधित प्राण्याच्या पायाच्या ठशांचे नमुनेही घेतले आहेत.

नंदुरबारमध्ये शेतकऱ्याला चक्क सिंह आणि काही मिनिटांत बिबट्याची जोडी दिसल्याने खळबळ
संग्रहित.
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 5:31 PM
Share

नाशिकः नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या तळोद्यात एका शेतकऱ्याने (farmer) सिंह (lion) आणि काही क्षणांत बिबट्याची जोडी (leopards) पाहिल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. वन्यजीव पथकाने तातडीने घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. संबंधित प्राण्याच्या पायाच्या ठशांचे नमुनेही घेतले आहेत. (In Nandurbar, a farmer saw a lion, two leopards were also seen, fear in the area, inspection by forest department)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी (9 सप्टेंबर) सकाळी उमाकांत शेडे हे शेतात होते. त्यांना पहाटे 6 च्या सुमारास शेताच्या बांधावर सिंहाचे दर्शन झाले. त्यामुळे त्यांची भीतीने गाळण उडाली. या सिंहाने चक्क तासभर या ठिकाणीच ठाण मांडले होते. त्यामुळे शेडे यांना हालचालही करता आली नाही. ते फक्त त्याच्याकडे एकटक बघत बसले. थोडीही हलचाल केल्यास सिंहाने झेप घेतली तर कसे, या विचाराने त्यांनी डोळ्यांसमोर मरण पाहिले. सिंह गेल्यानंतर काही मिनिटांत एक बिबट्या नर आणि मादी एका झाडावरून उतरल्याचेही त्यांना दिसले. अवघ्या काही मिनिटांत तीन हिंस्त्र प्राणी पाहिल्याने त्यांच्या हाता-पायातले त्राण हरपले. त्यांनी तातडीने घर गाठत आपल्या मुलांना ही माहिती दिली. बघता-बघता ही बातमी सगळीकडे पसरली. मुलांनी वनविभागालाही कळवले. त्यानंतर वनक्षेत्रपाल नीलेश रोडे यांनी वनरक्षक वीरसिंग पावरा, गिरधर पावरा, वासुदेव माळी यांच्यासह घटनास्थळ गाठले. या भागाची पाहणी केली. तिथे असलेल्या प्राण्यांच्या ठशांचे नमुने घेतले.

पायाचे ठसे मोठे

पथकाने बिबट्यांच्या पायांच्या ठशाचे नमुने घेतले. मात्र, यातील बांधावर उभ्या असललेल्या प्राण्याच्या पायाचे ठसे मोठे आढळले आहेत. त्यामुळे हा सिंह असल्याची शक्यता वनविभागातील कर्मचारीही व्यक्त करत आहेत. आता या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावण्यात येणार आहे. वरिष्ठांशी बोलून पिंजराही लावण्यात येणार आहे. या प्राण्यांना तात्काळ पकडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बिबट्याचे नेहमीच दर्शन

तळोद्यात गेल्या शनिवारी 4 सप्टेंबर चक्क शहराजवळ बिबट्या दिसला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये आधीची भीती होती. आता बिबट्याच्या जोडप्यासोबत सिंहही दिसल्याने नागरिकांची गाळण उडाली आहे. या भागात अनेकांची शेती आहे. बिबट्याच्या वावरामुळे काम करण्यासाठी शेतकऱ्यांना मजूरही मिळत नाहीत. त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे. (In Nandurbar, a farmer saw a lion, two leopards were also seen, fear in the area, inspection by forest department)

इतर बातम्याः

नाशिकमध्ये सोने 47600 वर, चांदी 1300 रुपयांनी महाग

त्र्यंबकबाबा महाराज यांचे निधन, राज्यभरातील भक्त शोकाकुल

नाशिकमध्ये विभागीय आयुक्तांच्या बनावट सहीचा वापर करत घातला २१ लाखांचा गंडा

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.