नांदगाव, मनमाडला पावसाचा तडाखा; लेंडी, शाकंभरीला पूर, पाझर तलाव फुटला

पाठ फिरवलेल्या पावसाने अखेर मनावर घेत नाशिकजवळच्या (Nashik) नांदगाव, मनमाडमध्ये (Nandgaon, Manmad) दुपारपासून जोरदार (Heavy rains) हजेरी लावली. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या लेंडी आणि शाकंभरी नदीला पूर आला आहे, तर तालुक्यातील सोकोरा येथील पाझर तलाव फुटल्याने अनेक हेक्टरवरील शेतात पाणी साचले आहे.

नांदगाव, मनमाडला पावसाचा तडाखा; लेंडी, शाकंभरीला पूर, पाझर तलाव फुटला
लेंडी, शांकभरीला पूर.
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 5:15 PM

नाशिकः पाठ फिरवलेल्या पावसाने अखेर मनावर घेत नाशिकजवळच्या (Nashik) नांदगाव, मनमाडमध्ये (Nandgaon, Manmad) दुपारपासून जोरदार (Heavy rains) हजेरी लावली. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या लेंडी आणि शाकंभरी नदीला पूर आला आहे, तर तालुक्यातील सोकोरा येथील पाझर तलाव फुटल्याने अनेक हेक्टरवरील शेतात पाणी साचले आहे.  (Heavy rains in Nandgaon, Manmad; rivers flooded, lakes burst)

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांवर वरुण राजाची कृपादृष्टी झाली आहे. दोन दिवसांपासून शहर आणि परिसरात पावसाची रिमझिम सुरू आहे. नांदगाव आणि मनमाडला परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. काल दुपारपासून आतापर्यंत तब्बल 123 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे . शहरातून वाहणाऱ्या लेंडी आणि शाकंभरी नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी शहरातील सखल भागातील घरे आणि दुकानांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझडही झाली आहे. दरम्यान, तालुक्यातील सोकोरा येथील पाझर तलाव फुटल्याने अनेक हेक्टरवरील शेतात पाणी साचले आहे. पिकांचे नुकसान झाले असून, सध्या तरी जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, नुकसानग्रस्त भागाला नगराध्यक्ष बबी कवडे यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. पुढील काही काळ सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

मनमाडला तासात 21 मिमी

मनमाड शहराला मंगळवारी दुपारी पावसाने झोडपून काढले. एका तासात सुमारे 21 मिमी पाऊस झाला. या पावसाने शेतकरी सुखावला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरू होता. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांना फायदा होणार आहे.

पावसाचा इशारा

दरम्यान, नाशकात आजही हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सध्या दक्षिण छत्तीसगढ आणि आसपासच्या परिसरात चक्रीय चक्रवात स्थिती आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात जोरदार पाऊस होत आहे. राज्यात आठ आणि नऊ सप्टेंबर हे दोन दिवस जोरदार पावसाचे सांगण्यात आले आहेत. नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला अतिवृष्टीचा हाय ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसामुळे अनेकांची शेती पाण्याखाली गेली आहे. अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्यातरी जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. – प्रदीप पाटील, तहसीलदार, नांदगाव (Heavy rains in Nandgaon, Manmad; rivers flooded, lakes burst)

इतर बातम्याः

पाझर तलावाचे पाणी शेतात घुसले, दहा एकरांवरील लाखोंचे पीक वाहून गेले

बाजेच्या पायाला ट्यूब बांधून पुरातून काढला मार्ग, पण उपचाराविना मुलीने सोडले प्राण!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.