Maharashtra Rain Live Updates | बाम्हणी-वलखेड ओढ्यात वाहून गेलेल्या तिघांना वाचवण्यात यश, एकाचा शोध शुरु

| Updated on: Sep 08, 2021 | 12:59 AM

आगामी दोन ते तीन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने याबाबत अंदाज वर्तवला आहे. बंगाल सागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्याची दिशा वेस्ट नार्थ वेस्ट असल्यानं त्याचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात असेल.

Maharashtra Rain Live Updates | बाम्हणी-वलखेड ओढ्यात वाहून गेलेल्या तिघांना वाचवण्यात यश, एकाचा शोध शुरु
Ratnagiri Rain

आगामी दोन ते तीन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने याबाबत अंदाज वर्तवला आहे. बंगाल सागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्याची दिशा वेस्ट नार्थ वेस्ट असल्यानं त्याचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात असेल. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर टप्प्या टप्प्याने याचा प्रभाव असेल. दोन ते तीन दिवसांत मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुसळधार आणि अतिमूसळधार पाऊस असेल. त्याचा सर्वात जास्त प्रभाव नार्थ कोकणात असेल. ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई या ठिकाणी मुसळधार आणि अतिमूसळधार पाऊस पडेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने वर्तवला आहे. वर्तवली आहे.

चिपळूण परिसरात गेल्या 16 तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे चिपळूणकरांनाही रात्र जागून काढावी जागली. शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरलं आहे. चिपळूणमध्ये असाच पाऊस सुरू राहीला, तर मात्र समुद्र भरतीच्या वेळी शहरात पाणी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे चिपळूण नगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन समिती व मदतकार्य यांचे नियोजन जाहीर केलीये.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Sep 2021 11:17 PM (IST)

    बाम्हणी-वलखेड ओढ्यात वाहून गेलेल्या तिघांना वाचवण्यात यश, एकाचा शोध शुरु

    जालना :  परतूर तालुक्यातील बाम्हणी-वलखेड या ओढ्याच्या पुरामध्ये 4 जण वाहून गेले होते. या 4 पैकी 3 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र 2 तासाxपासून आसाराम खालापूरे या पुरात वाहून गेल्याने व्यक्तीचा शोध सुरू आहे. अंधार असल्याने शोध कार्यात अडचण येत आहे. तरी यंत्रणा या व्यक्तीचा शोध घेत आहे.

  • 07 Sep 2021 11:15 PM (IST)

    6 दिवसापासून वाहून गेलेला मृतदेह सापडला अन् पुन्हा झाला गायब, अकोल्यात दोन पोलिसांचे निलंबन  

    अकोला : गेल्या 6 दिवसापासून दर्शन शुक्ला याचा वाहून गेलेला मृतदेह सापडला

    मात्र, पोलिसांच्या ताब्यातून गायब झाला

    आता या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली

    हे दोन्ही पोलिस कर्मचारी उरळ पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत

    झाकर्डे आणि नेमाडे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहे

  • 07 Sep 2021 10:31 PM (IST)

    जालन्यातील अंबड शहरात पावसामुळे अनेक दुकानात पाणी शिरले

    जालना : जालना जिल्ह्यातील अंबड शहरात पावसामुळे अनेक दुकानात पाणी शिरले आहे. मेन रोड अंबड, सराफा मार्केट, कोर्ट रोड अनेक सखल भागात पाणी साचल्याने व्यपाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पावसामुळे अनके वाहने अडकली आहेत

  • 07 Sep 2021 10:30 PM (IST)

    हिंगोलीत 23 वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात बेपत्ता

    हिंगोली- 23 वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात बेपत्ता

    शेतातून घरी परतत असताना बेपत्ता

    कळमनुरी तालुक्यातील कामठा फाटा ते एलकी रस्त्यातील ओढ्यावरून बेपत्ता

    लखन गजभारे अस 23 वर्षीय तरुणाचं नाव

  • 07 Sep 2021 09:18 PM (IST)

    नवी मुंबई, पनवेलमध्ये जोरदार पावसाला सुरुवात

    नवी मुंबई, पनवेलमध्ये जोरदार पावसाला सुरुवात

    गेले अनेक दिवस दडी मारलेल्या पावसाची पुन्हा एकदा हजेरी

    रायगडच्या जिल्हाधिकारी यांनी दिला सतर्कतेचा इशारा

    अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क राहा : जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

  • 07 Sep 2021 09:18 PM (IST)

    मनमाड तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार, नांदगांव तालुक्यातील दरेलमध्ये तलाव फुटला

    मनमाड : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नांदगांव तालुक्यातील दरेल या ठिकाणी नाला बरडींग(छोटा तलाव) फुटला

    संध्याकाळीच्या सुमारास फुटला तलाव

    तलावाचे पाणी शिरले शेतात

    पाणी शिरल्याने पिकांचे झाले नुकसान

    अस्मानी संकटाने बळीराजा पुन्हा हवालदिल

  • 07 Sep 2021 07:23 PM (IST)

    येत्या 9 सप्टेंबरपासून पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता

  • 07 Sep 2021 07:19 PM (IST)

    बीड जिल्ह्यात अतिवृष्टी, पुराचे पाणी नंदपूर गावात शिरले

    बीड: बीड जिल्ह्यात अतिवृष्टी

    गेवराई तालुक्यातील भेंड खुर्द येथील दोन पाझर तलाव फुटले

    पुराचे पाणी नंदपूर गावात शिरले

    शेकडो एकर शेतीवरील पिके वाहून गेली

  • 07 Sep 2021 06:16 PM (IST)

    केज तालुक्यातील वाघेबाभुळगाव नदीला पूर, पुलावरून प्रवास करताना कार गेली वाहून

    बीड: केज तालुक्यातील वाघेबाभुळगाव नदीला पूर

    पुलावरून प्रवास करताना कार वाहून गेली

    कारमधील चालक वाहून गेला

    वाहताना चालक झाडाला पकडल्याने जीव वाचला

    कार वाहतानाची थरारक दृश्ये मोबाईल कॅमेरात कैद

  • 07 Sep 2021 06:15 PM (IST)

    अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    अमरावती :अमरावती जिल्ह्यासह शहरांमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून अमरावती शहरातील राजकमल चौकातील मुख्य मार्केटमध्ये पाणी शिरले. त्यामुळे येथे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या मार्केटमध्ये 25 पेक्षा जास्त मोबाईलचे दुकान असून त्या मोबाईलच्या दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संपूर्ण मोबाईल खराब झाले

  • 07 Sep 2021 05:14 PM (IST)

    लातुरमधील रेणा प्रकल्पाचे सहाही दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    लातुर- रेणा प्रकल्पाचे सहाही दरवाजे उघडले

    रेणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    रेणापूर तालुक्यातील रेणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला

  • 07 Sep 2021 04:28 PM (IST)

    नांदेडमध्ये विष्णुपुरी बंधाऱ्याचे 12 दरवाजे उघडले, नदीकाठच्या लोकांना अतिसावधानतेचा इशारा 

    नांदेड: सुमारे सोळा वर्षानंतर आज झालाय नांदेडमध्ये सर्वाधिक पाऊस

    पावसामुळे विष्णुपुरी बंधाऱ्याचे 12 दरवाजे उघडले

    यापूर्वी 16 वर्षांपूर्वी उघडले होते 12 दरवाजे

    नदीकाठच्या लोकांना अतिसावधानतेचा इशारा

  • 07 Sep 2021 04:17 PM (IST)

    अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात

    अहमदनगर : जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात

    सकाळपासून होते ढगाळ वातावरण

    जोरदार पावसामुळे नगर शरतील सखोल भागात पाणी साचले

    तर उकाड्यापासून नागरिकांची सुटका

  • 07 Sep 2021 04:07 PM (IST)

    जळगावमधील बहूळा धरण 100 टक्के भरले, 9 दरवाजे उघडले

    जळगाव – बहूळा धरण 100 टक्के भरले

    धरणात पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणाचे 9 दरवाजे उघडले असून विसर्ग सुरू

  • 07 Sep 2021 02:24 PM (IST)

    Guhagar Rain Update | गुहागर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले, पालशेत पूल पाण्याखाली, 26 गावांचा संपर्क तुटला

    रत्नागिरी – गुहागर तालुक्याला देखील मुसळधार पावसाने झोडपले

    पालशेत पूल पाण्याखाली 26 गावांचा संपर्क तुटला

    गुहागर-रत्नागिरी मार्ग देखील पाण्याखाली

    गुहागर आरे पुलावरून पाणी त्यामुळे धोपवेकडे जाणारामार्ग बंद

    गुहागर एसटी स्टँड परिसरात देखील पाणी साचलं

  • 07 Sep 2021 02:05 PM (IST)

    Nanded Rain Update | नांदेडमध्ये पावसाचा जोर वाढला, गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ

    नांदेडमध्ये पावसाचा जोर वाढला असून गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झालीये

    विष्णुपुरी बंधाऱ्याचे आता 11 दरवाजे उघडण्यात आल्याने नदीच्या पात्रातील पाणी वाढलंय

    नांदेड शहरातील होळी भागातील गोदावरी नदिवरचा छोटा पूल पाण्याखाली गेलाय

    2005 साली आलेल्या पुरासारखी स्थिती आता नांदेडमध्ये निर्माण झालीये

    आता पावसाने उसंत दिली नाही तर नांदेड शहरातील नदीकाठच्या नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो

    त्यामुळे नांदेडकरांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केलंय

  • 07 Sep 2021 01:53 PM (IST)

    Ratnagiri Rain Update | मुसळधार पावसाचा फटका, गुहागर- रत्नागिरी मार्गावरील वाहतूक बंद

    रत्नागिरी – मुसळधार पावसाचा फटका, गुहागर- रत्नागिरी मार्गावरील वाहतूक बंद

    आबलोली जवळील एका वळणावर नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक झाले ठप्प

    गेल्या दोन तासापासून वाहतूक ठप्प वाहनांच्या लांबच्या लांब रांगा

  • 07 Sep 2021 01:24 PM (IST)

    Yavatmal Rain Update | यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या बेंबला धरणाचे 14 दरवाजे उघडले

    यवतमाळ –

    यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या बेंबला धरणाचे 14 दरवाजे उघडले

    50 सेमी ने 14 दरवाजे उघडले

    742 घनमीटर प्रतिसेकंद एतका पाण्याचा विसर्ग

    नदीकाठच्या गावांना सतर्कता दिला ईशारा

    बाभूळगाव, कलंब, राळेगाव, मारेगाव ,या भागातील पाणी पातळीत होणार वाढ

  • 07 Sep 2021 12:27 PM (IST)

    Ahmednagar Rain Update | पारनेर तालुक्यातील उत्तरेतील गावांमध्ये मुसळधार पाऊस

    अहमदनगर

    पारनेर तालुक्यातील उत्तरेतील गावांमध्ये मुसळधार पाऊस

    शेतात पाणी साचल्याने पिकांचं मोठं नुकसान तर गावाला जोडणारे दोनन पूल गेले वाहून

    पळशी ते वनकुटे दरम्यात पळशी गावाजवळील ओढ्यावरील एक पूल तर वनकुटे ते ढवळपुरीला जोडणाऱ्या काळुनदीवरील पुलच गेला वाहून

    तरी ढवळपुरी मार्गे जाणाऱ्या सर्व दोन आणि चारचाकी वाहनांनी जाऊ नये सरपंच राहुल झावरे यांनी केले गावकऱ्यांना अहवान

    तर पारनेर तालुक्यातील तास ओहोळ तलाव 98%भरले

  • 07 Sep 2021 12:26 PM (IST)

    Hingoli rain update | सिद्धेश्वर धरणाचे 6 दरवाजे उघडे

    हिंगोली –

    सिद्धेश्वर धरणाचे 6 दरवाजे उघडे

    5 हजार 824 क्युसेसन पूर्णा नदी पात्रात पाण्याचा वीसर्ग सुरू

    पूर्णा नदीकाठच्या 30 गावांना सतर्कतेचा इशारा

  • 07 Sep 2021 12:25 PM (IST)

    यवतमाळ शहरासह जिल्हाभरात आज सकाळपासून संततधार पावसाची रिपरिप सुरू

    यवतमाळ –

    यवतमाळ शहरासह जिल्हाभरात आज सकाळपासून संततधार पावसाची रिपरिप सुरू

    काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात हलका पाऊस

    संततधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत

  • 07 Sep 2021 12:24 PM (IST)

    Aurangabad Rain Update | कन्नडच्या नागद घाटात पुन्हा कोसळली दरड

    औरंगाबाद –

    कन्नडच्या नागद घाटात पुन्हा कोसळली दरड

    गौताळा अभयारण्यातील नागद घाटात कोसळली दरड

    दरड कोसळल्यामुळे नागद घाट झाला पूर्णपणे बंद

    कन्नड चाळीस गाव घाटानंतर आता नागद घाटही झाला बंद

    जळगाव चाळीसगाव धुळे वरून येणाऱ्या वाहनांसाठी झाला रस्ता बंद

    कन्नड चाळीसगाव घाट बंद झाल्यामुळे नागद घाटाचा सुरू होता वापर

    नागद घाट बंद झाल्यामुळे रहदारीचे दोन्ही महत्वाचे रस्ते झाले बंद

  • 07 Sep 2021 11:57 AM (IST)

    Chiplun Rain Update | चिपळूण शहरातील प्रशासकीय यंत्रणा कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज

    हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर चिपळूण शहरातील प्रशासकीय यंत्रणा कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज झाली असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते. याठिकाणी चिपळूण नगरपालिका आणि प्रशासनाने नागरिकांना मदतीसाठी संपर्क क्रमांक ही जाहीर केले आहेत. तर काही ठिकाणी बोटी सुद्धा आणून ठेवलेत आणि NDRF पथक सुध्दा  चिपळूणमध्ये मदतकार्यासाठी दाखल झाल्याचं तहसीलदार त्यांनी सांगितलं.

  • 07 Sep 2021 11:16 AM (IST)

    Nanded Rain Update | मुसळधार पावसाने नांदेड जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले

    मुसळधार पावसाने नांदेड जिल्ह्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले

    त्यामुळे जिल्ह्यात आज सर्वत्र वाहतुकीचा खोळंबा उडालाय

    भोकर, हदगाव, हिमायतनगर, मुखेड आणि अर्धापुरमध्ये पावसाने कहर केलाय

    त्यामुळे या पाचही तालुक्यातील अनेक रस्त्यावरून पाणी वाहतेय

    रस्ते बंद असल्यामुळे जिल्हाभरात आज दुधासह वर्तमानपत्रे अनेक भागात पोहोचले नाहीत

    आता पावसाचा जोर ओसरला असला तरी ढगाळ हवामान कायम आहे

    या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय

  • 07 Sep 2021 10:57 AM (IST)

    Maharashtra Rain Updates : राज्यात ठिकठिकाणी पाऊस, कुठं मुसळधार, तर कुठं सर्वदूर रिमझिम

  • 07 Sep 2021 10:57 AM (IST)

    Gondia Rain Update | गोंदियामध्ये जोरदार पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा

  • 07 Sep 2021 10:52 AM (IST)

    Aurgabad weather: शहरात सकाळपासूनच रिमझिम पाऊस, आजही सूर्यदर्शन नाही, मुसळधार पावसाची शक्यता

  • 07 Sep 2021 10:51 AM (IST)

    Nagpur Rain Update | नागपूरसह परिसरात मुसळाधार पाऊस

    नागपूरसह परिसरात मुसळाधार पाऊस

    काल रात्री नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागात मुसळाधार पाऊस पडला

    आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान आणि धुक्याची चादर आहे

    शिवाय हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत मुसळाधार पावसाला सुरुवात झालीये

  • 07 Sep 2021 10:50 AM (IST)

    Buldhana Rain Update | बुलडाणा जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस तर काही भागात रिमझिम पाऊस सुरु

    बुलडाणा जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस तर काही भागात रिमझिम पाऊस सुरु

    यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत

    तर शेतकरी सुद्धा आनंदित झाले आहेत, पिकांना जीवदान मिळालंय

    खामगाव तालुक्यात ही मुसळधार पाऊस सुरू असून फरशी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे आणि सुटाळपुरा रस्त्यावरुनही पाणी वाहत आहे

    पुराचे पाणी वाढत चालले असून जुन्या शहरातील लोकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे

    तर जिल्ह्यातही अनेक नाल्यांना पूर आलाय

    महत्वाचे म्हणजे धरण क्षेत्रात ही पाणी पातळी वाढली असून पिण्याची पाणी टंचाई मिटणार आहे

    खडकपूर्णा प्रकल्पाचे 11 दरवाजे उघडले असून पाण्याचा विसर्ग सुरु आहे

    त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय

  • 07 Sep 2021 10:48 AM (IST)

    Manmad Rain Update | मनमाड शहर परिसरात सकाळ पासून पावसाची रिपरिप सुरू

    मनमाड – मनमाड शहर परिसरात सकाळ पासून पावसाची रिपरिप सुरू

    वापसमुळे जनजीवन झाले विस्कळीत

  • 07 Sep 2021 10:43 AM (IST)

    Chiplun Rain Update | चिपळूण शहरात NDRF चे पथक दाखल

    रत्नागिरी – चिपळूण शहरात NDRF चे पथक दाखल

    25 जवान 4 बोटीसह दाखल

    चिपळूण परिसरातील पाऊस थांबला

  • 07 Sep 2021 10:42 AM (IST)

    Sangmeshwar Rain Update | संगमेश्वरमधील गड नदीला पूर

    रत्नागिरी- संगमेश्वरमधील गड नदीला पूर

    गडनदीचे पाणी शिरले माखजन बाजारपेठत

    माखजन बाजारपेठत चार ते पाच फूट पाणी

    दुकानात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ

  • 07 Sep 2021 10:41 AM (IST)

    Solapur Rain Update | सोलापूर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे सर्व ओढे नाले भरून वाहू लागले आहेत

    सोलापूर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे सर्व ओढे नाले भरून वाहू लागले

    सीना नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे बंधारे गेले पाण्याखाली

    उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी – राळेरास गावाला जाणारा रस्ता ओढ्यावरुन दोन फूट वाहू लागले

    दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक बंधारे  गेले पाण्याखाली

    हत्तुर ,वडकबाळ ,राजुर, बंदगी ,संगवड औराद अशा अनेक गावांमधील शेतांमध्ये पाणी

  • 07 Sep 2021 10:40 AM (IST)

    Hingoli Rain Update |हिंगोलीत दर्शनासाठी गेलेले भाविक अडकले, मारोती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा

    हिंगोली – दर्शनासाठी गेले भाविक अडकले मारोती मंदिरात

    मारोती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा

    कळमनुरी तालुक्यातील चिखली गावातील प्रकार..

Published On - Sep 07,2021 10:38 AM

Follow us
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...