बाजेच्या पायाला ट्यूब बांधून पुरातून काढला मार्ग, पण उपचाराविना मुलीने सोडले प्राण!

सात्री (ता. अमळनेर) गावात याच पुराच्या पाण्याने एका आजारी मुलीची वाट आडवली. गावकऱ्यांनी नाना प्रयत्न केले. चक्क बाजेच्या पायाला हवा भरलेला ट्यूब बांधून पट्टीच्या पोहणाऱ्यांनी मुलीला घेऊन पैलतीर गाठला. मात्र, उपचार न मिळाल्यामुळे (without treatment) मुलीने वाटेतच जीव सोडल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे.

बाजेच्या पायाला ट्यूब बांधून पुरातून काढला मार्ग, पण उपचाराविना मुलीने सोडले प्राण!
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 12:19 PM

नाशिकः नाशिकला (Nashik Rain) अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा असताना दुसरीकडे जळगावला (Jalgoan Flood) तुफान पावसाने झोडपले आहे. अनेक गावे पुराच्या पाण्याने वेढली आहेत. त्यात सात्री (ता. अमळनेर) (Amalner) गावात याच पुराच्या पाण्याने एका आजारी मुलीची वाट आडवली. गावकऱ्यांनी नाना प्रयत्न केले. चक्क बाजेच्या पायाला हवा भरलेले ट्यूब बांधून पट्टीच्या पोहणाऱ्यांनी मुलीला घेऊन पैलतीर गाठला. मात्र, उपचार न मिळाल्यामुळे (without treatment) मुलीने वाटेतच जीव सोडल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. (The way out of the flood, but the girl left life without treatment)

गेल्या दोन दिवसांपासून अमळनेर तालुक्यात तुफान पाऊस सुरू आहे. तामसवाडी धरण भरले असून, धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. बोरी नदीला पूर आल्याने ती ओसंडून वाहत आहे. सात्री गावालाही या पुराने वेढा दिला आहे. सात्री गावातली आरुषी सुरेश भिल (वय 13) गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होती. त्यातच मंगळवारी (7 सप्टेंबर) तिची तब्येत आणखी खालावली. त्यामुळे तिला रुग्णालयात नेण्याचे ठरले. मात्र, गावाला पुराचा वेढा. त्यामुळे आरुषीला कसे न्यायचे हा प्रश्न होता. काही निधड्या छातीच्या तरुणांनी पुराच्या पाण्यातून नेऊन प्रयत्नांची शिकस्त करण्याचा निर्धार केला. बाजेला हवा भरलेले ट्यूब बांधले. पट्टीच्या चार पोहणाऱ्यांनी या बाजेवर आरुषीला बसवून तिच्या जीवासाठी पाण्यातून मार्ग काढला. मात्र, या प्रवासातच आरुषीला मोठी उचकी आली. त्यातच तिने जीव सोडला. तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. केवळ गावाला रस्ता नसल्यामुळे मुलीवर उपचार झाले नाहीत. त्यामुळे तिला जीव सोडावा लागल्याबद्दल पंचक्रोशीत हळहळ आणि गैरसोयीबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

मृतदेह नेला प्रांत कार्यालयात

सात्री गावाला बोरी नदीच्या पाण्याचा विळखा पडला आहे. मुलीचा मृतदेह पाण्यातून कसा न्यायचा, गावात अंत्यसंस्कार कसे करायचे, असा प्रश्न कुटुंबासमोर आणि गावकऱ्यांसमोर होता. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी पालकांसह मतृदेह घेऊन प्रांत कार्यालय गाठले. गावाला जाण्याची सोय जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली.

मात्र सोय झालीच नाही

आरुषीचा मृतदेह गावात नेण्यासाठी प्रशासनाने सोय करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. मात्र, तालुक्यात डिझेल इंजीन असलेली होडी नाही. त्यामुळे मृतदेह गावात नेण्यासाठी सोय करणे शक्य नाही म्हणत प्रशासनाने हात वर केले. दुपारी चारपर्यंत प्रशासनाने कसलीच सोय केली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी आलेल्या मार्गाने गाव मृतदेहासह गाव गाठला. (The way out of the flood, but the girl left life without treatment)

इतर बातम्याः 

काळजाचा ढोल, श्वासाच्या झांजा; नाशकात फेटेधारी दगडू शेट यांच्या मूर्तीला तुफान मागणी

बार सुरू होतात तर मग मंदिरांना प्रोटोकॉल नाहीत का? मंदिर उघडण्याबाबत राज्यानं स्वत: निर्णय घ्यावा : भारती पवार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.