AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बार सुरू होतात तर मग मंदिरांना प्रोटोकॉल नाहीत का? मंदिर उघडण्याबाबत राज्यानं स्वत: निर्णय घ्यावा : भारती पवार

भारती पवार यांनी यावेळी आरोग्य सेवक नेमणूक, आरोग्य व्यवस्था, महाराष्ट्रातील मंदिर उघडण्यासंदर्भातील भूमिका, कोरोना विषाणू संसर्गाती तिसरी लाट आणि महिला सुरक्षा आदी मुद्यांवर भाष्य केलं.

बार सुरू होतात तर मग मंदिरांना प्रोटोकॉल नाहीत का? मंदिर उघडण्याबाबत राज्यानं स्वत: निर्णय घ्यावा : भारती पवार
भारती पवार
| Edited By: | Updated on: Sep 06, 2021 | 6:57 PM
Share

नाशिक: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. भारती पवार यांनी यावेळी आरोग्य सेवक नेमणूक, आरोग्य व्यवस्था, महाराष्ट्रातील मंदिर उघडण्यासंदर्भातील भूमिका, कोरोना विषाणू संसर्गाती तिसरी लाट आणि महिला सुरक्षा आदी मुद्यांवर भाष्य केलं. महाराष्ट्रात मंदिर बंद असल्यानं भारती पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

तिसऱ्या लाटेमुळं आरोग्य सेवकांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय

राज्य सरकारकडे 3207 आरोग्य सेवकांची परवानगी मागितली होती. 2610 कर्मचाऱ्यांना सेवा परवानगी मिळाली होती. यामध्ये 597 नावं वगळण्यात आली होती. मात्र, या सर्व सेवकांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कोव्हीडच्या वातावरणात 597 कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासू शकते. काही पीएसी ला कमी डिलिव्हरी झाल्याने या आरोग्य कर्मचाऱयांना सेवेतून वगळण्यात आले होते, असं भारती पवार म्हणाल्या.

कोरोना नियमांचं पालन करुन सण साजरे करा

कोरोना नियम पाळून सण साजरे करायला पाहिजे. गणेशोत्सवाचा उद्देशचं प्रबोधन करणे हा आहे. कोव्हिडं बाबत गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधन व्हावे. ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करावी, असं भारती पवार म्हणाल्या.

मंदिर सुरु करण्याबाबत राज्यानं निर्णय घ्यावा

बार सुरू होतात तर मग मंदिरांना प्रोटोकॉल नाहीत का? कमी लोकांमध्ये मंदिर उघडण्यास काय हरकत आहे. राज्याने मंदिर उघडण्याबाबत केंद्रावर अवलंबून न राहता स्वतः निर्णय घ्यावेत, असं भारती पवार म्हणाल्या. कोव्हिडं मध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण येऊ नये, असं भारती पवार म्हणाल्या.

महिला अधिकाऱ्यांना त्रास देण्याची प्रवृत्ती वाढलीय

महाराष्ट्रात महिला सुरक्षेच्या प्रश्नावर अनेक आंदोलन केले. महिला अधिकाऱ्यांना त्रास देण्याची प्रवृत्ती वाढत असताना राज्य सरकार काहीच करत नाही. सरकार माता भगिनींच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहे. करुणा शर्मा प्रकरणाबाबत काही माहिती नाही, मी बोलणार नाही, असं भारती पवार म्हणाल्या.

भेसळ करणाऱ्यांना अन्न औषध प्रशासनाचा इशारा

आगामी गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर मिठाई मध्ये भेसळ करणाऱ्या दुकांनदारांना अन्न औषध प्रशासनाने कारवाईची तंबी दिली आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यातील मिठाई व्यसायिकांना एकत्र बोलवत अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी उत्पादन दिनांक आणि एक्सपाईरी डेट अन्नपदार्थाच्या बॉक्सवर ठळकपणे दिसेल अशा प्रकारे छापव्या तसेच स्वच्छतेबाबत अधिक गंभीर राहण्याच्या सूचना दिल्या.या शिवाय जे व्यावसायिक भेसळ करतील किंवा शासनाच्या नियमांचे पालन करणार नाही अशा व्यावसायिकांवर पाच ते दहा लाख रुपयां पर्यन्त दंडात्मक कारवाई आणि पाच वर्ष कारावासाच्या शिक्षेस तयार रहावं असाही इशारा अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यानी मिठाई उत्पादक व्यवसायिक आणी मिठाई दुकांदारांना दिला आहे. अन्न औषध प्रशासनाच्या वतीनं आयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी माहिती दिली आहे.

इतर बातम्या:

मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, बेळगावच्या भाजपच्या विजयावर राऊतांचा संताप

मेहबूब शेख यांचं आव्हान चित्रा वाघ यांनी स्वीकारलं, म्हणाल्या, ‘मलाही दम बघायचाय’

Union State Minister Bharati Pawar said Temple should decision taken by state

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.