AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेहबूब शेख यांचं आव्हान चित्रा वाघ यांनी स्वीकारलं, म्हणाल्या, ‘मलाही दम बघायचाय’

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यात चांगलीच जुंपली आहे. कारण ठरलीय पारनेरमधील लंकेंनी आयोजित केलेली सभा...

मेहबूब शेख यांचं आव्हान चित्रा वाघ यांनी स्वीकारलं, म्हणाल्या, 'मलाही दम बघायचाय'
चित्रा वाघ आणि मेहबूब शेख
| Edited By: | Updated on: Sep 06, 2021 | 1:59 PM
Share

पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आणि भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यात चांगलीच जुंपली आहे. कारण ठरलीय पारनेरमधील लंकेंनी आयोजित केलेली सभा… मेहबूब शेख यांनी पारनेरच्या सभेत चित्रा वाघ यांचा उल्लेख ‘लाचखोर नवऱ्याची बायको’ असा केला. त्यानंतर चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या आहेत. त्यांनी मेहबूब शेख यांनी दिलेलं आव्हानही स्वीकारलंय. माझ्या नवऱ्याची नार्को टेस्ट करायला तयार असल्याचं सांगत मलाही तुमच्यातला दम बघायचाय,  असं प्रतिआव्हान चित्रा वाघ यांनी दिलंय.

“जो मेहबूब शेख माझ्यावर आज आरोप करतोय त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्याने अगोदर 376 चा गुन्हा कशाला म्हणतात, याची माहिती घ्यावी… गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बी समरी करण्याची किती घाई केली, हे आपल्याला माहितीय. म्हणजेच गुन्ह्यात अडकलेला मेहबूब माझ्यावर ‘वाघावर’ भुंकतोय… पण मला त्याला सांगायचंय, मी वाघ आहे… कोल्हाकुत्र्यांना घाबरत नाही”, असं प्रत्युत्तर त्यांनी मेहबूब यांना दिलं.

ही साहेबांची राष्ट्रवादी नाही

मुख्यमंत्रीसाहेब, तु्म्ही गृहखातं ज्या पक्षाला दिलंय त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, आमदारांना, त्यांच्या बगलबच्च्यांना, या मेहबूबसारख्या बलात्काऱ्यांना कधीही उठा आणि काहीही करा, अशी मुभा दिलीय का?, असा सवाल यावेळी चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. तसंच मारझोड करणारी आणि मनाला वाटेल तसं वागणारी ही साहेबांची राष्ट्रवादी नाही, अशा शब्दात त्यांनी प्रहार केला.

नार्कोच काय सांगेल त्या टेस्टला आम्ही तयार

“मेहबूबने मुलीवर अत्याचार केला… संबंधित मुलीने अत्याचाराचं कथन केलंय.. काय घडलं, कसं घडलं, कुठं घडलं…. हे सांगितलं. या सगळ्या प्रकारावर मी आवाज उठवला तर हा बलात्कारी मेहबूब शेख आज माझ्यावर भुंकतोय….. आणि मला आव्हान देतोय की नवऱ्याची नार्को टेस्ट करा म्हणून…. अरे सांगेल त्या टेस्टला आम्ही तयार आहोत…”, असं म्हणत चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांचं आव्हान स्वीकारलं.

मी वाघ, ती कशी, हे तुमच्या बापाला जाऊन विचारा

पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, “लंकेच्या सभेत मला आव्हान देतोय… तोच लंके जो एका महिला तहसीलदाराला अॅट्रोसिटीच्या धमक्या देतो…. तो वैद्यकीय अधिकाऱ्यांवर धावून जातो, डॉक्टरला गलिच्छ भाषेत बोलतो… म्हणजे ज्याच्याविरोधात आम्ही बोलणार, तिथे जाऊन तुम्ही आमच्यावर टीका करणार….. अरे जा रे जा…. मी वाघ आहे वाघ… आणि ती कशी, हे तुमच्या बापाला जाऊन विचारा……., असा पुनरुच्चार चित्रा वाघ यांनी केला.

चित्रा वाघ-मेहबूब शेख यांच्यातला वाद नेमका काय?

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोव्हिड काळात केलेल्या कामाने ते पूर्ण देशात लोकप्रिय झाले. परंतु मागच्या महिन्यात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपाने ते अडचणीत सापडले होते. चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत निलेश लंके यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. याच आरोप प्रत्यारोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडेतोड उत्तर दिलं.

“चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो”, अशी बोचरी टीका करत आमदार निलेश लंके यांच्यावरील टीकेचा मेहबूब शेख यांनी खरपूस समाचार घेतला.

आज सकाळपासून मेहबूब शेख आणि चित्रा वाघ यांच्यात सोशल मीडियावर जोरदार सामना रंगलाय. एकमेकांच्या आरोप-प्रत्यारोपांवर दोघेही वार-प्रतिवार करतायत. एकंदरित या दोघांमध्ये येत्या काळात जोरदार संघर्षाची शक्यता आहे.

(BJP Chitra Wagh Acctepted NCP Mahebub Shaikh Challenge)

हे ही वाचा :

लाचखोर नवऱ्याची बायको म्हणून तुमची राज्याला ओळख, नीतिमत्ता कुणाला शिकवता?, लंकेवरील टीकेचा राष्ट्रवादीच्या नेत्याकडून समाचार

मी वाघ आहे, कशी ते तुमच्या बापाला जाऊन विचारा, चित्रा वाघ यांचं राष्ट्रवादीच्या नेत्याला प्रत्युत्तर

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.