मी वाघ आहे, कशी ते तुमच्या बापाला जाऊन विचारा, चित्रा वाघ यांचं राष्ट्रवादीच्या नेत्याला प्रत्युत्तर

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर काल नगरमध्ये बोचरी टीका केली होती. 'लाचखोर नवऱ्याची बायको', असा चित्रा वाघ यांचा उल्लेख आपल्या भाषणात मेहबूब यांनी केला होता. याच टीकेला आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मी वाघ आहे, कशी ते तुमच्या बापाला जाऊन विचारा, चित्रा वाघ यांचं राष्ट्रवादीच्या नेत्याला प्रत्युत्तर
भाजप नेत्या चित्रा वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेबूब शेख


मुंबई : राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर काल नगरमध्ये बोचरी टीका केली होती. ‘लाचखोर नवऱ्याची बायको’, असा चित्रा वाघ यांचा उल्लेख आपल्या भाषणात शेख यांनी केला होता. याच टीकेला आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मी वाघ आहे वाघ…, माझ्यावर कोल्हे कुत्रे भुंकत आहेत. पण मी कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही”, अशा शब्दात त्यांनी महेबूब शेख यांच्यावर पलटवार केला आहे.

मी कशी आहे ते तुमच्या बापाला जाऊन विचारा

“सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करुन झाले…. आता माझ्या परिवाराची बदनामी सुरु आहे. पण मी अ्सल्या प्रकाराला घाबरत नाही. मी काय आहे….काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या”, असं उघड आव्हानच त्यांनी शेख यांना दिलं आहे.

मी वाघ आहे… कोल्ह्या कुत्र्यांना मी घाबरणारी नाही

“वाघावर…..कोल्हे कुत्रे भुंकताहेत कारण मी पिडीतांच्या पाठीशी उभी राहते म्हणून……. पण शेवटी मी वाघ आहे… लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना मी घाबरणारी नाही”, अशा शब्दात त्यांनी मेहबूब यांचा वार परतावून लावला आहे. मेहबूब यांच्या टीकेला उत्तर देणारं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

चित्रा वाघ यांचं ट्विट :

चित्रा वाघ-मेहबूब शेख यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध

आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही, आणि बाप बदलणारे तर आम्ही मुळीच नाही, डायलॉगबाजी सोडा आणि आपल्या नवऱ्यावर 5 जुन 2016 ला कारवाई झाली तेव्हा सरकार कुणाचं होतं ते सांगा ? त्यांनी कोणत्या बुध्दीने कारवाई केली होती याचं उत्तर द्या. आणि तुम्ही काय आहात हे आम्ही पाहिलंय… कुणाला विचारायची आवश्यकता नाही…., अशा शब्दात मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना उत्तर दिलं आहे.

जस आम्ही म्हणतो की आमची नार्को टेस्ट करा, तसं तुम्हीही म्हणा की नवऱ्याची पण नार्को टेस्ट करा… कर नाही त्याला डर कश्याला ओ…. आणि भुंकतंय कोण हे महाराष्ट्र बघतोय. आणि मी पण बाप बदलणाराच्या बापाला पण भीत नाही, असं प्रतिआव्हान मेहबूब यांनी चित्रा वाघांना दिलं आहे.

मेहबूब शेख यांची चित्रा वाघ यांच्यावर जळजळीत टीका

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर कडाडून टीका केलीये. “चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो”, अशी बोचरी टीका करत आमदार निलेश लंके यांच्यावरील टीकेचा मेहबूब शेख यांनी खरपूस समाचार घेतला.

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोव्हिड काळात केलेल्या कामाने ते पूर्ण देशात लोकप्रिय झाले. परंतु मागच्या महिन्यात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपाने ते अडचणीत सापडले होते. चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत निलेश लंके यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. याच आरोप प्रत्यारोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडेतोड उत्तर दिलं. ते पारनेर तालुक्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

“अहो चित्रा वाघ लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे. अगोदर नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा, अशी खरमरीत टीका मेहबूब यांनी केली. महिलांचा आदर आम्हाला काय शिकवताय?, राष्ट्रवादी पक्षच महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. आधी आपल्या घरात नीतिमत्ता शिकवा”, असा पलटवार त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला.

मढयावरचं लोणी खाणारी तुमची अवलाद, तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवताय?

“तुमच्या-माझ्या सारख्या कार्यकर्त्याला चित्रा वाघ नीतिमत्ता शिकवायला निघाल्या आहेत. आधी तुमच्या नवऱ्याला नीतिमत्ता शिकवा, नंतर आम्हाला शिकवा. तुमचे पती लाच घेतल्याप्रकरणी अटकेत होते, असं सांगायला देखील शेख विसरले नाहीत. मेलेल्या मढयावरचं लोणी खाणारी तुमची अवलाद, तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवताय, अशा शब्दात मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्ला चढवला. तुमच्या नवऱ्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली, हे मी नाही बोलत तर एसीबीचा रिपोर्ट आहे, असं शेख म्हणाले.

(BJP Chitra Wagh reply NCP youth President mahebub Shaikh through Tweet)

हे ही वाचा :

वाघ पैसे घेतो आणि वाघिनीला नेऊन देतो, असेल हिम्मत तर नवऱ्याची नार्को टेस्ट करा, राष्ट्रवादीच्या नेत्याचं चित्रा वाघ यांना आव्हान

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI