AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NashikFlood:वालदेवीला पूर, एक जण गेला वाहून, गोदाकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा

नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने ((Nashik Rain) वालदेवी (Valdevi river) नदीला पूर (Flood in Nashik) आला आहे. पाण्याचा अंदाज आल्या नसल्याने एक जण वाहून गेला. दुसरीकडे गोदावरीच्या पाणी पातळीतही वाढ होत असल्याने नदीकाठच्या (Godakath) गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

NashikFlood:वालदेवीला पूर, एक जण गेला वाहून, गोदाकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा
धरण क्षेत्रातून विसर्ग सुरू.
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 11:01 AM
Share

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने (Nashik Rain) वालदेवी (Valdevi river) नदीला पूर (Flood in Nashik) आला आहे. पाण्याचा अंदाज आल्या नसल्याने एक जण वाहून गेला. दुसरीकडे गोदावरीच्या पाणी पातळीतही वाढ होत असल्याने नदीकाठच्या (Godakath) गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. (Flood in Nashik district, one person was swept away in Valdevi river, a warning to the citizens of Godakath)

नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः धरण क्षेत्रात तुफान पाऊस सुरू आहे. गंगापूर धरणाची पाणी पातळी 96.82 तर दारणा धरणाची पाणी पातळी 97.10 वर पोहचली आहे. त्यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सोमवारी (13 सप्टेंबर) सकाळी नऊ वाजता 2500 क्यसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. पालखखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पालखेड धरणातून 800 क्यूसेक्स पाणी सोमवारी (13 सप्टेंबर) आठ वाजता सोडण्यात आले. पावसाने वालदेवी नदीला पूर आला आहे. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दाढेगाव येथील वसंत लक्ष्मण गांगुर्डे (वय 45) हे वाहून गेले आहेत. ते सायंकाळच्या सुमारास पुलावरून जात होते. त्यावेळी ही घटना घडली. या नदीवरील पूल धोकादायक झाला आहे. येथून दाढेगाव, पाथर्डी, व पिंपळगाव खांब येथील नागरिकांची ये-जा सुरू असते. नदीचे पाणी वाढल्यास दाढेगावकडे जायचा मार्ग बंद होतो. त्यामुळे येथे नवा पूल उभारावा. तो उंच असावा, अशी मागणी तिन्ही गावातल्या गावकऱ्यांकडून होत आहे.

रामकुंड, गोदाघाटवरील दुकाने हलविली गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. धरण भरत आले आहे. त्यामुळे गोदावरीला केव्हाही पूर येऊ शकतो. हे लक्षात घेता गोदाघाट परिसरातील, रामकुंड येथील दुकाने हलविण्यात आली आहेत. नागरिकांना नदीकाठी येऊ नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

पोहण्यासाठी मुलांची गर्दी गोदावरीला भरते आले आहे. कधीही पूर येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. मात्र, या पाण्यातही अनेक जण पोहण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. विशेषतः चौदा-पंधरा वर्षांच्या तरुण मुलांचा या समावेश दिसून येत आहे. रविवारी दिवसभर मुलांनी गोदाकाठच्या परिसरात पोहण्यासाठी गर्दी केली होती. या मुलांना येथे येण्यापासून मज्जाव करावा. अन्यथा एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Flood in Nashik district, one person was swept away in Valdevi river, a warning to the citizens of Godakath)

इतर बातम्याः

नांदगाव, मनमाडला पावसाचा तडाखा; लेंडी, शाकंभरीला पूर, पाझर तलाव फुटला

पाझर तलावाचे पाणी शेतात घुसले, दहा एकरांवरील लाखोंचे पीक वाहून गेले

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.