केवळ एक बादली पाण्यात 30 किलो हिरवा चारा, दुष्काळातही जनावरांना सकस चारा, किती येतो खर्च? काय आहे प्रक्रिया?

Hydroponic Fodder Machine: राज्यात दुष्काळाने आ वासला आहे. दुष्काळामुळे ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्षच नाही तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. अशावेळी काही शेतकरी वेगळा प्रयोग करून पाहत आहेत. चारा कमी पडू नये यासाठी हा एक उपाय करण्यात येत आहे.

केवळ एक बादली पाण्यात 30 किलो हिरवा चारा, दुष्काळातही जनावरांना सकस चारा, किती येतो खर्च? काय आहे प्रक्रिया?
केवळ एका बादली पाण्यात 30 किलो हिरवा चारा, दुष्काळातही जनावरांना सकस चारा, किती येतो खर्च? काय आहे प्रक्रिया?
| Updated on: Nov 17, 2026 | 10:55 AM

Hydroponic Fodder Machine: राज्यातील अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. आतापासून जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हिरव्या चाऱ्याच्या अभावामुळे जनावरांचे हाल होत आहेत. त्याचा दूध उत्पादनावरही मोठा परिणाम होत आहे. या समस्येवर आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय शोधण्यात आला आहे. हायड्रोपोनिक चारा निर्मिती यंत्राच्या (Hydroponic Fodder Machine) मदतीने केवळ एका बादली पाण्यात म्हणजेच अवघ्या 15 ते 20 लिटर पाण्याचा वापर करून 30 किलो सकस हिरवा चारा तयार केला जाऊ शकतो. काही शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर दुष्काळी पट्ट्यात करत आहेत. शेतकरी गटाने सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.

काय आहे प्रक्रिया आणि किती दिवस लागतात?

Loading...

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानामध्ये मातीचा अजिबात वापर होत नाही. केवळ पाण्याच्या आणि आर्द्रतेच्या मदतीने चारा उगवाल जातो. या यंत्रामध्ये विशिष्ट प्रकाराच्या ट्रेचा वापर होतो. या ट्रेमध्ये मका, गहू, बार्ली आणि बाजरीच्या बियाणांचा वापर करण्यात येतो. हे बियाणे भिजवून पसरवले जातात. यंत्रातील स्वयंचलित फोगर्सच्या मदतीने ठराविक वेळेनंतर बियाण्यांवर पाण्याची हलकी फवारणी होते. या नियंत्रित वातावरणात अवघ्या 7 ते 8 दिवसांमध्ये बियाण्यांची जोमदार वाढ होते. यामध्ये 8 ते 10 इंच उंचीचा हिरवागार आणि पौष्टिक चारा तयार होतो. या प्रक्रियेत वाया जाणारे पाणी पुन्हा रियायकल करून वापरण्यात येते. यामुळे एका बादली इतक्या कमी पाण्यात 30 किलोपर्यंत चारा उत्पादन घेता येते, असा दावा करण्यात येतो.

यंत्रासाठी येतो किती खर्च?

हायड्रोपोनिक चारा निर्मितीचे युनिट उभारण्यासाठी किती खर्च येतो हा एक प्रश्न विचारल्या जोता. तर तुम्ही किती क्षमतेचा प्रकल्प उभारता यावर ते अवलंबून आहे. घरगुती स्तरावर अगदी लहान लाकडी अथवा लोखंडी सांगड्याचा वापर करून युनिट तयार करत असाल तर साधारणपणे 15,000 ते 25,000 रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. तर पूर्णपणे स्वयंचलित, ऑटोमॅटिक आणि तापमान नियंत्रित आधुनिक यंत्राची किंमत ही 50,000 रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत असू शकते. कृषी विभागाकडून काही योजनेत यासाठी अनुदानाची तरतूद असते. काही जण व्यवसाय म्हणून अशी युनिट उभारत आहेत. यामुळे ग्रामीण भागात हिरवा चाराही उपलब्ध होत आहे आणि व्यवसायातून काहींच्या गाठीशी पैसाही राहत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us