कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी मागणी; कांदा उत्पादकाचं राष्ट्रपतींना कोणतं साकडं?

| Updated on: Mar 06, 2023 | 10:46 AM

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कडे पत्र लिहून मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी केलेली मागणी राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी मागणी; कांदा उत्पादकाचं राष्ट्रपतींना कोणतं साकडं?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : सध्या कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी ( Farmers Loss ) हतबल झाले आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. हाती पैशाच शिल्लक राहत नसल्याने कुटुंब चालवणे अवघड झाले असून मुलांचे शिक्षण, लग्न कसं करायचं हा यक्ष प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पडू लागला आहे. त्यामुळे कांदा पंढरी असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहीत इच्छा मरणाची ( allow death wish )  मागणी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहीत मागणी केली आहे.

शेती करून आमच्या पदरी काही पडणारच नसेल, तर इच्छा मरणाची तरी परवानगी द्या अशी स्वेच्छामरणाची मागणी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे.

नाशिकच्या चांदवड तालुक्याच्या आमदारांनी या मागणीत सहभाग घेतला आहे. चांदवड तालुका हा द्राक्ष आणि कांदा पिकासाठी नाशिक जिल्ह्यात अग्रेसर आहे. त्यामुळे येथील शेतकरी सर्वाधिक हतबल झाले आहे. त्यामुळे थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून स्वेच्छा मरणाची परवानगी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

केंद्र सरकारच्या आयात आणि निर्यात धोरणाचा फटका बसल्याची चर्चा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये आहे. कांद्या बरोबर द्राक्षाच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने आता खायचं तरी काय ? मुलांचे शिक्षण कसं करायचे असा प्रश्न पडू लागला आहे.

राज्यातील सरकार हे शेतमालाला योग्य दर देण्यास असमर्थ ठरत असल्याचा आरोप करत यंदाच्या वर्षी कोणत्याच पिकातून शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती हालाकीची होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी हे हताश झाले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थेट मरणाची परवानगी मागून लक्ष वेधून घेतले आहे. शेतकऱ्याला जीवन जगता येईल इतका तरी दर किंवा अनुदान मिळावे अशी मागणी यावेळेला करण्यात आली आहे.

चांदवड तालुक्यातील शेतकरी उत्तमराव ठोंबरे, अनर्थ पठाण, संजय जाधव, मधुकर निकम, शंकरराव शिरसाठ, नंदू कोतवाल, विजय जाधव, संपतराव वक्टे, दीपांशू जाधव, दत्तू ठाकरे, समाधान जामदार, शंकरराव जाधव, सागर निकम, भीमराव निरभवणे यांनी पत्र लिहिले आहे.

नाशिक जिल्ह्यातील कांद्याचा प्रश्न सध्या चिघळला आहे. आंदोलन करूनही कांद्याला भाव मिळत नसल्याने कांड उत्पादक शेतकरी निराश झाला आहे. येणाऱ्या काळात अशीच परिस्थिती राहिल्यास बळीराजा उद्ध्वस्त होण्याची स्थिती निर्माण झाली असून टोकाचे पाऊल उचलण्याची मनस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.