Red onion : या कारणामुळे कांदा उत्पादक संकटात, सरासरी प्रति क्विंटलमागे १३०० रुपये नुकसान

गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सुमारे ९ लाख क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. यावर्षी फेब्रुवारीत ११ लाख ६५ हजार क्विंटल झाल्याने त्याचा थेट परिणाम बाजारभाव कोसळण्यावर झाला आहे.

Red onion : या कारणामुळे कांदा उत्पादक संकटात, सरासरी प्रति क्विंटलमागे १३०० रुपये नुकसान
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 10:19 AM

नाशिक : राज्यासह देशांतर्गत पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान तसेच गुजरातमध्ये गेल्या वर्षापेक्षा लाल कांद्याचे उत्पादन अधिक झाल्याने महाराष्ट्रातील (maharashtra) कांद्याच्या मागणीत देशांतर्गत घट झाली आहे. त्याचाही थेट परिणाम बाजारभाव घसरणीवर झाल्याचे चित्र समोर आले आहे. आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Income Market Committee) गेल्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापेक्षा यंदा 3 लाख क्विंटल लाल कांदा (Red onion) आवक जास्त विक्रीसाठी दाखल झाला आहे.

गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सुमारे ९ लाख क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. यावर्षी फेब्रुवारीत ११ लाख ६५ हजार क्विंटल झाल्याने त्याचा थेट परिणाम बाजारभाव कोसळण्यावर झाला आहे. गेल्या वर्षी फेबुवारी महिन्यात ९ लाख क्विंटल लाल कांद्याला जास्तीतजास्त ३११५ रुपये, कमीतकमी ५०० रुपये, तर सरासरी २१३३ रुपये प्रती क्विंटल बाजार भाव मिळत होता. यंदा फेब्रुवारीत ११ लाख ६५ हजार लाल कांद्याची आवक झाली जास्तीत जास्त १६०० रुपये, कमीत कमी २०० रुपये तर सरासरी ८४० रुपये प्रती क्विंटल बाजार भाव मिळाल्याने गेल्या वर्षीपेक्षा शेतकऱ्यांना सरासरी प्रतिक्विंटलमागे १३०० रुपये नुकसान झाल्याने अंदाजे १५१ कोटी ४५ लाख रुपयांचा एकट्या लासलगाव बाजार समिती विक्री झालेल्या लाल कांद्याच्या उत्पादकांना फटका बसला आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात घसरण होत आहे, संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बंद ठेवून दहा तास आंदोलन केले होते. यानंतर मंगळवार आणि आज बुधवारी कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू असून लासलगाव बाजार समितीमध्ये पंधरा हजार क्विंटल विक्रीसाठी आलेल्या कांद्याला जास्तीजास्त 1131 रुपये, कमीतकमी 350 रुपये तर सरसरी 700 रुपये प्रतिक्विंटल ला बाजार भाव मिळाला आहे. मात्र या बाजार भावातून शेतातून काढण्यासाठी लागणारी मजुरी आणि वाहतूक खर्च कुठेतरी निघत आहे. पण केलेले उत्पादन खर्च निघणे मुश्किलचे कांदा उत्पादक शेतकरी सांगत आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.