रानमेवा बिबा फळाला बहर, बिब्यामुळे अनेकांना रोजगाराची आशा…!

| Updated on: Jan 23, 2021 | 7:13 PM

रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बिबा फळाला यंदा जोरदार बहार लागल्यानं नांदेडमध्ये शेतमजुरांमध्ये रोजरागाराची आशा निर्माण झाली. (Nanded Biba Flourished)

रानमेवा बिबा फळाला बहर, बिब्यामुळे अनेकांना रोजगाराची आशा...!
बिबा
Follow us on

नांदेड: रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बिबा फळाला यंदा जोरदार बहार लागलाय. गेल्या चार वर्षांच्या दुष्काळी स्थितीची कसर यंदा परतीच्या पावसाने भरून काढली. त्यामुळे पाच वर्षांनंतर रानमेवा असलेल्या बिब्याच्या झाडाला मोठा बहर आलाय. बिब्याची तोडणी करत गोडमबीची विक्री करून त्यावर उपजीविका भागवणाऱ्या माहूर तालुक्यातील मजुरांना त्यामुळे रोजगाराची आशा निर्माण झालीय. (Biba flourished in Nanded workers hope to better employment from Biba selling)

बिबा फळाला यंदा जोरदार बहर

रानमेवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बिबा फळाला यंदा जोरदार बहार लागलाय. आर्युवेदात बिब्याचे अनेक महत्वाचे अनेक गुणधर्म सांगितले आहेत. गेल्या चार वर्षांच्या दुष्काळी स्थितीची कसर यंदा परतीच्या पावसाने भरून काढली. पाच वर्षांनंतर यंदा रानमेवा असलेल्या बिब्याच्या झाडाला मोठा बहर आलाय. बिब्याची तोडणी करत गोडमबीची विक्री करून त्यावर उपजीविका भागवणाऱ्या मजुरांना त्यामुळे रोजगाराची आशा निर्माण झालीय. बिबा फळ साधारणतः जानेवारी च्या दुसऱ्या आडवड्या पासून पिकण्यास सुरुवात होते.

बिबा बहरला

वेगवेगळ्या तेलांची निर्मिती

माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतमजूर हे बिबे गोळा करतात. बिब्यापासून काळे बिबे ,बिबाफुल,गोडंबी,व बीबा तेल असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. पिकलेल्या फुल बिब्याना 200ते 250 रुपये किलो भाव मिळतो तर वाळलेल्या फुल बिब्याला प्रति किलो350 ते 400 रुपये भाव मिळतो. तर, गोडंबीला बाजारात 600ते 700 रुपये किलो भाव मिळतो. सद्या बिब्याची झाडे अत्यंत दुर्मिळ झालीत. मात्र, कर्नाटकातील बेळगाव येथे बिब्याची मोठी बाजार पेठ आहे. अनेक बिबा व्यावसायिक हे कर्नाटक राज्यातून बिबा विकत आणून महाराष्ट्रात विक्री करतात.

कर्नाटकात बिबा शेती मोठ्या प्रमाणात

महाराष्ट्रात बिबा शेती करणाऱ्यांचं प्रमाण कमी झीलं आहे. सध्या कर्नाटकामध्ये बिबा शेती मोठ्या प्रमाणावर होते. नांदेड जिल्ह्यातील कंधार,लोहा,मुखेड,व आदिवासी भाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या किनवट माहूर या तालुक्यातील शेतमजूर बिबा गोळा करून त्यावर उपजीविका करतात. अनेक रोगांवर बिबा फुल,गोडंबी चा उपयोग केल्या जातो. गेल्या चार वर्षांच्या दुष्काळी स्थितीची कसर यंदा परतीच्या पावसाने भरून काढली, त्यामुळे पाच वर्षांच्या अंतराने यंदा रानमेवा असलेल्या बिब्याच्या झाडाला मोठा बहर आलाय. बिब्याची तोडणी करत गोडमबीची विक्री करून त्यावर उपजीविका भागवणाऱ्या मजुरांना त्यामुळे यंदा रोजगाराची आशा निर्माण झालीय.

बिब्ब्याचा वापर रेझीन, औषध, साबण, तणनाशके, आगरोधक,वंगण बनवण्यासाठी केला जातो. लाकूड पोखरणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी बिबाचे तेल लाकडांना लावले जाते. बिबाचा आयुर्वेदिक औषधांमध्येही वापर केला जातो. अस्थमा, मेदूविकार, कफ, सांधेदुखी, घशाचे विकार, कुष्ठरोग, मूळव्याध आणि इत्यादी आजारांवरील औषधांमध्ये बिबाचा वापर होतो.

संबंधित बातम्या: 

Special Story | Dragon Fruit चं गुजरातमध्ये नामकरण, महाराष्ट्रातील ड्रॅगन फ्रुट शेतीची स्थिती काय?

कृषी कायद्यातून शेतकऱ्यांना कॉर्पोरेटच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न, राजू शेट्टींचा आरोप

(Biba flourished in Nanded workers hope to better employment from Biba selling)