कडवट कारल्यात औषधी गुणधर्म, शेतकऱ्यांना भरघोस उत्पान्नाचीही संधी

चवीला कडवट असलेल्या कारल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. शिवाय बाजारपेठेत या भाजीला कायम मागणी असते. असे असूनही कारल्याचे दर कायम मध्यम असतात. त्यामुळे औषधाबरोबरच कारल्याच्या उत्पादनातून शेतकऱ्यांनाही मुबलक प्रमाणात उत्पन्न मिळवता येते. देशात सर्वत्रच कारल्याची लागवड केली जाते तर महाराष्ट्रात तब्बल 453 हेक्टरावर कारल्याची लागवड केली जात आहे.

कडवट कारल्यात औषधी गुणधर्म, शेतकऱ्यांना भरघोस उत्पान्नाचीही संधी
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 3:23 PM

मुंबई : चवीला कडवट असलेल्या कारल्यामध्ये अनेक (medicinal properties) औषधी गुणधर्म आहेत. शिवाय बाजारपेठेत या भाजीला कायम मागणी असते. असे असूनही कारल्याचे दर कायम मध्यम असतात. त्यामुळे औषधाबरोबरच कारल्याच्या उत्पादनातून शेतकऱ्यांनाही मुबलक प्रमाणात उत्पन्न मिळवता येते. देशात सर्वत्रच ( Production of bitter plying) कारल्याची लागवड केली जाते तर (Maharashtra) महाराष्ट्रात तब्बल 453 हेक्टरावर कारल्याची लागवड केली जात आहे. कारल्याच्या वाढीसाठी वेल तयार केले जातात. तर मोठ्या शहरांसह परदेशातही कारल्याला मोठी मागणी आहे. चवीला कारले कडवट असले तरी त्याचे गुणधर्म आणि होणारे फायदे मानवी शरीरासाठी फायद्याचे आहेत.

कारल्याचे औषधी गुणधर्मही आहेत. कारल्यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. कारले या भाजीपाल्याची लागवड ही उन्हाळ्यात किंवा पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात लागवड केली जाते. उष्ण आणि दमट हवामान कडू कारल्याच्या वाढीसाठी अत्यंत योग्य आहे. वेलीच्या वाढीसाठी तापमान किमान 20 अंश सेंटिग्रेड दरम्यान असावे आणि कमाल तापमान 35 ते 40 अंश सेंटिग्रेडदरम्यान असावे लागते.

लागवडीसाठी योग्य जमिन

पाण्याचा निचरा होणारी मध्यम शेत जमिन गरजेची आहे. नदीकाठची अल्युव्हियल माती ही कडू कारल्याच्या उत्पादनासाठी देखील चांगली आहे. लागवडीपूर्वी शेत उभे व आडवे नांगरून घ्यावे. त्यानंतर शेतामधील गवत किंवा तण काढून घ्यावे. हेक्टरी 10 ते 15 टन कंपोस्ट खत शेतजमिनीत मिसळावे लागणार आहे. कारल्याच्या लागवडीसाठी दोन रांगांमध्ये दीड ते दोन मीटर आणि दोन रोपांमध्ये 60 सेंमी अंतर असावे. प्रत्येक ठिकाणी 2 ते 3 बियाणे लावा. उत्पादन वाढीसाठी लागवड करताना शेत जमिनीत ओलावा असावा तर बियाणे टोकन पध्दतीने लागवड केल्यास उत्पादन वाढणार आहे. रोपांची उगवण झाल्यावरच पहिले पाणी द्यावे.

कारल्याचे सुधारित वाण

कोयंबटूर लॉग : ही विविध प्रकारची फळे पांढरी आणि लांब असतात. पावसाळ्यात महाराष्ट्रात या वाणाची लागवड केली जाते. अर्का ग्रीन : या प्रकारचे फळ आकर्षक, लहान, मध्यम, फुगलेले, हिरवे रंगाचे असते.फळांमध्ये बियाण्यांचे प्रमाण कमी असते.

रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी

कारल्यावर प्रामुख्याने केवाडा आणि तपकिरी रोगांचा परिणाम होतो. तपकिरी रोगावर नियंत्रणासाठी डिनोकॅप- 1 मिली. केवाडा नियंत्रित करण्यासाठी 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा आणि डायथिन झेड 78 हे 10 लिटर पाण्यात मिसळून 1 हेक्टरावरील कारले फवारल्यास कीडीचा बंदोबस्त होतो.

संबंधित बातम्या :

…म्हणून सोयाबीनची घटत आहे आवक, लातूर बाजार समितीमध्ये केवळ 8 हजार क्विंटलची आवक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा फळबागायत शेतकऱ्यांना काय आहे सल्ला ?

थंडी वाढताच लाळ्या-खुरकूताचा प्रादुर्भाव ; दूध उत्पादनावरही परिणाम, अशी घ्या जनावरांची काळजी

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.