Farmer Loan Waiver: राज्यातील 94 हजार शेतकर्यांना दणका; कर्जमाफीच्या यादीतूनच नाव कपात, तुमचं तर नाव नाही ना या यात?
punyashlok ahilyadevi holkar farmer loan waiver scheme: राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून 7,000 कोटी रुपये डीबीटी प्रणालीद्वारे जमा होण्यास आजपासून सुरुवात होत आहे. या योजनेत 2 लाखांपर्यंतच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण या 94 हजार शेतकर्यांना दणका देण्यात आला आहे. त्यांची नावं कर्जमाफीच्या यादीतूनच वगळण्यात आली आहे. काय आहे त्यामागील कारण?

राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता धडकलीच नाही तर प्रत्यक्ष लाभही मिळण्यास सुरूवात झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात आजपासून जमा होण्यास सुरुवात होत आहे. आजपासून 7,000 कोटी रुपये डीबीटी प्रणालीद्वारे जमा होतील. या योजनेत 2 लाखांपर्यंतच्या थकीत कर्जदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण या 94 हजार शेतकर्यांना सरकारने कर्जमुक्ती योजनेतून वगळले आहे. काय आहे त्यामागील कारण?
आयकरदात्या शेतकऱ्यांना फटका
कर्जमुक्ती योजनेतून सरकारने 94 हजार आयकरदाते शेतकरी वगळले आहेत. हे शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहेत. या योजनेतील ऊर्वरीत जवळपास 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज पीक कर्ज रक्कम एकाचवेळी जमा होईल. एकदाच 7 हजार कोटी रुपये जमा होतील. या शेतकऱ्यांचा पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तर एकवेळ समझोता (ओटीएस)अंतर्गत कर्जफेड करणाऱ्या 6 लाख 25 हजार शेतकऱ्यांच्या खात्यातही कर्जमाफीचा पैसा जमा होईल.
NPA कर्जदारांनाही मोठा दिलासा
अनेक शेतकरी बँकांची पीक कर्ज परतफेड करू शकले नाहीत. नापिकी, पावसाचे दृष्टचक्र आणि इतर कारणांमुळे त्यांना कर्ज फेडता आले नाही. त्यांची कर्जखाती बुडीत (NPA) गृहीत धरण्यात आली आहे. त्यांना नवीन पीक कर्जासाठी बँका दारातही उभ्या करत नव्हत्या. त्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सर्व बँकांसाठी व्याज सवलत योजना जाहीर केली आहे. बँक आणि शेतकरी यांचे नुकसान निश्चित करण्यात आले आहेत. या धोरणाला सर्व बँकांनी मान्यता दिली आहे. एनपीए शेतकऱ्यांना कुलिंग पिरियड न ठेवता लगेच पुन्हा कर्ज देण्यास मान्यता दिल्याचेही समजते.
30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे दोन लाखांपर्यंतचे कर्जमाफ होईल
महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या 12 लाख लाभार्थी शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्जमाफ होणार
राज्य सरकारने अतिरिक्त 4395 कोटींची त्यासाठी तरतूद केली आहे
अगोदरचे 36585 कोटी आणि 4395 कोटीं अशी एकूण 40,980 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येईल
राज्यातील एकूण 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होईल
नियमित कर्ज फेडणाऱ्या 23.63 लाख शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे
आजपासून 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 7,000 कोटी रुपये डीबीटी प्रणालीद्वारे जमा होतील
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मते कर्जमाफी योजना ही तीन टप्प्यात पार पडणार
ऑगस्टच्या अखेरपर्यंत ही प्रक्रिया चालण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यात 553 आणि नंतर दुसऱ्या टप्प्यात 16 लाख 95 हजार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला.
पात्र शेतकऱ्यांना 40 हजार कोटी रूपयांची मदत दिली जाणार आहे.