पहिला मान उस्मानाबादला : शेतकऱ्यांची चार महिन्यांची प्रतिक्षा संपली, आता थेट बॅंक खाते चेक करा..!

| Updated on: Feb 28, 2022 | 2:22 PM

अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले होते. त्याअनुशंगाने राज्य सरकारने अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरीत जमा करण्याचे आदेशही दिले होते. दिवाळीनंतर का होईना हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले होते. मात्र, उर्वरीत 25 टक्के रक्कम केव्हा जमा होणार असा सवाल उपस्थित केला जात होता.

पहिला मान उस्मानाबादला : शेतकऱ्यांची चार महिन्यांची प्रतिक्षा संपली, आता थेट बॅंक खाते चेक करा..!
खरीप हंगामातील पिकांचे अतिवृष्टीमुळे असे नुकसान झाले होते.
Follow us on

उस्मानाबाद : अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले होते. त्याअनुशंगाने राज्य सरकारने अतिवृष्टीचे (Subsidy) अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरीत जमा करण्याचे आदेशही दिले होते. दिवाळीनंतर का होईना हे अनुदान शेतकऱ्यांच्या (Bank Account) खात्यावर जमा झाले होते. मात्र, उर्वरीत 25 टक्के रक्कम केव्हा जमा होणार असा सवाल उपस्थित केला जात होता. अखेर चार महिन्यानंतर का होईना शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा होण्यास सुरवात झाली आहे. मराठवाड्यासाठी….एवढा निधी मंजूर करण्यात आला असून पहिला मान हा उस्मानाबाद जिल्ह्याला मिळालेला आहे. यापूर्वीच 237 कोटींचे वितरण झाले आहे. तर आता 71 कोटी रुपये वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. तहसीलस्तरावरून सर्व बॅंकांना या पैशाचे वितरण करण्यात आले आहे.

अशाप्रकारे मदतीची घोषणा

पावसामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले होते. त्यानुसार जिरायतीसाठी प्रति हेक्टरी 10 हजार, बागायती क्षेत्रासाठी 13 हजार तर फळबागा आणि बहुवार्षिक पिके असलेल्या शेतीसाठी 25 हजार रुपये हेक्टरी अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, पहिल्या टप्प्यात 75 निधीचे वितरण झाले होते तर आता उर्वरीत निधी बॅंक खात्यावर जमा केला जात आहे. 22 फेब्रुवारी रोजीच्या आदेशाने हा निधी बॅंक खात्यावर जमा होणार आहे. सोमवारपासून प्रत्यक्ष खात्यामध्ये पैसे जमा होतील असा अंदाज आहे.

यावेळी होणार नाही विलंब

पहिल्या टप्प्याच्या दरम्यान शासनाने घोषणा तर केली मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसा जमा होण्यासाठी 8 दिवसांचा कालावधी लागलेला होता. त्या दरम्यान, शेतकऱ्यांचे खाते क्रमांक तपासणी, आधार क्रमांक या सर्व बाबी तपासून घ्याव्या लागत होत्या. पण आता सर्व काही तयार आहे. तहसीलस्तरावरुन पैसे बॅंकांना वितरीत होताच ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे बॅंक अधिकारी कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांचा खातेनिहाय यादी बॅंकांना

जिल्हा प्रशासनाकडून अनुदानाची रक्कम आणि संबंधित शेतकऱ्यांची यादी ही बॅंकांना देण्यात आली आहे. मराठवाड्यात सर्वात अगोदर ही प्रक्रिया उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्यामुळे सोमवारपासून अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ही रक्कम कमी असली तरी शेतकऱ्यांना ऐन गरजेच्या वेळी याची मदत शेतकऱ्यांना होणार आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : सोयाबीन दरातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती, काय आहे बाजारपेठेतले चित्र?

लेट पण थेट : द्राक्ष निर्यात जोमात, रशिया-युक्रेन युध्दाचा निर्यातीवर काय परिणाम? वाचा सविस्तर

शेतातले साप थेट शासकीय कार्यालयांमध्ये, शेतकऱ्यांच्या अजब प्रकाराची राज्यभर चर्चा, पण नेमके कारण काय?