Latur Market : सोयाबीन दरातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती, काय आहे बाजारपेठेतले चित्र?

शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोयाबीनच्या दरात तब्बल 450 रुपयांची घसरण झाली होती. त्यामुळे 7 हजार 350 वर गेलेले सोयाबीन थेट 6 हजार 900 वर येऊन ठेपले होते. त्यामुळे वाढलेले दर हे क्षणिक होते असाच समज शेतकऱ्यांचा झाला होता. मात्र, ज्याप्रमाणात सोयाबीन दरात वाढ झाली त्यापेक्षा अधिक गतीने दरही घसरले होते. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय चित्र राहणार याकडेच सर्व शेतकऱ्याचे लक्ष लागले होते.

Latur Market : सोयाबीन दरातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती, काय आहे बाजारपेठेतले चित्र?
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या आवकमध्ये वाढ झाली आहे.
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 1:41 PM

लातूर : शनिवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात तब्बल 450 रुपयांची घसरण झाली होती. त्यामुळे 7 हजार 350 वर गेलेले सोयाबीन थेट 6 हजार 900 वर येऊन ठेपले होते. त्यामुळे वाढलेले दर हे क्षणिक होते असाच समज शेतकऱ्यांचा झाला होता. मात्र, ज्याप्रमाणात सोयाबीन दरात वाढ झाली त्यापेक्षा अधिक गतीने दरही घसरले होते. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय चित्र राहणार याकडेच सर्व (Farmer) शेतकऱ्याचे लक्ष लागले होते. पण शेतकऱ्यांना दिलासा देणारे चित्र सोमवारी बाजारपेठेत आहे. कारण 300 रुपयांनी सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, कमी वेळेत दरात अधिकचा अस्थिरता यामुळे (Soybean Stock) सोयाबीनची साठवणूक करावी का विक्री हा प्रश्न हंगामाच्या अंतिम टप्प्यातही कायम आहे. पण शनिवारी घटलेल्या दराचा परिणाम आवक झाला आहे. तर सोमवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सरासरी 7 हजार 200 चा दर मिळाला आहे.

दरातील अस्थिरतेचा सोयाबीन आवकवर परिणाम

गतआठवड्यात दरात वाढ होत असल्याने 15 हजार पोत्यांची आवक ही थेट 30 हजार पोत्यांपर्यंत गेली होती. हंगामाच्या अंतिम टप्प्यात चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी साठवणूक केलेले सोयाबीन विक्रीसाठी बाहेर काढले होते. मात्र, हीच आवक कायम राहिली नाही. शनिवारी अचानक दरात मोठी घसरण झाली असे असतानाही 30 हजार पोत्यांची आवक ही लातूर बाजार समितीमध्ये झाली होती. त्यामुळेच सोमवारी शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेतलेली आहे. सोमवारी दर वाढूनही 25 हजार पोत्यांची आवक झाली होती.

शेतकऱ्यांकडे काय आहे पर्याय?

ज्या शेतकऱ्यांना गरज होती त्यांनी सोयाबीनची विक्री केलेली आहे मात्र, ज्यांना वाढीव दराची अपेक्षा आहे त्यांनी अजूनही साठवणूकीवरच भर दिला आहे. मात्र, गेल्या आठ दिवासांतील चित्र पाहता साठवणूक की विक्री ? हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. शिवाय दरातील चढ-उतारामुळे व्यापाऱ्यांनाही अंदाज हा बांधता येत नाही. मात्र, शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तर ते फायद्याचे राहणार आहे. सध्या अस्थिरता निर्माण झाली असून यामध्ये कुणाचे साधणार आणि कुणाचे नुकसान होणार हे सांगता येत नसल्याचे व्यापारी अशोक अग्रवाल यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांचे लक्ष सोयाबीनचे दरावर

गेल्या आठ दिवसातील चढ-उतारानंतर आता सोयाबीनचे काय होणार याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे. गावोगावात सोयाबीनचे दर जाणून घेण्यात शेतकरी दंग आहे. शिवाय विक्री की साठवणूक याबबातही विविध अंगाने चर्चा केली जात आहो. मात्र, हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना सोयाबीन बाजारपेठेच्या केंद्रस्थानी आले आहे.

संबंधित बातम्या :

लेट पण थेट : द्राक्ष निर्यात जोमात, रशिया-युक्रेन युध्दाचा निर्यातीवर काय परिणाम? वाचा सविस्तर

शेतातले साप थेट शासकीय कार्यालयांमध्ये, शेतकऱ्यांच्या अजब प्रकाराची राज्यभर चर्चा, पण नेमके कारण काय?

Smart Farmer : सोयाबीन, कापसाप्रमाणेच तुरीचीही स्थिती, शेतकऱ्यांचा ‘प्लॅन’ होणार का यशस्वी?

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.