ही पाच फूलं आहेत सर्वात महागडी, किंमत वाचून दंग राहाल

गार्डेनिया हासुद्धा खूप महाग फूल आहे. लग्नसमारंभात घर आणि मंडप सजवण्यासाठी या फुलाचा वापर केला जातो. याच्या एका फुलाची किंमत १००० ते १६०० रुपये आहे.

ही पाच फूलं आहेत सर्वात महागडी, किंमत वाचून दंग राहाल
| Updated on: May 11, 2023 | 9:49 PM

नवी दिल्ली : वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या फुलांची शेती केली जाते. सर्व फुलांची किंमत वेगवेगळी आहे. कोणता फूल महाग असतो, तर कोणता फूल स्वस्त. त्यात अशीही फुलं आहेत ज्यांची किंमत वाचून तुम्ही दंग राहालं. ही फूलं इतकी महाग आहेत जणू काही लग्झरी बस खरेदी करत आहोत. तर आता आपण समजून घेऊया जगातील सर्वात महाग आणि सुगंधीत फुलांबद्दल. शेतकरी या फुलांची शेती कोणत्या देशात करतात.

 

  1. शेनजेड नांगके ऑर्चिड : शेनजेड नांगके ऑर्चिडला जगातील सर्वात महाग फुलं म्हटले जाते. याची किंमत लाखो रुपयांत राहते. हा फूल पाहायला सुंदर दिसतो. २००५ मध्ये याची किंमत ८६ लाख रुपये होती. आता याची किंमत जास्त झाली असेल.
  2. सेफरन क्रोकस : महाग फुलांच्या स्पर्धेत सेफरन क्रोकसचे वेगळे महत्त्व आहे. हा इतका महाग आहे की, याची किमतीत तुम्ही महाग बाईक खरेदी करू शकता. या फुलामधून केसरचे उत्पादन होते. आता बाजारात केसरचा भाव दोन लाख रुपये किलो आहे. अशावेळी जे शेतकरी सेफरन क्रोकसची शेती करतील त्यांना चांगले उत्पन्न मिळेल.
  3. अमूल्य फूल : अमूल्य फुलाची शेती श्रीलंकेत होते. श्रीलंकेत याला काडीपूल या नावाने ओळखले जाते. हा फूल काही तासांसाठी उगवतो. अशावेळी याला खरेदी करणे खूप कठीण असते.
  4. ट्युलीप : ट्युलीप हासुद्धा महाग फूल आहे. आधी या फुलाची किंमत खूप जास्त होती. काश्मिरमध्ये शेतकरी याची शेती करत होते. १७ व्या शतकात ट्युलीपची मागणी जगात वाढली. याच्या एका फुलाची किंमत ५०० रुपयांपेक्षा जास्त आहे.
  5. गार्डेनिया : गार्डेनिया हासुद्धा खूप महाग फूल आहे. लग्नसमारंभात घर आणि मंडप सजवण्यासाठी या फुलाचा वापर केला जातो. याच्या एका फुलाची किंमत १००० ते १६०० रुपये आहे.