Vegetable: भाजीपाल्याची लागवड केलीय? मग या 4 नियमांचे पालन करा अन् उत्पादन वाढवा

भाजीपाल्याचे क्षेत्र वाढत असले तरी शेतकऱ्यांनी कमी कालावधीच्या या पिकाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याच अनुशंगाने डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. के. सिंग यांनी शेतकऱ्यांना 4 महत्वाच्या टीप्स दिल्या आहेत. ज्याची अंमलबजावणी केल्यास उत्पादनात तर वाढ होणारच आहे पण दर्जात्मक भाजी ग्राहकांपर्यंत पोहचणार आहे.

Vegetable: भाजीपाल्याची लागवड केलीय? मग या 4 नियमांचे पालन करा अन् उत्पादन वाढवा
भाजीपाला पिकावरील रोग

मुंबई : कोरोनामुळे मानवी जीवन हे बदलूनच गेले आहे. सर्वात मोठा बदल झाला आहे तो नागरिकांच्या खाण्या-पिण्यामध्ये. या दरम्यानच्या काळात (Vegetables) भाजीपाल्याला अधिकचे महत्व आले आहे. ते अजूनही कायम आहे. त्यामुळे शेतीमालाच्या दरात कमी-अधिकपणा होत असला तरी भाजीपाल्याच्या माध्यमातून (Farmer) शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होत आहे, यामुळे भाजीपाल्याचे क्षेत्र वाढत असले तरी शेतकऱ्यांनी कमी कालावधीच्या या पिकाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याच अनुशंगाने (Agronomist) डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. के. सिंग यांनी शेतकऱ्यांना 4 महत्वाच्या टीप्स दिल्या आहेत. ज्याची अंमलबजावणी केल्यास उत्पादनात तर वाढ होणारच आहे पण दर्जात्मक भाजी ग्राहकांपर्यंत पोहचणार आहे. कमी कालावधीतील भाजीपाल्यावर सर्वात जास्त प्रादुर्भाव होतो तो (पावडरी मिल्ड्यू) पांढऱ्या सडीचा रोगाचा. यामुळे पिकाची नासाडी होते शिवाय यामधून विविध आजार वनस्पतीला जडतात. उत्पादनात तर घट होतेच पण झालेला खर्च पदरी पडत नाही. ही किड गाजर, कोथिंबीर, खरबूज, कांदा, सुर्यफूल, टोमॅटोलाही लागते. त्यामुळे योग्य वेळी खबरदारी घेणे हाच यावरचा पर्याय आहे.

कृषी तज्ञांचा काय आहे सल्ला

1) भाजीपाल्यावर मोठ्या प्रमाणात आढळून येते ती, पाढरी सड पांढऱ्या कापसा प्रमाणेच असते. याचा रोगाचा प्रादुर्भाव भाजीपाल्याच्या थेट बुडामध्येच होतो. मातीच्या पृष्ठभागाजवळील खोडात संसर्ग झाल्यामुळे वनस्पती कोमेजून जातात. काळ्या मोहरीच्या धान्यासारखी रचनेत ‘स्क्लेरोटिया’ नावाची एक कणिक रचना तयार होते, ती बुरशी च्या आत विकसित होते. वनस्पतींना सर्व वयात या आजाराची शक्यता असते. मात्र, फुललागण्याच्या दरम्यानच याचा अधिक प्रादुर्भाव होतो. परिणामी उत्पादनात घट होत असल्याचे डॉ. सिंग यांनी सांगितले आहे.

2) डॉ. सिंग यांच्या मते, भाजीपाल्याच्या पाने आणि फुलांमधूनही या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे बुरशी वनस्पतीमधील आजूबाजूच्या ऊती आणि अवयवांमध्ये वाढते, त्यामुळे वनस्पतीचा नायनाट होण्यास सुरवात होते. या पिक सडण्यास सुरवात झाली की, मोठ्या प्रमाणात पाने आणि फांद्यांवर पडणारी संक्रमित फुले देखील पिकाच्या आत रोग पसरवतात. वनस्पती सडण्याची प्रक्रिया ही शेंगांवर होऊ शकते. एवढेच नाही कापसावरील बोंडअळी प्रमाणे याचा प्रादुर्भाव हा कायम राहतो. त्याचा इतर वनस्पतीवरही परिणाम होतो. हवेमधूनही याचे संक्रमण होऊ शकते. त्यामुळे वेळीत बुरशीनाशक फवारणी करुन त्याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. या रोगाचे बीजाणू कित्येक किलोमीटर हवेने पसरू शकतात

3) पांढरी सड (पावडरी मिल्ड्यू) रोगाचा प्रसार हा दाट वनस्पती, दीर्घकाळ उच्च आर्द्रता, थंड, ओले हवामान यामुळे होतो. पावडरी मिल्ड्यू 5 अंश सेल्सिअस ते 30 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानावर विकसित होतो आणि 20 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढतो. पर्यावरणाच्या परिस्थितीनुसार स्क्लेरोटिया कित्येक महिने ते 7 वर्षांपर्यंत कुठेही जमिनीत टिकू शकते. पहिल्या 10 सेंमी मातीतील स्केल्ट शांत, ओलसर परिस्थितीच्या संपर्कात आल्यानंतर अंकुरित होतो.

4) भाजीपाल्याला फुल लागण्याच्या दरम्यान, बुरशीनाशकाची फवारणी गरजेची आहे. तर गरज नसताना पाणी देऊन शेतजमिन ओली ठेवली तर याचा प्रादुर्भाव वाढतो. शक्य तो दुपारी सिंचना करण्याचे टाळावे. शिवाय कार्बोनेडाझीम (कार्बेंडाझीम) @2g/ प्रति लिटल पाण्यात मिसळून फवारावे लागणार आहे. भाजीपाला दाट होईल असा लागवड करायचा नाही. शेत जमिनीची मशागत ही पिकांचे अंतर पाहूनच करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

State Government: कृषी क्षेत्रात महिलाराज, राज्य सरकारचा नववर्षात काय आहे पहिला निर्णय?

Latur Market: आठ दिवस सोयाबीनचे दर स्थिर राहिले अन् बाजार समितीमधले चित्रच बदलले, नेमके काय झाले?

Corona : कोरोनाचा परिणाम कृषी विद्यापीठांवरही, काय आहेत राज्य शासनाचे आदेश?

Published On - 3:51 pm, Thu, 13 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI