Corona : कोरोनाचा परिणाम कृषी विद्यापीठांवरही, काय आहेत राज्य शासनाचे आदेश?

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम आता थेट राज्यातील कृषी विद्यापीठापर्यंत येऊन ठेपलेला आहे. आता पर्यंत अटी-नियमांमध्ये सुरु असलेले कृषी विद्यापीठे हे बंद राहणार असून ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे देण्याचे आदेश राज्य शासनाने 4 ही कृषी विद्यापीठांना दिलेले आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे तर त्यानंतर राज्यातील कोरोनाची परस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे.

Corona : कोरोनाचा परिणाम कृषी विद्यापीठांवरही, काय आहेत राज्य शासनाचे आदेश?
संग्रहीत छायाचित्र

पुणे : (Corona) कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम आता थेट राज्यातील (Agricultural University) कृषी विद्यापीठापर्यंत येऊन ठेपलेला आहे. आता पर्यंत अटी-नियमांमध्ये सुरु असलेले कृषी विद्यापीठे हे बंद राहणार असून ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे देण्याचे आदेश (State Government) राज्य शासनाने 4 ही कृषी विद्यापीठांना दिलेले आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे तर त्यानंतर राज्यातील कोरोनाची परस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे. यासंबंधी कृषी विद्यापीठांच्या कुलसचिवांना शासनाने आदेश दिले आहेत. त्यानुसार कृषी विद्यापीठे, विद्यापीठांना संलग्न असणारे विद्यालये आणि महाविद्यालये यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठांमध्ये असेलली विद्यार्थ्यांची संख्या, वसतीगृहामध्ये असलेली राहण्याची सोय यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कुलसचिवांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहेय

वसतीगृहाबाबत स्थानिक प्रशासन घेणार निर्णय

राज्य शासनाच्या आदेशानुसार महिनाभर प्रत्यक्ष नियमित वर्ग हे आता भरणार नाहीत. त्यामुळे आता ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. मात्र, वसतीगृह सुरु ठेवायचे का बंद हा निर्णय संबंधित ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने घ्यावयचा आहे. विद्यार्थ्यांना वसतीगृहामध्ये राहूनच ऑनलाईनव्दारे शिक्षण घेता येणार का वसतीगृहेही बंदा राहणार याचा निर्णय अद्यापही झालेला नाही. 15 फेब्रुवारीनंतरी परस्थितीचा आढावा घेऊनच निर्णय होणार आहे. शिवाय ऑफलाईन वर्ग सुरु होत असताना विद्यार्थ्यांना पालकांचे संमती पत्र महाविद्यालयात अदा करावे लागणार आहे.

काय झाले बैठकीत निर्णय?

कृषी विद्यापीठातील पदवीच्या आठव्या सत्रातील वर्ग हे ऑफलाईनच सुरु राहणार आहेत. तर पदवीचे एक ते सात सत्रातील वर्ग हे ऑनलाईनच सुरु राहणार आहेत.

पदव्युत्तराचे संशोधन व प्रबंधांची कामे ही ऑफलाईनच होणार आहेत. तर त्यांची वसतीगृहे ही बंद राहणार आहेत.

कृषी तंत्र विद्यालयांचे प्रथम आणि द्वितीय वर्षाचे वर्ग हे ऑनलाईनच होणार आहेत. तर तंत्रनिकेतनाचे प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाचे वर्ग हे देखील ऑनालाईनच होणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Untimely Rain: अवकाळी, गारपिटीचा सर्वाधिक फटका विदर्भाला, काय सांगतो कृषी विभागाचा अहवाल?

Onion : दरामुळे नाही तर ‘या’ कारणामुळे लाल कांद्याचा झाला वांदा, हंगामाची सुरवात अन् शेवटही अडचणीचाच

Farmer: अवकाळीमुळे सर्वकाही व्यर्थ मात्र, चंद्रपुरात कृषी विभागाचा चक्रावून टाकणारा दावा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI