Cotton Rate : संपूर्ण हंगामात कापसाला वाढीव दराची झळाळी, अंतिम टप्प्यात विक्रमी दर

| Updated on: Apr 25, 2022 | 12:45 PM

संपूर्ण हंगामात एखाद्या पिकाचे दर टिकून राहतातच असे नाही. त्यामध्ये चढ-उतार हा ठरलेलाच आहे. मात्र, यंदा कापूस याला अपदाद राहिलेला आहे. यंदाच्या हंगामात कापसाचे दर टिकूनच राहिले नाहीत तर ते वाढतच गेले आहेत. आता कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आवक घटली असली तरी दरात वाढ ही कायम आहे. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 12 हजार 500 पर्यंतचा दर मिळत आहे.

Cotton Rate : संपूर्ण हंगामात कापसाला वाढीव दराची झळाळी, अंतिम टप्प्यात विक्रमी दर
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

परभणी : संपूर्ण हंगामात एखाद्या पिकाचे दर टिकून राहतातच असे नाही. त्यामध्ये चढ-उतार हा ठरलेलाच आहे. मात्र, यंदा कापूस याला अपदाद राहिलेला आहे. यंदाच्या हंगामात (Cotton Rate) कापसाचे दर टिकूनच राहिले नाहीत तर ते वाढतच गेले आहेत. आता (Cotton Season) कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे (Cotton Arrival) आवक घटली असली तरी दरात वाढ ही कायम आहे. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 12 हजार 500 पर्यंतचा दर मिळत आहे. तर आवक ही 100 क्विंटलच्या आसपास होत आहे. यंदा हमीभावापेक्षा कापसाला विक्रमी दर मिळाल्याने मराठवाड्यात पुन्हा कापसाचे क्षेत्र वाढणार का ? हे पहावे लागणार आहे.

आवक घटली दर मात्र चढेच

गेल्या 6 महिन्यापासून कापसाचा हंगाम सुरु आहे. मात्र, एकदाही कापसाच्या दरात घट ही झालेली नाही. उलट दिवसेंदिवस यामध्ये वाढच झालेली आहे. हंगामाच्या सुरवातीला 6 हजार 400 रुपये क्विंटलवर असलेला कापूस आता 12 हजार रुपयांवर गेला आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली तरी वाढीव दरामुळे उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. मराठवाड्यात गेल्या काही वर्षापासून कापसाच्या क्षेत्रात घट झाली आहे. असे असले तरी परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक ही कायम राहिलेली आहे. आता यंदा वाढत्या दराचा परिणाम क्षेत्रावर होणार का हे पहाले लागणार आहे.

शेतकऱ्यांच्या निर्णयामुळेच वाढले दर

उत्पादनात घट झाल्याने यंदा कापसाच्या दरात वाढ होणार हे निश्चित होते. त्यामुळेच हंगामाच्या सुरवातीपासूनच शेतकऱ्यांनी कमी दरात कापूस विक्री करायची नाही असा निर्णय घेतला होता. याचा प्रत्यय दरम्यानच्या काळातही आलाही. व्यापारी शेतकऱ्यांच्या दारी गेला तरी शेतकऱ्यांनी विक्रीपेक्षा साठवणूकीलाच महत्व दिले. त्यामुळे गेल्या 10 वर्षात कापसाला जो दर मिळाला नाही तो यंदा मिळालेला आहे. प्रति क्विंटलला 12 हजार 500 असा दर परभणी बाजार समितीमध्ये मिळालेला आहे. राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये ही स्थिती आहे.

यंदा वाढणार कापसाचे क्षेत्र

गेल्या काही वर्षात मराठवाड्यात कापसाच्या क्षेत्रात घट झालेली आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव अणि घटत्या दरामुळे शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र, यंदाचे दर पाहून पुन्हा कापसाचे क्षेत्र वाढेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमधून तर कापूस पीक हे हद्दपारच झाले आहे. त्यामुळे पुन्हा पांढरे सोने बहरणार का हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Turmeric Crop: अवकाळीनंतरही हळदीला चढला ‘पिवळा’ रंग, प्रतिकूल परस्थितीमध्ये उत्पादन वाढले दराचे काय?

Chickpea Crop : हमीभाव केंद्रावर हरभरा विक्रीचा मार्ग मोकळा, पणन मंडळाने ‘असा’ कोणता निर्णय घेतला?

Vineyard Damage : हंगाम संपल्यानंतरही अवकाळीची अवकृपा सुरुच, द्राक्षानंतर आता बागाच उध्वस्त