Cow Milk : एकादिवसात 75 लीटर दूध देते ही गाय, डेयरी मेळाव्यात आकर्षणाचं केंद्र बनलेली ही गाय कुठल्या प्रजातीची
Cow Milk : मागच्या तीन पिढ्यांपासून रमणदीप सिंह यांचं कुटुंब पशूपालनाच्या व्यवसायात आहे. त्यांच्यासाठी गाय फक्त दूध उत्पादनच साधन नाहीय, तर कुटुंबातील एक सदस्य आहे. फार्ममधील सर्व पशूंवर ते कुटुंबातील सदस्यासारखं प्रेम करतात.

गाय हे शेतकऱ्याचं पशूधन आहे. गाय दूध देते. त्यावर शेतकऱ्याच्या कुटुंबाची उपजीविका अवलंबून असते. म्हणून शेतकरी आपल्या गायीवर कुटुंबातील एक सदस्याप्रमाणे प्रेम करतो, तिची काळजी घेतो. हरयाणाच्या करनालमध्ये एक राष्ट्रीय डेयरी मेळावा भरला आहे. या मेळाव्यात एक खास गाय लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहे. ही गाय दिवसाला 70 ते 75 लीटर दूध देते. करनालचे युवा शेतकरी रमणदीप सिंह यांची ही गाय आहे. मागच्या तीन पिढ्यांपासून त्यांचं कुटुंब पशूपालन आणि डेयरी फार्मिंगच्या व्यवसायाशी संबंधित आहे. रमणदीप सिंह यांची ही गाय HF म्हणजे होल्स्टीन फ्रायजियन जातीची आहे. दिवसात तीनवेळा या गायीचं दूध काढलं जातं. रमणदीप यांनी सांगितलं की, दुसऱ्या गायींच्या तुलनेत त्यांच्या गायीची दूध देण्याची क्षमता जास्त आहे. खुराक सुद्धा या गायीचा अपेक्षेपेक्षा कमी आहे.
मागच्या तीन पिढ्यांपासून रमणदीप सिंह यांचं कुटुंब पशूपालनाच्या व्यवसायात आहे. त्यांच्यासाठी गाय फक्त दूध उत्पादनच साधन नाहीय, तर कुटुंबातील एक सदस्य आहे. फार्ममधील सर्व पशूंवर ते कुटुंबातील सदस्यासारखं प्रेम करतात. रमणदीप यांच्यानुसार, डेयरी फार्मिंगच्या बिझनेसमध्ये चांगल्या कमाईची संभावना आहे. त्यांचं कुटुंब दीर्घकाळापासून या व्यवसायाशी संबंधित आहे. या युवा शेतकऱ्याने आपल्या गायीच्या खुराकाबद्दल सुद्धा माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, गायीला रोज सॅलेड आणि फीड दिलं जातं. दिवसातून तीनवेळा गायीचं दूध काढलं जातं.
तीन पिढ्यांपासून या व्यवसायात
या गायीने आधी सुद्धा अनेक मेळाव्यांमध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे, असं रमणदीप यांनी सांगितलं. एकादिवसात अधिक दूध उत्पादनासाठी अनेकदा या गायीला सन्मानित सुद्धा करण्यात आलय. रमणदीप म्हणाले की, पशूपालनाच्या व्यवसायात मेहनत आहे आणि चांगल्या देखभालीने चांगलं उत्पन्न सुद्धा मिळतं. आमचं कुटुंब तीन पिढ्यांपासून या व्यवसायात आहे. आता ते सुद्धा हा व्यवसाय पुढे नेत आहेत. राष्ट्रीय डेयरी मेळाव्यात रमणदीप यांच्या गायीचं दूध उत्पादन चर्चेचा विषय बनलं आहे.