तारीख चुकवलेल्या मान्सूनचं महाराष्ट्रात ‘या’ तारखेला आगमन! येत्या 48 तासांत केरळात दाखल होण्याचा अंदाज

| Updated on: May 28, 2022 | 7:42 AM

Monsoon Rain Update : मान्सून 5 जूनला महाराष्ट्रात दाखल होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. दोन दिवस अगोदर मान्सूनचा पाऊस राज्यात दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला.

तारीख चुकवलेल्या मान्सूनचं महाराष्ट्रात या तारखेला आगमन! येत्या 48 तासांत केरळात दाखल होण्याचा अंदाज
महाराष्ट्रात पुर्व मोसमी पावसासाठी अनुकूल वातावरण
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : वाढलेल्या तापमानात पाऊस कधी बरसणार, याकडे सगळ्याची नजर लागलीय. यंदा मान्सून (Monsoon Rain) लवकर बरसेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र तूर्तास तरी मान्सूनचे आगमनाची तारीख चुकवली आहे. 27 तारखेला मान्सून केरळात (Monsoon in Keral) दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र अद्याप मान्सून केरळमध्ये दाखल झाला नसून येत्या 48 ते 72 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, अशी शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, त्यानंतर आठ ते दहा दिवसांत मान्सून गोव्यासह महाराष्ट्र (Maharashtra Monsoon Update) आणि पश्चिम बंगालमध्ये दाखल होईल, असं सांगितलं जातंय. केरळात मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण झालेली आहे. मात्र असनी चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनच्या आगमानवर झाला आहे. त्यामुळे मान्सूनचं आगमन लांबणीवर पडत असल्याचं पाहायला मिळतंय. भारतीय हवामान विभागानं याबाबतचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान तज्ज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने आणि केरळच्या किनारपट्टीवरील ढगाळ वातावरणात वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसात केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. तसंच शुक्रवारीहीदेखील पावसाची सीमा आणखी उत्तरेकडे सरकली असल्याचं त्यांनी म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

ट्वीटमध्ये काय म्हटलं?

ढगाळ वातावरणाने काहिली वाढली

सध्या मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरणाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे उकाडा आणखी वाढलाय. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व सरींनी हजेरीही लावली. मात्र त्यानंतर तापमान पुन्हा वाढलं. परिणामी लोकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय. अशातच मान्सूनच्या सरींची प्रतीक्षा सगळ्यांना आहे.

पाहा व्हिडीओ : तीन दिवसांपूर्वी नागपुरात मुसळधार

मान्सून 5 जूनला महाराष्ट्रात दाखल होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. दोन दिवस अगोदर मान्सूनचा पाऊस राज्यात दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला. मात्र अद्याप केरळमध्ये मान्सून पोहोचलेला नसल्यानं महाराष्ट्रातील मान्सूनचं आगमनही लांबणार आहे. त्यामुळे 5 जून ऐवजी दहा जूनला मान्सूनचा पाऊस राज्यात बरसेल, अशी शक्यता वर्तवली गेली आहे.

पेरणीची घाई नको!

दरम्यान, पेरणीची घाई करु नये, असं आवाहन राज्यातील शेतकऱ्यांना राज्याच्या कृषी मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. आता मान्सूनचं आगमन लांबल्यानं शेतकरीची नजर आभाळाकडे लागली आहे. दरम्यान, मान्सून अंदमान आधीच दाखल झाला असून त्याचा प्रवास केरळच्या दिशेनं सुरु आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सूनचा पाऊस केरळमध्ये बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.