सरसकट पीकविमा मंजूर करा, पंचनाम्यासाठी वेळ घालवू नका, नांदेडच्या खासदारांची ठाकरे सरकारकडं मागणी

| Updated on: Sep 12, 2021 | 2:44 PM

आता नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरसकट पीक विमा मंजूर करावा, अशी मागणी प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलीय.

सरसकट पीकविमा मंजूर करा, पंचनाम्यासाठी वेळ घालवू नका, नांदेडच्या खासदारांची ठाकरे सरकारकडं मागणी
प्रताप पाटील चिखलीकर
Follow us on

नांदेड: महाराष्ट्रात यंदा अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळं आलेल्या मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळं शेतीचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांचं नुकसान भरुन काढण्यासाठी पीक विमा मंजूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. आता नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरसकट पीक विमा मंजूर करावा, अशी मागणी प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलीय.

1983 नंतर प्रथमचं मोठा पाऊस

नांदेडमध्ये अतिवृष्टीनंतर सरकारने सरसकट पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलीय. 1983 नंतर प्रथमच यंदा मोठा पाऊस झाल्याने पंचनामे करून वेळ वाया घालू नये, अशीही मागणी खासदार चिखलीकर यांनी केलीय. अर्धापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या, यावेळी त्यांनी थेट बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. त्या नंतर पत्रकारांशी बोलताना खासदार चिखलीकर यांनी पीकविमा मंजूर करण्याची मागणी केलीय.

पीक विमा कंपन्यांच्ये सर्व्हर बंद

नांदेडमध्ये अतिवृष्टीनंतर पीकविमा कंपण्यासह सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पिकांचे नुकसान झाल्यास पीकविमा कंपन्यांना फोटो पाठवावे लागतात, मात्र विमा कंपन्यांचे इंटरनेट सर्व्हर बंद पडलंय. त्यामुळे नुकसानीचे फोटो पाठवावे कसे असा सवाल शेतकरी करतायत, तर दुसरीकडे महसूल विभागाने अद्यापही नुकसान झालेल्या शेताकडे ढुंकूनही पाहिलेलं नाही. त्यामुळे नुकसान भरपाई मिळेल की नाही अशी शंका शेतकऱ्यांना येतेय. काढणीला आलेलं पीक हाथचे गेल्याने आता आगामी सणासुदीचे दिवस काढावेत कसे असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय.

नांदेडमध्ये अतिवृष्टीनंतर वाऱ्यावर सोडल्याची भावना शेतकऱ्यांत निर्माण झालीय. अतिवृष्टी होऊन चार दिवस उलटले तरी अद्याप कुणीही बांधावर फिरकलेले नाही. त्यामुळे योग्य ती नुकसान भरपाई मिळेल की नाही अशी शंका शेतकऱ्यांना येतेय.

देशभर पीक विमा कंपन्यांच्या कारभाराची बोंबाबोंब, अशोक चव्हाणांचा आरोप

नांदेडमध्ये मंत्री अशोक चव्हाण यांनी अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी केली होती. यावेळी मंत्र्यांच्या कानावर आपले गाऱ्हाणे घालण्यासाठी तौबा गर्दी उसळली होती. यावेळी पीक विमा कंपन्यांच्या सावळ्या गोंधळाबाबत शेतकऱ्यांनी मंत्र्यांकडे तक्रारी केल्या. त्यावर मंत्री चव्हाण यांनी देशभरात पीक विमा कंपन्यांविरोधात बोंबाबोंब सुरू असल्याचे सांगितलय. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात जवळपास पन्नास टक्के शेतीचे नुकसान झालंय, त्याचे पंचनामे करणं अवघड असल्याचे सांगत त्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर केला जाईल असे मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.

इतर बातम्या:

VIDEO: शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्रं यावं; बाळासाहेब थोरातांचं पहिल्यांदाच खुलं आवतन

Lord Ganesha | तुळशीने गणपतीला शाप का दिला होता, जाणून घ्या ही पौराणिक कथा…

नागपूरकरांचं टेन्शन वाढलं, 12 पोलिसांना कोरोना, पोलीस दलात खळबळ

हेही पाहा

Nanded MP Pratap Patil Chikhalikar demanded Thackeray Government approve Crop Insurance quickly