Onion Price Today: जुन्नरच्या बाजारसमितीत 13 हजार बॅगा कांद्याची आवक, कांद्याचा आजचा दर किती?

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील कांदा उपबाजारात आज 13 हजार 340 कांदा पिशव्यांची आवक झाली. प्रतवारी होऊन एक नंबर कांद्यास 10 किलोस 200 रूपये बाजारभाव मिळाला.

Onion Price Today: जुन्नरच्या बाजारसमितीत 13 हजार बॅगा कांद्याची आवक, कांद्याचा आजचा दर किती?
जुन्नर बाजार समिती
| Edited By: | Updated on: Aug 14, 2021 | 4:27 PM

जयवंत शिरतर, टीव्ही 9 मराठी, जुन्नर पुणे: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील कांदा उपबाजारात आज 13 हजार 340 कांदा पिशव्यांची आवक झाली. प्रतवारी होऊन एक नंबर कांद्यास 10 किलोस 200 रूपये बाजारभाव मिळाला. तसेच दोन कांद्यास दहा किलोस 150 ते 180 बाजारभाव मिळाला.तर गोल्टा काद्यास 80 ते 150 इतका बाजारभाव मिळाला. आवक जरी वाढत असली तरी बाजारभाव थोडीफार सुध्दा भाव वाढ झालेली दिसुन येत नाही.त्यामुळे कांद्याचे बाजारभाव सध्यातरी स्थीर राहणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

कांद्याला 20 रुपयांचा दर

पुणे जिल्ह्यातील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील कांदा उपबाजारात आज 13 हजार 340 कांदा पिशव्यांची आवक झाली. कांदा बाजारसमितीमध्ये दाखल झाल्यानंतर त्याची प्रतवारी करण्यात आली. प्रतवारी होऊन एक नंबर कांद्यास 10 किलोला 200 रूपये बाजारभाव मिळाला. म्हणजेच शेतकऱ्यांना एका किलोला 20 रुपयांचा दर मिळाला.

कांद्याचे बाजारभाव स्थिर राहण्याची शक्यता

एक नंबरच्या कांद्याला 20 रुपयेचा दर मिळाला तर दोन नंबरच्या कांद्यास दहा किलोस 150 ते 180 बाजारभाव मिळाला. तर, गोल्टा कांद्यास 80 ते 150 इतका बाजारभाव मिळाला. आवक जरी वाढत असली तरी बाजारभाव थोडीफार सुध्दा भाव वाढ झालेली दिसून येत नाही.त्यामुळे कांद्याचे बाजारभाव सध्यातरी स्थिर राहणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा

जुन्नर बाजार समितीमध्ये एक नंबर कांद्याला 20 रुपयांचा दर मिळाला असला तर शेतकऱ्यांना यापेक्षा अधिक दर मिळण्याची अपेक्षा आहे. कांद्याचे दर वाढले पाहिजेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय.

कांदा लावताना बीजपक्रिया करण्याचं आवाहन

कांदा म्हटलं कि योग्य नियोजन कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी न केल्यास वांदे होतात. राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्रा (एनएचआरडीएफ) च्या वतीने पीकपद्धतीत केलेल्या संशोधनातून खरीप हंगामातील कांदा उत्पादन घेताना रोपवाटिकेचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करण्याची गरज समोर आलीय. नियोजनासोबत बीज प्रक्रिया महत्त्वाची असून यातून रोगाचा प्रादुर्भाव रोखता येऊन उत्पादन वाढविणे शक्य असल्याने शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करूनच रोपे टाकण्याचे आवाहन करण्यात आलंय.
भाजीपाला पिकात कांदा हे पिक शेतकरी दष्ट्या महत्वाचे नगदी व निर्यातयोग्य मसाला पीक आहे. कांदा भारतीय लोकांच्या रोजच्या आहारातील अविभाज्य भाग आहे. जागतिक स्तरावरील भाजीपाला पिकाचा क्षेत्रविस्तार लक्षात घेता कांदा हे दुस-या क्रमांकाचे पीक आहे. कांदा हे मुख्यत थंड (हिवाळी) हंगामातील पिक जरी असले मात्र हे खरीप, रांगडा आणि रब्बी या तीन टप्प्यात कांद्याचे पिक घेतले जाते.

इतर बातम्या

वाशिममध्ये ‘या’मुळे सोयाबीनचं 90 टक्के उत्पादन घटणार, तर केंद्राच्या आयातीनं दरातही मोठी घसरण

सोयाबीनवर चक्रीभुंगा, खोडमाशी, उंटअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता, कृषीतज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना ‘हा’ सल्ला

Onion Price Today Junnar APMC more thirteen thousand bag onion came for auction farmers get twenty rupees rate