PM Fasal Bima Yojana: KCC कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना करावं लागणार ‘हे’ काम, अन्यथा नुकसानाची शक्यता

| Updated on: Jul 08, 2021 | 1:50 PM

शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असेल त्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हायचंय की नाही हे बँकांना कळवण्यासाठी 24 जुलैपर्यंत मुदत आहे. शेतकऱ्यांना बँकांमध्ये पीक विमा योजनेत सहभागी व्हायचंय की नाही हे लेखी द्यावं लागणार आहे.

PM Fasal Bima Yojana: KCC कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना करावं लागणार हे काम, अन्यथा नुकसानाची शक्यता
किसान क्रेडिट कार्ड
Follow us on

नवी दिल्ली: खरिप हंगामातील पिकांसाठी विशेष करुन धान (Paddy), मका, बाजरी, कापूस यासह इतर पिकांचा विमा हप्ता भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. पीक विमा काढण्यासाठी आता 22 दिवस उरले आहेत. मात्र, शेतकऱ्यांना पिकाची पेरणी केल्यानंतर पुढील 10 दिवसांमध्ये पीक विमा योजनेमध्ये अर्ज दाखल करावा लागेल. ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड असेल त्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हायचंय की नाही हे बँकांना कळवण्यासाठी 24 जुलैपर्यंत मुदत आहे. शेतकऱ्यांना बँकांमध्ये पीक विमा योजनेत सहभागी व्हायचंय की नाही हे लेखी द्यावं लागणार आहे. (PM crop insurance scheme date extended till 31 july its optional for farmers KCC farmers may be inform to bank before 24 July scheme is accepted or not)

केसीसी धारक शेतकऱ्यांना बँकांना कळवावं लागणार

पीएम पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभागी होणं आता ऐच्छिक ठेवण्यात आलं आहे. शेतकऱ्यांची इच्छा असल्यास ते यामध्ये सहभागी होऊ शकतात. जे शेतकरी किसान क्रेडिट कार्ड (KCC) धारक आहेत त्यांना पीक विमा योजनेत सहभागी व्हायचं आहे की नाही हे नोंदवावं लागेल. ज्या शेतकऱ्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांच्या कर्जामधून योजनेचा प्रीमियमम कापला जाईल. किसान क्रेडिट धारक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी व्हायचंय की नाही हे 24 जुलैपर्यंत बँकाना कळवावं लागेल. अन्यथा त्यांचा पीक विमा योजनेत समावेश केला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांवर कोणतही कर्ज नाही ते ग्राहक मदत केंद्रावर जाऊन पीक विमा काढू शकतात.

विमा योजनेत पिकाचा बदल

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ज्या पिकासाठी विमा उतरवायचा असेल ते पीक बदलण्यासाठी शेतकऱ्यांकडे 29 जुलैपर्यंत पर्याय आहे. पीक बदलाबाबत शेतकऱ्यांना ही माहिती बँकेला द्यावी लागेल. पीक विमा योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी योजना अधिकारी आणि सर्वेक्षक नियुक्त करण्यातक आले आहेत. विमा कंपन्यांच्या मदतीसाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. किसानों को कितना मिला क्लेम

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय पातळीवर पीक विमा योजनेमध्ये 13 जानेवारी 2016 ते डिसेंबर 2020 मध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 19 हजार कोटी रुपयांचा प्रीमियम भरलाहोता. त्याबदल्यात त्यांना 90 हजार कोटी रुपयांचा परतावा मिळाला आहे.

संबंधित बातम्या:

Money: पोस्ट ऑफिसच्या 5 बचत योजनांमध्ये पैसे गुंतवा, कमी कालावधीमध्ये पैसे दुप्पट होणार

घर भाड्याने देण्यापेक्षा LIC च्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा, महिन्याला तब्बल 45 हजारापर्यंत कमवा!

(PM crop insurance scheme date extended till 31 july its optional for farmers KCC farmers may be inform to bank before 24 July scheme is accepted or not)