सोयापेंड, सोयाबीन नंतर पोल्ट्रीधारकांचे लक्ष आता गहू – तांदळावर, काय आहे नेमके कारण?

| Updated on: Mar 13, 2022 | 12:00 PM

पोल्ट्री उद्योग हा शेतीला जोडव्यवसाय मानला जात आहे. त्यामुळे या व्यवसयात वाढ होत असली तरी यामध्ये अडचणींचा सामनाही करावा लागत आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे पक्षांच्या खाद्याचे दर हे वाढत आहेत. खाद्य दर वाढताच पोल्ट्री धारकांकडून शेतीमालाच्या दरात घट करण्याची मागणी होत आहे. यापूर्वी सोयापेंडवरील आयातशुल्क कमी करावे तसेच सोयाबीनचे दर अटोक्यात रहावे म्हणून प्रयत्न करण्यात आले होते.

सोयापेंड, सोयाबीन नंतर पोल्ट्रीधारकांचे लक्ष आता गहू - तांदळावर, काय आहे नेमके कारण?
पोल्ट्री व्यवसाय
Follow us on

पुणे :  (Poultry business) पोल्ट्री उद्योग हा शेतीला जोडव्यवसाय मानला जात आहे. त्यामुळे या व्यवसयात वाढ होत असली तरी यामध्ये अडचणींचा सामनाही करावा लागत आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे पक्षांच्या (Food Prices) खाद्याचे दर हे वाढत आहेत. खाद्य दर वाढताच पोल्ट्री धारकांकडून शेतीमालाच्या दरात घट करण्याची मागणी होत आहे. यापूर्वी सोयापेंडवरील आयातशुल्क कमी करावे तसेच सोयाबीनचे दर अटोक्यात रहावे म्हणून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, यामध्ये (Central Government) केंद्र सरकारने हस्तक्षेपच केला नसल्याने सोयाबीनच्या दरावर परिणाम झाला नाही. आता पुन्हा पक्ष्यांच्या खाद्यदरात वाढ होत असताना गहू आणि तांदूळ हे अनुदानावर देण्याची मागणी ही पोल्ट्री उद्योजकांनी केली आहे. कोरोनानंतर पोल्ट्री व्यवसाय रुळावर येत असला तरी खाद्याचे वाढत्या दरामुळे अडचणी ह्या कायम आहेत.

देशात पोल्ट्री व्यवसयाचे कसे आहे स्वरुप

बॉयलर उत्पादनात देश हा चौथ्या क्रमांकावर असला तरी अंडी उत्पादनामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2020 साली पोल्ट्री मार्केटमधून उत्पादन हे 2 लाख कोटींवर पोचले होते तर देशात वर्षाला 11 हजार 500 कोटी अंड्याचे उत्पादन होत असल्याची माहिती ही पोल्ट्री ब्रीडर्सने दिली आहे. तर 45 लाख टन चिकनचे उत्पादन होत आहे. वाढती मागण्यामुळे शेतकरी पोल्ट्रीला अधिक प्राधान्य देत आहे पण खाद्याच्या दरामुळे हा व्यवसाय अडचणीत येत आहे.

मका, सोयामीलला अधिकचे प्राधान्य

पोल्ट्री उद्योगामध्ये पक्ष्यांना खाद्यासाठी मका आणि सोयामीलचा अधिकचा वापर होतो. देशात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गुजरात, ओडिशा या राज्यांमध्ये पोल्ट्री व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, पोल्ट्री खाद्याचे दर हे गेल्या तीन महिन्यांमध्ये 35 वरुन 45 रुपये प्रतिकिलोवर आलेले आहेत. विशेषत: मका आणि सोयापेंडच्या दरात वाढ झाली असून याच दोन उत्पादकांचा खाद्यामध्येन वापर असतो. त्यामुळे कोरोनानंतर परस्थिती सुधारली असली तरी महागाईला सामोरे जावे लागत आहे.

पशूखाद्याच्या दरवाढीमुळे व्यवसायही बंद

वाढत्या पशखाद्याच्या दरामुळे पोल्ट्री व्यवसायही बंद करण्याची नामुष्की ओढावलेली आहे. त्यामुळे सरकारनेन जर गहू आणि तांदळावर अनुदान दिले तर व्यवसाय उभारी घेऊ शकेल अन्यथा वाढत्या महागाईला त्रासून हा व्यवसाय बंद करण्याचे प्रमाण वाढणार आहे. परिणामी पुन्हा वाढत्या मागणीमुळे चिकन, अंड्याचे दर वाढतील असा अंदाज पोल्ट्री उद्योजक विजय जाधव यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

अवकाळीचा कहर त्यात महावितरणची भर, शॉर्टसर्किटने ऊस जळून खाक, अशी मिळवा आर्थिक मदत..!

Grape Export : सांगलीतून 8 हजार टन द्राक्षाची निर्यात, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांच्या काय आहेत अपेक्षा?

Rabi Season : वातावरण निवळले आता सुगी जोमात, मजूर टंचाईवर शेतकऱ्यांचा ‘हा’ रामबाण उपाय..!