Rabbi Seasons: रब्बी पेरणीपूर्वी अगोदर करा हे काम, पाण्याची बचत, खर्चही वाचणार

Rabi Crops Sowing: राज्य दुष्काळाने होरपळले आहे. परतीच्या पावसाची अजूनही आस आहे. त्यातच शेतकर्‍यांनी रब्बीसाठी शेती मशागतीला सुरुवात केली आहे. शेतकर्‍यांनी ही कामं केल्यास पाण्याची बचत होऊन त्यांचा खर्चही वाचणार आहे.

Rabbi Seasons: रब्बी पेरणीपूर्वी अगोदर करा हे काम, पाण्याची बचत, खर्चही वाचणार
रब्बीत घ्या ही काळजी
| Updated on: Oct 14, 2026 | 1:33 PM

Rabi Crops Sowing: सध्या राज्य दुष्काळाच्या जबाड्यात आहे. परतीच्या पावसाची अजूनही शेतकऱ्यांना आस आहे. रब्बी हंगामात काहीतरी हाती लागावे अशी आशा शेतकऱ्यांना आहे. रब्बीतील पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. जर परतीच्या पावसाने दिलासा दिल्यास पेरणीला वेग येऊ शकतो. कृषी शास्त्रज्ञांच्या मते, शेतकऱ्यांनी मातीतील उरलेला ओलावा टिकून राहण्यासाठी आता प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्याची बचत आणि शेतीचा खर्च कमी करण्याची कसरत केल्यास रब्बी हंगामात कमी खर्चिक पीक हाती लागू शकते.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ दिली. यामुळे राज्यातील उभ्या पिकांना मोठा फटका बसला. उत्पादन 50 टक्क्यांनी घटले. काही शेतकऱ्यांचा तर उत्पादन खर्चही निघला नाही, इतके कमी पीक आले आहे. अनेक शेतात शेतकऱ्यांनी सोयाबीन उपटून फेकले. तर काही ठिकाणी कल्टीवेटर, रोटावेटर फिरवला. पण जर तुमच्या शेतात ओलावा असेल तर त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. रब्बी पीक हाती नाही आले तरी शेडनेट करत शेतकरी पाण्याच्या योग्य नियोजनाआधारे टोमॅटो, मिर्ची, फुलकोबीचे उत्पादन घेऊ शकतो. लहरी हवामानात हिम्मत न हारता काही शेतकरी अभिनव प्रयोग करत आहेत. त्याची दखल घेणे आवश्यक आहे.

Loading...

बांध-सरीचा वापर

पावसाचा सध्या काही भरवसा नाही. परतीचा पाऊस पडण्याची शक्यता फार नाही. जर पाऊस झालाच तर त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. विहिरीला थोडेफार पाणी असेल तर शेतात योग्य वाफे तयार करून, बांध आण सरीच्या माध्यमातून जमिनीत ओलावा टिकवून ठेवणे आवश्यक आहे. यामुळे पाण्याची नासाडी होणार नाही. भाजीपाला पिकांसाठी ठिंबक सिंचन, तुषारचा वापर केल्यास पाण्याची नासाडी थांबेलच पण पिकालाही योग्य पाणी आणि खतांचा पुरवठा होईल.

गवत, काडीकचऱ्याचा योग्य वापर

यंदा दुष्काळामुळे गवत आणि काडीकचऱ्याचा योग्य वापर करणे फायद्याचे ठरेल. भाजीपाला घेत असाल तर जमिनीची धूप थांबवण्यासाठी काडी कचरा आणि सुकलेले गवत उपयोगी ठरेल. नैसर्गिक अच्छादन म्हणून त्याचा वापर करता येईल. यामुळे मातीमधील ओलावा दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होईल. तण उगवणार नाही. प्लॅस्टिकच्या अच्छादनासाठी अधिक खर्च येतो. अशावेळी गवत उपयोगी ठरते. तर शेडनेडसाठी साड्या, धोतरांचा वापर करता येऊ शकतो. यामुळे खर्चाची बचत होते.

सेंद्रिय खताचा वापर करा

कृषी वैज्ञानिकांच्या मते, या काळात शेतात प्रति हेक्टर 50 क्विंटल शेणखत अथवा 10-20 क्विंटल गांडुळ खत टाकता येऊ शकते. रब्बीत मातीची गुणवत्ता, मातीचे आरोग्य, पिकाच्या गरजेनुसार हे प्रमाण कमी अधिक होऊ शकते. माती परिक्षणानंतर कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, युरिया, फॉस्फरस, पोटॅशचा वापर करता येतो.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us