दोन दिवस पावसाचेच, काढलेल्या पिकांची सुरक्षतता महत्वाची

| Updated on: Sep 22, 2021 | 3:24 PM

मंगळवारी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. यामध्ये बीड, परभणी आणि जालना या जिल्ह्यातील तब्बल 19 मंडळामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वावरात असलेल्या पिकांचे नुकसान तर झालेच आहे पण काढणी झालेल्या पिकांची काळजीही महत्वाची आहे.

दोन दिवस पावसाचेच, काढलेल्या पिकांची सुरक्षतता महत्वाची
पावसाने खरीपातील पिकांची झालेली अवस्था
Follow us on

लातूर : मंगळवारी मराठवाड्यातील (Rain) आठही जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. यामध्ये बीड, परभणी आणि जालना या जिल्ह्यातील तब्बल 19 मंडळामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वावरात असलेल्या पिकांचे नुकसान तर झालेच आहे पण काढणी झालेल्या पिकांची काळजीही महत्वाची आहे.

कारण काढणी केलेल्या धान्याला बुरशी लागण्याचा धोका असतो. (Crop in Safe place) त्यामुळे खरिपातील सोयाबीन, उडीद याची काढणी केली की ते सुखावून ठेवणे गरजेचे आहे. सध्या पावसाचे दिवस असले तरी या दरम्यान पिकांची काळजी घेतली तरच उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

खरीपातील पिकांचे यापुर्वीच पाऊस आणि कीडीच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. शिवाय अजून दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानेही वर्तवलेला आहे. सध्या खरीपातील केवळ उडीद आणि सोयाबीन ही दोनच पिके वावरात आहेत. सोयाबीनचीही काढणी कामे सुरु असली तरी उशीराने पेरा झालेले सोयाबीन हे वावरात किंवा शेतकऱ्यांनी काढलेल्या सोयाबीनची साठवणूक केलेली आहे.

काढलेले सोयाबीन एकत्रच साठवून न ठेवता उन्हामध्ये किंवा कोरड्या वातावरणात सुखावणे गरजेचे आहे. आजही शेतकरी हे पावसाचा परिणाम होऊ नये म्हणून एकाच जागी साठवणूक करुन ठेवतात. यामुळे शेंगाला बुरशी लागण्याचा धोका संभावतो. त्यामुळे सोयाबीन वाळवूण पुन्हा त्याची गंज लावली तरी पिकाचे नुकसान हे टळणार आहे. दरम्यान, पावसाने उघडीप दिल्यास यंत्राच्या सहाय्याने त्वरीत काढणी कामे उरकून घेणे आवश्यक आहे.

असे करा पिकाचे व्यवस्थापन

पावसाची शक्यता असेल तर शेतकऱ्यांनी काढणी झाली की लागलीच त्याचे खळे करणे आवश्यक आहे. कारण काढणीनंतर जर पाऊस झाला आणि सोयाबीन, उडीद हे भिजले तर मालाचा दर्जाही ढातळतो आणि पिकाची उगवणही होण्याचा धोका संभावतो त्यामुळे पावसाचे वातावरण असेल तर शेतकऱ्यांनी काढणी झाली की, लागलीच यंत्राच्या सहाय्याने पिक पदरात पाडून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागले तरी भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी हे गरजेचे आहे.

पावसाचा जोर कायम राहणार

पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान वर्तवला आहे. त्यानंतर 25 सप्टेंबरला पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा शेवटही पावसानेच होणार असल्याचे चित्र आहे. पावसाने उघडीप देताच शेतकऱ्यांनी शेती कामे उरकून धान्य हे कोरड्या जागेत ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा शेतामध्ये असतानाही पावसामुळे आणि काढणीनंतरही पावसामुळेच पिकाचे नुकसान होईल. (Rain for two days, farmers need to take care of crops )

संबंधित बातम्या :

सावधान…! शेती आवजारे घेताना शेतकऱ्यांनो खबरदारी घ्या

चिकनपेक्षा मेथी महाग, नागपूरमध्ये भाज्यांचे दर शंभरीपार, मुंबई पुण्यातही भाजापीला महागला; खायचं काय बटाटे?

मुदत अंतिम टप्प्यात तरीही ई-पीक पाहणीचा सावळा गोंधळ सुरुच