ढबू घ्या ढबू…. फुकट घ्या ढबू, ट्रॉलीभर ढबू 17 मिनिटात फस्त; सांगलीत नेमंक काय घडलं?

| Updated on: Aug 23, 2021 | 10:49 AM

शेतकरी शेतमालाला किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभाव का मागतो हे दाखवून देणारी घटना सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील कुंभारगाव मध्ये घडलीय.

ढबू घ्या ढबू.... फुकट घ्या ढबू,  ट्रॉलीभर ढबू 17 मिनिटात फस्त; सांगलीत नेमंक काय घडलं?
भीमराव साळुंखे
Follow us on

सांगली: शेतकरी शेतमालाला किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभाव का मागतो हे दाखवून देणारी घटना सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील कुंभारगाव मध्ये घडलीय. कडेगाव तालुक्यातील भीमराव साळुंखे या शेतकऱ्यानं शेतात कष्ट करुन पिकवलेल्या ढबू मिरचीला भाव नसल्यानं फुकट वाटली. भीमराव साळुंखे यांच्याकडील ट्रॉलीभर ढबू मिरची अवघ्या 17 मिनिटांमध्ये फस्त झाली. फुकट मिळणारी ढबू घेताना एकाही व्यक्तीला शेतकऱ्याला थोडीफार रक्कम द्यावी, असं वाटलं नाही.

घ्या घ्या ढबू घ्या फुकट घ्या

कुंडल पासून दोन किलोमीटरवरील कुंभारगावत भीमराव साळुंखे हे दरवर्षी 25 गुंठे ढोबळी मिरचीची लागवड करतात. मुंबई, पुणे येथील बाजार समितीमध्ये ढबू मिरची पॅक करुन पाठवतात. वाहतूक, पॅकिंग, मजुरी यासाठी 6 रुपये किलोला खर्च येतो तेथे त्यांना पंधरा रुपये किलो दर जरी मिळाला तरी 9 रुपये किलोला ढोबळ नफा राहत होता. यातूनही ते समाधानी असत, कारण खर्च वजा जाता तिन ते चार महिन्यात त्यांना लाखांचा तरी फायदा होतच होता. मात्र, यंदा वेगळंचं घडलं. ढबू मिरचीला दर नसल्यानं व्यापाऱ्यांनी बाजारात माल पाठवू नका असं सांगितलं. झाडं जगवण्यासाठी तोडा घेणं आवश्यक असल्यानं भीमराव साळुंखे यांनी ढबू तोडून फुकट वाटण्याचा निर्णय घेतला.

ढबू फुकट वाटण्याचा निर्णय का घेतला?

भीमराव साळुंखे यांच्या पुढं काय करायचं हा प्रश्न पडला होता. अखेर ढबू तोडून झाडे जगवण्याच निर्णय घेतला. बाजारपेठेत गेल्यास वाहतुकीचा खर्चही निघणार नसल्यानं साळुंखे यांनी पंचक्रोशीत ढबू मिरची फुकट वाटण्याचा निर्णय घेतला. भीमराव साळुंखे यांनी अंबक, चिंचणी, देवराष्ट्रे, मोहिते वडगाव, कुंडल येथे ढोबळी मिरची ट्रॉलीतून फुकट वाटली.

शेतकऱ्यांचं आर्थिक गणित विस्कटलं

कोरोना विषाणू संसर्ग, लॉकडाऊन, महापूर या सगळ्या संकटाचा सामना करत शेतकरी आर्थिक अडचणीतून वाट काढतोय. घाट माथ्यावर पिकं चांगली आहेत पण बाजारात मात्र त्याला दर नसल्याने शेतकऱ्यांचे गणित विस्कटलेले आहे.

इतर बातम्या:

खवय्यांना आता जिवंत मासे, मस्त्य उत्पादकांचीही भरभराट, लाईव्ह फिश कॅरियर सिस्टीम नेमकी काय?

बीडवर दुष्काळाचं सावट, सोयाबीन करपू लागलं; पीक विमा कधी मिळणार? कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांची मागणी

Sangli farmer Bhimrao Salunkhe distribute capsicum free of cost in kadegaon