येथील शेतकरी वळले हळद उत्पादनाकडे; शिरपूर गावाची ओळख आता हळद उत्पादक म्हणून

| Updated on: Apr 03, 2023 | 3:07 PM

मसालावर्गीय हे पीक आता शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस दाखवत आहे. विशेष म्हणजे वादळ, वाऱ्याचा या पिकावर फारसा काही परिणाम होत नाही.

येथील शेतकरी वळले हळद उत्पादनाकडे; शिरपूर गावाची ओळख आता हळद उत्पादक म्हणून
Follow us on

वाशिम : शेतकरी हळदीच्या पिकाकडे वळत आहेत. नगदी पिक म्हणून याकडे पाहिलं जाते. शिवाय हळद व्यवस्थित तयार करून ठेवली म्हणजे लवकर खराब होत नाही. त्यामुळे मागेपुढे केव्हाही विक्री करता येते. पी हळद नि हो गोरी, अशी एक म्हण आहे. मसालावर्गीय हे पीक आता शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस दाखवत आहे. विशेष म्हणजे वादळ, वाऱ्याचा या पिकावर फारसा काही परिणाम होत नाही. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी हळद पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करत आहेत.

मजुरांच्या हाताला काम

सोयाबीन बेल्ट म्हणून ओळख असलेल्या वाशीम जिल्ह्यातील शेतकरी मागील 5 वर्षापासून काही प्रमाणात हळद पिकाकडे वळला आहे. वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक हळद उत्पादक शेतकरी शिरपूर येथे आहेत. मे-जून महिन्यात लागवड केलेली हळद काढणीच्या कामाची शेतकऱ्याची लगबग सुरू झाली. जमिनीतून ट्रॅक्टरच्या सहाय्याने हळद वर काढण्यात येत आहे. त्यानंतर मजुराच्या हाताने हळद जमा करून ती बॉयलरच्या साह्याने उकळण्यात येत आहे. हळद उकडल्यानंतर सुकवून तिची घसाई केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

शिरपूरच्या वाणाला मोठी मागणी

वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक हळद उत्पादन शेतकरी शिरपूर येथे आहेत. त्यांना हळद वाणाला बाजारपेठेत चांगला भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे. परिसरात हळद लागवड क्षेत्रामध्ये दरवर्षी वाढ होत आहे. यापासून मजुराला सुद्धा मोठा रोजगार मिळतो. हळदीचा सरकारने मसाला वर्गीय वाणामध्ये वर्षापूर्वी समावेश केला आहे. त्यामुळे हळद पिकाकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळले आहेत.

एक लाख क्विंटलहून अधिक लागवड

ज्यांच्याकडे शाश्वत सिंचन व्यवस्था आहे ते निश्चित स्वरूपात काही ना काही प्रमाणात हळदीची लागवड करीत असतात. शिरपूर परिसरात एक लाख क्विंटल हून अधिक हळद उत्पादन दरवर्षी होत असते. हळद उत्पादनाचे गाव म्हणून शिरपूरची नवीन ओळख निर्माण झाली आहे.

शिरपूर गावाची वाण आता चांगलेच प्रसिद्ध होत आहे. लोकांची मागणी वाढ आहे. त्यामुळे हळदी उत्पादकांना दोन पैसे जास्त मिळायला लागले आहेत.