अकोला जिल्ह्याला अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, तर प्रशासनाकडून एप्रिल फुल…

| Updated on: Apr 01, 2023 | 2:41 PM

वाऱ्याचा जोर जास्त असल्याने मोठी झाडेही उन्मळून पडली आहेत. तर व्यापाऱ्याला माल देण्या इतपत ही शेतात पीक उभ राहिलेलं नाही. त्यामुळे या वादळी वाऱ्यासह नुकसानीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला

अकोला जिल्ह्याला अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, तर प्रशासनाकडून एप्रिल फुल...
Rain update
Image Credit source: tv9marathi
Follow us on

गणेश सोनोने, अकोला : अकोला (AKOLA) जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यातल्या आगीखेड, खामखेड आणी पार्डी शिवारात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने शुक्रवारी संध्याकाळी हजेरी लावली. त्यामुळे कांदा बीजोत्पादन, उन्हाळी पीक, लिंबू,आंबा पिकांना मोठा फटका बसला आहे. तर यामध्ये शेतकऱ्यांचे (FARMER) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वाऱ्याचा जोर जास्त असल्याने मोठी झाडेही उन्मळून पडली आहेत. तर व्यापाऱ्याला माल देण्या इतपत ही शेतात पीक उभ राहिलेलं नाही. त्यामुळे या वादळी वाऱ्यासह (UNSEASONAL RAIN) नुकसानीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून दुसरा दिवस उजाडला तरी प्रशासनाचा कुठलाही अधिकाऱ्याने या ठिकाणी भेट दिली नसल्याने अधिकारी शेतकऱ्यांचं एप्रिल फुल तर नाही करत अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे.

शेतकऱ्यांचा कल हळदीकडे वाढला आहे

राज्यात व देशात जळगाव खान्देश रावेर तालुक्यातील केळी ही सर्वत्र प्रचलित असून सर्वात जास्त उत्पन्न या क्षेत्रात आहे. मात्र अवकाळी पाऊस वादळी वारा व नैसर्गिक आपत्तीमुळे त्या प्रमाणात वारंवार शेतकऱ्यांच्या केळीचे नुकसान होत असते. त्यामुळेच काही शेतकऱ्यांनी पर्यायी केळी उत्पादक शेतकरी आता हळदी लागवडीकडे वळला असून अंदाजे दोनशे एकर क्षेत्रात शेतकऱ्यांनी हळदीची लागवड सुरू केली आहे. मात्र यातही पाहिजे तसा नफा निघत नसल्यामुळे हळदीचे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले असून त्यामुळे आता काय करावं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.

भरपाईसाठी 2 कोटी 38 लाख मदतीचा प्रस्ताव

हे सुद्धा वाचा

अमरावती जिल्ह्यात 16 मार्च ते 19 मार्च 2023 दरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिके आणि फळपिकांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, नुकसानभरपाईसाठी एकूण 2 कोटी 38 लक्ष 53 हजार 630 रू. एवढ्या अनुदान निधीचा मागणी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी दिली.अवकाळी व गारपिटीने अमरावती जिल्ह्यात आठ तालुक्यातील १६४ गावात ३ हजार ४०९ हेक्टर क्षेत्रातील गहू, हरभरा, संत्रा व कांदा पिकांचे नुकसान झाले आहे.