PM Kisan 16th Installment Date | या दिवशी जमा होणार पीएम किसानचा हप्ता, अशी आहे अपडेट

| Updated on: Dec 30, 2023 | 3:31 PM

PM Kisan 16th Installment Date | पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत आता 16 व्या हप्ता जमा होणार आहे. यापूर्वी 15 हप्ता पंतप्रधान झारखंड दौऱ्यावर असताना, 16 नोव्हेंबर रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. आताच हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या हातात मिळेल. पण त्यासाठी e-kyc पूर्ण करावी लागणार आहे.

PM Kisan 16th Installment Date | या दिवशी जमा होणार पीएम किसानचा हप्ता, अशी आहे अपडेट
Follow us on

नवी दिल्ली | 30 डिसेंबर 2023 : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजनांपैकी एक आहे. या योजनेत मोदी सरकार प्रत्यके वर्षी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांचे तीन हप्ते जमा करते. एकूण 6 हजार रुपये मोदी सरकार बँक खात्यात जमा करते. आतापर्यंत या योजनेतंर्गत एकूण 15 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. योजनाचा 15 वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा करण्यात आला. 16 नोव्हेंबर रोजी झारखंड राज्याच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा हप्ता जमा केला. या योजनेतंर्गत 8 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 कोटी रुपये जमा करण्यात आले.

DBT माध्यमातून थेट लाभ

गेल्यावर्षी या योजनेचा ऑक्टोबर 2022 मध्ये 12 वा हप्ता जमा करण्यात आला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता जमा करण्यात आला. या 27 जुलै रोजी 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. आता नोव्हेंबर महिन्यात केंद्राने 15 वा हप्ता जमा केला होता. म्हणजे प्रत्येक हप्त्यात जवळपास पाच महिन्यांचे अंतर आहे. आता 16 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये जमा केले. DBT माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली.

हे सुद्धा वाचा

या शेतकऱ्यांना नाही लाभ

ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील वा सेवानिवृत्त असतील त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. 10 हजार रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना या योजनेचा फायदा मिळत नाही. इनकम टॅक्स जमा करणाऱ्यांना या योजनेच्या बाहेर ठेवण्यात आले आहे.

असे करा ई-केवायसी

  • पीएम किसान मोबाईल एपवर, फेस ऑथेंटिकेशन फीचर येते.
  • याठिकाणी शेतकरी घरबसल्या ई-केवायसी करता येते.
  • त्यासाठी फिंगरप्रिंट आणि ओटीपी गरज नसेल.

कधी जमा होणार 16 वा हप्ता

पीएम किसान योजनेतंर्गत 15 हप्ता जमा करण्यात आला आहे. आता या योजनेचा 16 हप्ता लवकरच लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या योजनेतंर्गत फेब्रुवारी ते मार्च महिन्या दरम्यान ही हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. अजून याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.