SUV खरेदी करताय? 5 किफायतशीर कार पाहा, किंमत 5.49 लाख रुपयांपासून सुरु

| Updated on: Jan 05, 2022 | 6:30 AM

भारतीय कार मार्केटमध्ये अनेक SUV कार उपलब्ध आहेत, ज्या वेगवेगळ्या किंमतींमध्ये येतात, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला देशात उपलब्ध असलेल्या एकापेक्षा एक SUVs बद्दल सांगणार आहोत.

1 / 6
भारतीय कार मार्केटमध्ये अनेक SUV कार उपलब्ध आहेत, ज्या वेगवेगळ्या किंमतींमध्ये येतात, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला देशात उपलब्ध असलेल्या एकापेक्षा एक SUVs बद्दल सांगणार आहोत. एसयूव्ही कार्सची स्वतःची खास वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये आपण छोट्या एसयूव्ही कारपासून सुरुवात करू.

2 / 6
टाटा पंच ही कॉम्पॅक्ट SUV नुकतीच लॉन्च करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइटवर या कारची एक्स शोरूम किंमत 5.49 लाख रुपये दर्शवली आहे. या कारला ग्लोबल NCAP कडून 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे. ही कार अनेक रंगात उपलब्ध आहे.

3 / 6
Kia Sonet ही एक कॉम्पॅक्ट SUV कार आहे. या कारमध्ये 1493 cc पर्यंतचे इंजिन उपलब्ध आहे. यात पेट्रोल आणि डिझेल इंजिनचेही पर्याय आहेत. तसेच ही 5 सीटर कार आहे. ही कार सप्टेंबर 2020 मध्ये भारतात सादर करण्यात आली होती. या कारची सुरुवातीची किंमत 7.86 लाख रुपये (ऑन रोड) आहे.

4 / 6
Renault Kiger मध्ये 999 सीसी इंजिन देण्यात आले असून या कारच्या सुरुवातीच्या व्हेरिएंटची किंमत 6.41 लाख रुपये आहे. ही कार अनेक रंगात उपलब्ध आहे. ही कार पेट्रोल व्हेरिएंट इंजिनसह येते. ही 5 सीटर कार आहे.

5 / 6
Hyundai Venue ही 5 सीटर कार आहे आणि ती कॉम्पॅक्ट SUV आहे. CarWale वेबसाइटनुसार या कारची किंमत 7.90 लाख रुपये आहे. यात 1493 cc पर्यंतचे इंजिन उपलब्ध आहे. तसेच यामध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे.

6 / 6
Tata Nexon ची ऑन-रोड किंमत 8.20 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1497 cc पर्यंतचे इंजिन उपलब्ध आहे आणि ही कार पेट्रोल आणि डिझेल पर्यायांमध्ये येते. ही 5 सीटर कार आहे.