देशातील नंबर 1 कार, 27 किमी मायलेज, किंमत फक्त 5.70 लाख रुपये, शोरुममध्ये घेण्यासाठी प्रचंड गर्दी
27 किमी मायलेज अन् सनरूफ असणारी सर्वात स्वस्त देशातील नंबर 1 कार. फीचर्स आणि लुक पाहून घेण्यासाठी शोरुममध्ये ग्राहकांची तुफान गर्दी. बनली भारतातील नंबर 1 कार.

भारतीय ऑटोमोबाईल बाजारात 4 मीटरपेक्षा कमी लांबीच्या सब-कॉम्पॅक्ट SUV गाड्यांची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या सहामाहीत एप्रिल ते सप्टेंबर 2026 या सेगमेंटच्या विक्रीत वार्षिक आधारावर 28 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. या कालावधीत एकूण 8,13,657 गाड्यांची विक्री झाली. या स्पर्धेत Tata Punch ने अव्वल स्थान पटकावले असून तिच्या विक्रीत तब्बल 68 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Tata Punch ने आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या सहामाहीत एकूण 1,23,287 युनिट्सची विक्री केली. मागील वर्षी याच कालावधीत 73,455 युनिट्सची विक्री झाली होती. त्या तुलनेत यंदा विक्रीत मोठी वाढ झाली आहे.
टाटाच्या गाड्यांना ग्राहकांची पसंती
पेट्रोल, CNG आणि इलेक्ट्रिक अशा विविध पर्यायांमध्ये उपलब्ध असणे, हे Tata Punch च्या लोकप्रियतेमागील महत्त्वाचे कारण मानले जाते. जानेवारी 2026 मध्ये सादर करण्यात आलेल्या फेसलिफ्ट मॉडेलमुळे गाडीच्या डिझाइनमध्ये आणि फीचर्समध्येही बदल झाले आहेत.
Tata Punch नंतर Tata Nexon, Maruti Suzuki Fronx आणि Maruti Suzuki Brezza या SUV गाड्यांनाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
Tata Punch ची वैशिष्ट्ये काय?
Tata Punch ही पाच आसनी मायक्रो SUV असून तिच्यामध्ये छोट्या कारचा कॉम्पॅक्ट आकार आणि SUV ची उंच बैठक, जास्त ग्राउंड क्लिअरन्स व आकर्षक लूक यांचा मिलाफ पाहायला मिळतो. 2021 मध्ये पहिल्यांदा बाजारात दाखल झालेल्या या गाडीला शहरी वापरासाठी विशेष पसंती मिळाली आहे.
अपडेटेड मॉडेलमध्ये नवीन डिझाइन, आधुनिक केबिन फीचर्स आणि टर्बो-पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात आल्याचे दिलेल्या माहितीत नमूद आहे.
Tata Punch ची किंमत, इंजिन आणि मायलेज
टाटा पंच या कारची किंमत 5.70 लाख रुपयांपासून सुरु होते. ही कार 27 किमी मायलेज देते. तर यामधील वेगवेगळ्या मॉडेलनुसार त्यांची किंमत देखील बदलते. त्यामुळे कार घेताना किंवा बुकिंग करण्यापूर्वी तुम्ही शोरुम किंवा इंजेटशी बोलून सर्व माहिती घ्यावी.