3 वर्षे दामटा कार, नंतर कंपनीला परत करा, 60% पैसा मिळवा!

Hyundai ने Creta Electric कारसाठी मोठी ऑफर आणली आहे. कंपनीने बायबॅक योजना जाहीर केली आहे. ग्राहकांना 3 वर्षे कार वापरल्यानंतर ती परत करू शकतात. त्यांना या योजनेत चांगला

3 वर्षे दामटा कार, नंतर कंपनीला परत करा, 60% पैसा मिळवा!
हुंदाई क्रेटा इलेक्ट्रिक कार
| Updated on: Aug 05, 2026 | 4:18 PM

जर तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचारात असला तर ही ऑफर तुमच्यासाठीच आहे. कारण कार एकदा शो-रुमच्या बाहेर पडली की तिची रिसेल व्हॅल्यू लागलीच कमी होते. पण हुंदाई कंपनीने एक भन्नाट ऑफर आणली आहे. ग्राहकांची चिंता हेरून त्यांनी खास योजना आणली आहे. कंपनीने लोकप्रिय क्रेटा इलेक्ट्रिक कारसाठी नवीन एश्योर्ड बायबॅक योजना जाहीर केली आहे. या योजनेतंर्गत ग्राहकांना ही कार तीन वर्षे वापरल्यानंतर ती परत करता येईल. तीन वर्षे अथवा 45,000 किलोमीटरपर्यंत ही कार चालवल्यानंतर कंपनीला ती विक्री करता येईल आणि ग्राहकांना 60% पर्यंत निश्चित किंमत मिळेल.

हुंदाईनुसार, भारतात इलेक्ट्रिक कार विक्री वाढवण्यासाठी केवळ नवीन तंत्रज्ञानाचा वापरच नाही तर ग्राहकांचा विश्वास जिंकणेही महत्त्वाचे आहे. अनेक लोक EV यासाठी खरेदी करत नाही कारण या कारची रिसेल व्हॅल्यू किती येईल आणि बॅटरीची किंमत घसरले अशी त्यांना भीती आहे. पण कंपनीची नवीन बायबॅक योजना ग्राहकांची ही चिंता दूर करते. त्यांना तीन वर्षे कार वापरता येते आणि ही कार परत करता येते.

क्रेटा इलेक्ट्रिक BaaS मॉडल

हुंदाई मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ तरुण गर्ग यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांचा भविष्यातील वापर हा तंत्रज्ञानासह ग्राहकांच्या विश्वासावर अवलंबून आहे. त्यांच्या मते, 60% एश्योर्ड बायबॅक व्हॅल्यू कंपनी ही त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता, जबरदस्त कामगिरी आणि दीर्घकाळासाठी मिळणाऱ्या मूल्यांआधारे देत आहे. हुंदाई क्रेटा इलेक्ट्रिक ही पूर्वीच BaaS मॉडलसह विक्री होते. कंपनी आता चार्जिंग नेटवर्काचा विस्तार आणि नवीन इलेक्ट्रिक वाहनांवर काम करत आहे.

किंमत आणि रेंज काय?

हुंदाई क्रेटा इलेक्ट्रिकची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 10.99 लाख रुपयांपासून सुरू होते. तर बॅटरीसाठी 3.9 रुपये प्रति किलोमीटरच्या हिशोबाने EMI चा पर्याय देते. यामुळे सुरुवातीला खरेदीची किंमत कमी लागते आणि ग्राहकांना ती खरेदी करता येते. इलेक्ट्रिक कार दोन वेगवेगळ्या बॅटरी पर्यायाआधारे खरेदी करता येते. एक 51.4 kWh बॅटरी पॅक आहे. त्याआधारे कार 510 किलोमीटरपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते. तर दुसरा पर्याय 42 kWh बॅटरी पॅक आहे. यामुळे कारची रेंज 420 किलोमीटरपर्यंत जाते. दूरच्या टप्प्यासाठी ही कार उपयोगी पडते. या SUV मध्ये DC फास्ट चार्जिंगची सुविधा मिळते. यामुळे बॅटरी 10% ते 80% पर्यंत केवळ 39 मिनिटात चार्ज होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us