सस्पेंस संपला! नवीन Scorpio N च्या किंमतीबाबत मोठा खुलासा, 5 जुलैपासून टेस्ट ड्राइव्हला सुरुवात

| Updated on: Jun 28, 2022 | 1:22 PM

कंपनी 'बिग डॅडी ऑफ एसयूव्ही' या नावाने नवीन स्कॉर्पिओची जाहिरात करत आहे. नवीन स्कॉर्पिओ पाच ट्रिममध्ये उपलब्ध असेल आणि Z2 ते Z8 L पर्यंतच्या व्हेरियंटमध्ये येतील. नवीन स्कॉर्पिओची सुरुवातीची किंमत 11.99 लाख रुपये आहे आणि टॉप व्हेरियंटची किंमत 19.49 लाख रुपये आहे.

सस्पेंस संपला! नवीन Scorpio N च्या किंमतीबाबत मोठा खुलासा, 5 जुलैपासून टेस्ट ड्राइव्हला सुरुवात
Mahindra Scorpio-N
Image Credit source: Facebook
Follow us on

महिंद्राने बहुप्रतीक्षीत नवीन स्कॉर्पिओ एन (Scorpio-N) लाँच केली आहे. महिंद्राने आपल्या नवीन स्कॉर्पिओमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्सही (Features) दिली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महिंद्राच्या स्कॉर्पिओ एनची ग्राहकांकडून मागणी केली जात होती. अनेक रिपार्टच्या माध्यमातून या गाडीच्या फीचर्सहीची माहिती लिक झालेली होती. अखेर लवकरच ही गाडी आता ग्राहकांच्या भेटीला येणार असून ग्राहकांमध्ये नवीन स्कॉर्पिओच्या किंमतीबाबतही उत्सूकता लागली होती. आता कंपनीने किंमतीबाबत मोठा खुलासा केला आहे. कंपनी ‘बिग डॅडी ऑफ एसयूव्ही’ या नावाने नवीन स्कॉर्पिओची जाहिरात (Advertising) करत आहे. नवीन स्कॉर्पिओ पाच ट्रिममध्ये उपलब्ध असेल आणि Z2 ते Z8 L पर्यंतच्या व्हेरियंटमध्ये येतील. नवीन स्कॉर्पिओची सुरुवातीची किंमत 11.99 लाख रुपये आहे आणि टॉप व्हेरियंटची किंमत 19.49 लाख रुपये आहे.

30 जुलैपासून टेस्ट ड्राईव्ह

नवीन स्कॉर्पिओचे बुकिंग 30 जुलैपासून सुरू होईल. नवीन स्कॉर्पिओचे ऑनलाइन बुकिंगही करता येणार असून महिंद्रा 5 जुलैपासून 30 शहरांतील शोरूममध्ये टेस्ट ड्राइव्हसाठी नवीन स्कॉर्पिओ सादर करेल. नवीन स्कॉर्पिओ-एन सध्याच्या स्कॉर्पिओसोबत विकली जाईल. नवीन एसयूव्हीला आधुनिक डिझाइन देण्यात आले असून सध्याच्या मॉडेलपेक्षा ती खूप मोठी असणार आहे. महिंद्र स्कॉर्पिओच्या फ्रंटला ग्रील देण्यात आली आहे, त्यामुळे तिचा लूक काहीसा XUV700 सारखा दिसून येतो आहे. नवीन स्कॉर्पिओ ही दुसरी अशी कार आहे, ज्यात महिंद्राच्या नवीन लोगोचा वापर करण्यात येणार आहे. यापूर्वी XUV700 नवीन लोगोसह दाखल करण्यात आली होती.

असे असणार सेफ्टी फीचर्स

नवीन स्कॉर्पिओ 6 एअरबॅगसह येते. डायनॅमिक एलईडी टर्न इंडिकेटरसह नवीन एसयूव्ही एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, सी-आकाराचे डेटाइम रनिंग एलईडी आणि फ्रंट बंपरवर एलईडी फॉग लॅम्प यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध असतील. नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एनमध्ये सर्व नवीन 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट टेक्नीक वापरली गेली आहे. यासोबतच कंपनीने या एसयूव्हीमध्ये सोनीचे 12 स्पीकर देखील सादर केले आहेत.

हे सुद्धा वाचा

दमदार फीचर्सचा समावेश

नवीन स्कॉर्पिओमध्ये व्हॉईस कमांड आणि क्रूझ कंट्रोल फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने 2.0 लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ एन सादर केली आहे. चेन्नईच्या महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये हे प्रोडक्ट तयार करण्यात आले आहे. नवीन स्कॉर्पिओची रचना महिंद्रा इंडिया डिझाईन स्टुडिओमध्ये करण्यात आली आहे.