
मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (bumper offer! buy Maruti Suzuki Ritz LXI in just rs 190000 check more about it)
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनी एक अशी सुविधा प्रदान करते ज्याद्वारे तुम्ही सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू असे या सुविधेचे नाव आहे. याद्वारे तुम्ही तुमची आवडती सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. याद्वारे तुम्ही मारुतीच्या सर्व सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता, ज्या अधिकृत विक्रेत्यांकडून विकल्या जात आहेत.
मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू अंतर्गत तुम्ही मारुतीच्या अनेक सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता. आज आम्ही तुम्हाला Maruti Suzuki Ritz LXI या कारबद्दल माहिती देणार आहोत. ही एक रिफर्बिश्ड कार असून 2009 चं मॉडल आहे. ही एक पेट्रोल इंजिनवाली कार असून आतापर्यंत 90,228 किलोमीटरपर्यंत धावली आहे. ही कार नवी दिल्ली येथे रजिस्टर आहे.
या मॉडेलचा रंग व्हाईट असून ही कार खरेदी करताना तुम्हाला मॅनुअल ट्रान्समिशनदेखील मिळेल. या कारची मूळ किंमत 4.63 लाख रुपयांपेक्षा जास्त असून असून ट्रू व्हॅल्यू अंतर्गत तुम्ही ही कार 1 लाख 90 हजार रुपयांमध्ये खरेदी करु शकता. ही सेकेंड हँड Maruti Suzuki Ritz LXI www.marutisuzukitruevalue.com या वेबसाईटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ही कंपनीच्या टॉप सेलिंग कार्सपैकी एक आहे.
या लिंकवर (https://www.marutisuzukitruevalue.com/buy-car/ritz-in-new-delhi-2009/AXWxythuNiwKO4z0JZVk) जाऊन तुम्ही या कारबाबतची माहिती घेऊ शकता. सोबतच वेबसाईटवर या कारच्या डीलरचा पत्तादेखील मिळेल. सोबतच तुम्ही वेबसाईटद्वारे या कारची टेस्ट ड्राईव्हदेखील बुक करु शकता.
या कारमध्ये डिझेल आणि पेट्रोल इंजिन हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. या कारचं डिझेल इंजिन 1248 सीसीचं आहे, तर पेट्रोल इंजिन 1197 सीसीचं आहे. यासह, तुम्हाला ऑटोमॅटिक आणि मॅनुअल ट्रान्समिशन मिळेल. या कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास व्हेरिएंट आणि फ्यूल टाइप नुसार 17.16 ते 23.2 किलोमीटर प्रतिलिटर इतकं मायलेज ही कार देते. ही 5 सीटर कार असून 3775 मिमी लांब, रुंदी 1680 मिमी आणि व्हीलबेस 2360 मिमी इतका आहे.
(सूचना : या बातमीत संबंधित कारबद्दल दिलेली माहिती ही मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यूच्या वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर अथवा कारच्या मालकाशी संपर्क साधावा.)
इतर बातम्या
1 एप्रिलपासून महामार्गांवरुन प्रवास करणं महागणार, जाणून घ्या काय आहेत कारणं
3 लाखांच्या कारवर 45 हजारांचा डिस्काऊंट
(bumper offer! buy Maruti Suzuki Ritz LXI in just rs 190000, check more about it)